Home Buying | घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता पूर्ण काम केल्याशिवाय बिल्डरला पझेशनसाठी आणता येणार नाही दबाव

Home Buying | सी विश्वनाथ आणि रामसूरत राम मौर्य यांच्या बेंचने बंगळूरू येथील एका रियल इस्टेट कंपनीच्या संदर्भात हा आदेश दिला आहे. बेंचने बिल्डरला म्हटले आहे की त्यांनी ग्राहकाला ३.५ कोटी रुपये व्याजासह परत करावेत.

Home Buying
आता बिल्डरला ग्राहकांवर पझेशनसाठी दबाव आणता येणार नाही 
थोडं पण कामाचं
  • बिल्डरकडून अनेकवेळा उपद्रव होतो किंवा काही बाबींसाठी ग्राहकांवर दबावदेखील देतो
  • एनसीडीआरसी आदेशानुसार जर एखादा फ्लॅट पूर्णपणे तयार नसेल तर बिल्डर ग्राहकावर पझेशन घेण्यासाठी दबाव आणू शकत नाही
  • एनसीडीआरसीच्या या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होणार

Home Buying | नवी दिल्ली: घर खरेदी करणे ही सर्वसामान्य माणसासाठी अत्यंत महत्त्वाची बाब असते. आर्थिक, भावनिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून घर विकत घेणे याचे महत्त्व मोठे असते. अशावेळी बिल्डरकडून अनेकवेळा उपद्रव होतो किंवा काही बाबींसाठी दबावदेखील येतो. मात्र आता एनसीडीआरसी म्हणजे नॅशनल कन्झ्युमर डिस्प्युट रिड्रेसल कमिशनने म्हटले आहे की जर एखादा फ्लॅट पूर्णपणे तयार नसेल तर बिल्डर ग्राहकावर पझेशन घेण्यासाठी दबाव आणू शकत नाही. जोपर्यत एखाद्या फ्लॅटसाठी कम्प्लिशन सर्टिफिकेट दिले जात नाही, तोपर्यत बिल्डर पझेशनसाठी दबाव आणू शकत नाही. एनसीडीआरसीच्या या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होणार आहे. (Home Buying |  NCDRC says that Builders can not force customers to take possession without completion certificate)

बंगळूरू येथील प्रकरणात एनसीडीआरसीचा निर्णय

प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार सी विश्वनाथ आणि रामसूरत राम मौर्य यांच्या बेंचने बंगळूरू येथील एका रियल इस्टेट कंपनीच्या संदर्भात हा आदेश दिला आहे. बेंचने बिल्डरला म्हटले आहे की त्यांनी ग्राहकाला ३.५ कोटी रुपये व्याजासह परत करावेत. या ग्राहकाने एक व्हिला विकत घेतला होता. मात्र त्या बांधकामाला स्थानिक प्रशासनाचे कम्पिलशन सर्टिफिकेट नसल्यामुळे या ग्राहकाने व्हिला ताब्यात घेण्यास नकार दिला. यानंतर त्याने एनसीडीआरसीकडे तक्रार केली होती. 

बांधकाम पूर्णत्वास दोन वर्षे उशीर

तपासात पॅनलच्या लक्षात आले की त्या व्हिलाचे काम पूर्ण होण्यास दोन वर्षे उशीर झाला आहे. याशिवाय बांधकामाचे काम पूर्ण झाले नव्हते. अर्थात बिल्डरची इच्छा होती की ग्राहकाने त्या कागदपत्रांवर सही करावी ज्यात म्हटले आहे की घराचे काम पूर्ण झाले आहे. ग्राहकाने सही करण्यास नकार दिला. तेव्हा बिल्डरने सांगितले की जर कागदपत्रांवर सही नाही केली तर घराचे पझेशन मिळणार नाही. यानंतर हा वाद एनसीडीआरसीकडे पोचला.

ग्राहकाने ईएमआय वेळेवर भरले 

सुमन कुमार झा आणि प्रतिभा झा यांनी हा व्हिला बुक केला होता. त्यांनी हा ३,९०० चौ.फूटांचा व्हिला २०१३ मध्ये बुक केला होता. व्हिलाचे बांधकाम टेक्नॉलॉजी कंसल्टेशन प्रा. लिने केले होते. बिल्डरने आश्वासन दिले होते की बांधकाम २०१५ पर्यत पूर्ण होईल आणि पझेशनदेखील मिळेल. या जोडप्याने व्हिला विकत घेण्यासाठीचे आवश्यक ईएमआय भरले आहेत.

जर तुम्ही घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर सध्या त्यासाठी उत्तम संधी आहे. गृहकर्जाचे व्याजदर नीच्चांकी पातळीवर आहेत आणि घरांच्या किंमतीदेखील तुलनेने स्थिर आहेत किंवा घसरलेल्या आहेत. बॅंकांच्या विविध ऑफर्स सुरू आहेत, शिवाय बॅंकादेखील गृहकर्ज वितरणाचा व्यवसाय वाढवण्यासाठी उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत कमी व्याजदराने गृहकर्ज घेत स्वत:चे घर घेण्याची सुवर्णसंधी आहे. होमलोनच्या ईएमआयवर कर वजावटदेखील मिळते. मात्र गृहकर्ज आणि घराच्या खरेदी-विक्रीसंदर्भात काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेतल्या नाहीत तर तुम्हाला कर वजावटीचा लाभ मिळणार नाही आणि तुम्ही जो लाभ घेतला आहे तो परत घेतला जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी