Home loan interest rate hike : मुंबई : रिझर्व्ह बॅंकेने (RBI) रेपो रेटमध्ये वाढ करतानाच बऱ्याच काळापासून मरगळलेल्या व्याजदरांना चालना मिळणार आहे. बॅंकिंग क्षेत्रावर आरबीआयच्या धोरणाचा थेट आणि तात्काळ परिणाम होत असतो. आरबीआयने रेपो रेट (Repo rate) वाढवल्यामुळे आता देशातील सर्वच बॅंका हळूहळू आपल्या व्याजदरात वाढ करत आहेत. यामुळे तुम्हाला तुमच्या मुदतठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरात तर वाढ होणारच आहे. मात्र त्याचबरोबर तुम्हाला मिळणारी कर्जदेखील महाग होणार आहे. विशेषत: गृहकर्जे महागणार आहे. आता एचडीएफसी बॅंकेच्या (HDFC Bank) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर एचडीएफसी बॅंकेचे गृहकर्ज (Home Loan) घेतले असेल तर आता तुमच्या खिशावरील भार वाढणार आहे. तुमचा गृहकर्जाचा ईएमआय वाढणार आहे. एचडीएफसी बॅंकेने आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात वाढ (Home loan interest rate) केली आहे. एचडीएफसी बॅंकेने सांगितले आहे की बॅंक किरकोळ प्राइम लेंडिंग रेट म्हणजे गृहकर्जावरील व्याजदरात 30 बेसिस पॉइंटने वाढ करणार आहे. ( Home loan interest rates hike by HDFC bank , check the rates)
वाढत्या चलनवाढीला आवर घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बुधवारी अचानक आपल्या रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर अनेक बॅंकांनी कर्ज आणि ठेवींचे दर वाढवले आहेत.
अधिक वाचा : LPG Price: घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ; सर्वसामान्यांना बसला मोठा झटका
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर 40 बेस पॉईंट्सने वाढवून 4.40% केला आहे. दोन वर्षांतील दरातील हा पहिला बदल आहे. तर चार वर्षांतील रेपो रेटमधील पहिली दरवाढ आहे.
गेल्या महिन्यात, एचडीएफसी लि. (HDFC LTD) आणि एचडीएफसी बॅंक (HDFC Bank),या देशातील सर्वात मोठ्या खासगी बॅंकेचे विलीनीकरण झाले आहे. देशातील सर्वात मोठ्या खासगी बॅंकेने कर्जाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी वित्तीय सेवेचा विस्तार करण्यासाठी विलीनीकरणाची योजना आणली आहे.
अधिक वाचा : Indian Railways update: रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये केले बदल, तुम्हाला मिळणार मोठा फायदा, पाहा कसा
देशातील महागाई दर सातत्याने वाढत आहे. या महागाईचा फटका आता देशातील कर्जदारांना देखील बसला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता रेपो दर 4% वरुन वाढवून 4.40% करण्यात आला आहे. म्हणजेच तुमचा ईएमआय आणि कर्ज महागणार आहे. 2 आणि 3 मे रोजी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तातडीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पतधोरण आढावा बैठक दर दोन महिन्यांनी घेतली जाते. या आर्थिक वर्षाची पहिली बैठक गेल्या महिन्यात 6-8 एप्रिल रोजी झाली होती. पुढील बैठक जूनमध्ये होणार होती. दरम्यान याआधी 22 मे 2020 रोजी रेपो दरात बदल करण्यात आला होता. तेव्हापासून रेपो दर 4% या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर आहेत. मात्र, आता रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. रेपो दर वाढवल्यामुळे कर्जे महागणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी मॉनिटरिंग समितीने रेपो दरात 40 बीपीएसने वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank) गर्व्हनर (Governor) शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत ही रेपो दरवाढीची माहिती दिली होती.
देशातील महागाई आणि वित्तीय व्यवस्थेचा ताळमेळ राखण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बॅंकेकडून केला जातो. मागील बऱ्याच काळापासून आरबीआयने रेपो रेट स्थिर ठेवले होते. किंबहुना मागील काही वर्षात आरबीआयने रेपो रेट घटवल्याने व्याजदरात देखील मोठी घसरण झाली होती. मात्र आता महागाई लक्षात घेऊन आरबीआयने रेपो रेटे वाढवण्यास सुरूवात केली आहे.