Home Loan : होम लोनवर मिळणार मोठी सूट, बजेटमध्ये झाली घोषणा, जाणून घ्या किती मिळणार फायदा 

काम-धंदा
Updated Jul 08, 2019 | 12:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Home Loan Tax rebate: मोदी सरकार २.० च्या पहिल्या बजेटमध्ये होम लोनवर टॅक्स सूट वाढविण्यात आली आहे. जाणून बजेटमध्ये देण्यात आलेल्या सूटीचा तुम्हांला किती फायदा होईल. 

home loan
होम लोनमध्ये मिळणार फायदा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • होम लोनवर टॅक्स सूट वाढवून ३.५ लाख करण्यात आली आहे.
  • ही टॅक्स सूट ४५ लाखांपर्यंतच्या होम लोनवर मिळणार आहे.
  • यापूर्वी दोन लाख रुपये टॅक्स सूट मिळत होती.

मुंबई :  आपल्या पहिल्या केंद्रीय बजेट भाषणात अर्थमत्री निर्मला सीतारमण यांनी होम लोनच्या व्याजावर अतिरक्त १.५ लाख रुपये टॅक्स कपातीची घो,णा केली आहे. ही एक चांगली घोषणा आहे. पण या कपातीत काही कमतरता आहेत, जी ग्राहकाला कपातीची संपूर्ण मुल्य प्राप्त होणार नाही. 

बहुतांशी घराचे खरेदीदार कर्ज घेतल्यानंतर म्हणतात की व्याज दराने त्यांच्या उत्पन्नावर दबाव पडतो. तुमच्या होम लोनच्या कार्यकाळाच्या सुरूवातीला होम लोनच्या ईएमआयचा एक मोठा भाग हा व्याजच्या रुपाने घेतला जातो. यापूर्वी आयकर अधिनियमच्या कलम २४ बी नुसार तुम्हांला दर वर्षी २ लाख रुपयांच्या कपातीची अनुमती दिली जात होती. ही मर्यादा वाढवून ३.५ लाख रुपये करण्यात आली आहे. जर तुम्ही ४५ लाख रुपयांचे होम लोन ३१ मार्च २०२० पर्यंत घेतले, तर अतिरिक्त १.५ लाख रुपये टॅक्स सूट मिळणार आहे. ही सूट तुम्हांला नवीन कलम ८०EEA अंतर्गत मिळणार आहे. 

जर आपण ९० टक्के लोन टू व्हॅल्यू (LTV — कर्ज-ते-मूल्य) प्रमाण मानले तर ४५ लाखच्या प्रॉपर्टीवर तुम्हांला ४०.५ लाख लोन मिळणार आहे. यात व्याज दर पहिल्या वर्षी ३.५ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत कमी होईल. 

आपण हे मानू या सध्या सुरू असलेल्या व्याजदरानुसार होम लोनवर ८.७ टक्के व्याज लागणार आहे.  होम १५ वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज घेतल्यास याचा हिशेब असा होईल. पहिल्या वर्षांसाठी ३.४६ लाख रुपये व्याज द्यावे लागेल. दुसऱ्या वर्षी ३.३४ लाख, तिसऱ्या वर्षी ३.२० लाख, चौथ्या वर्षी ३.०६ लाख रुपये, पाचव्या वर्षी २.९० लाख रुपये, सहाव्या वर्षी २.७२ लाख रुपये आणि सातव्या वर्षी २.५३ लाख रुपये 

तुम्ही पाहत असाल की पहिल्या वर्षी व्याजाचा बोजा हा सर्वाधिक आहे. पण त्याची सीमा ३.५० लाख रुपयांपर्यंत पोहचत नाही. तसेच लोनचा कालावधी जसा वाढत गेला तशी याची सीमा अजून कमी होणार. त्यामुळे ३.५ लाखांचा संपूर्ण लाभ कधी घेणार नाही. त्याने सर्वाधिक ४५ लाखांचे कर्ज जरी घेतले तर नवी कपातीचा लाभ त्याला पूर्ण मिळणार नाही. 

अतिरिक्त कपात चांगली आहे. वरील ग्राहकाला बचत करण्यास मदत मिळणार आहे. लोनच्या पहिल्या सात वर्षाच्या काळात अतिरिक्त कपातीच्या माध्यमातून ७.२४ लाखांचा टॅक्स वाचतो आहे. जर ३० टक्क्यांचा स्लॅबचा हिशेब लावला तर तो २.१७ लाख रुपये बचत करणार आहे. हा सुमारे २५८३ प्रति महिना आणि ३१००० रुपये दर वर्षी तुमचे पैसे वाचणार आहेत. 

कोणाला होईल फायदा 

मोठ्या शहरात बजेट घर खरेदी करणाऱ्यांना तसेच छोट्या शहरात घर खरेदी करणाऱ्यांना होणार आहे. दरम्यान ४५ लाखांची संपत्तीवर पूर्ण लाभ मिळवणे अशक्य आहे. हा लाभ उच्च मूल्यांच्या संपत्तीवर वाढविणे गरजेचे आहे. महानगरांमध्ये २ खोल्यांचे घर खरेदी करण्याची किंमत खूप जास्त असते. त्यामुळे नवीन कोणतीही कपात करदात्याचे दुखणे कमी करू शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Home Loan : होम लोनवर मिळणार मोठी सूट, बजेटमध्ये झाली घोषणा, जाणून घ्या किती मिळणार फायदा  Description: Home Loan Tax rebate: मोदी सरकार २.० च्या पहिल्या बजेटमध्ये होम लोनवर टॅक्स सूट वाढविण्यात आली आहे. जाणून बजेटमध्ये देण्यात आलेल्या सूटीचा तुम्हांला किती फायदा होईल. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola