वाह क्या बात है ! घराच्या छतावरुन होईल लाखो रुपयांची कमाई, 'या' आहेत चार बिझनेस आयडिया

काम-धंदा
भरत जाधव
Updated Apr 08, 2021 | 11:42 IST

कोरोना महामारीमुळे अनेकांचे आयुष्य बदलले आहे. शहरात काम करणाऱ्या रामूपासून तो बाबूपर्यंतच्या सर्व स्तरातील लोकांचा रोजगार गेला. यामुळे शहरात पोटाची खळगी भरायला गेलेल्या अनेकांनी गावाकडचा रस्ता पकडला.

 home terrace Four business Ideas make you rich
घराच्या छतावरुन होईल लाखो रुपयांची कमाई  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • घरात राहून कमवाता येईल पैसा
  • घराच्या छतावर सुरू करता भाजीपाल्याचे उत्पन्न
  • पापड- लोणचं व्यवसायासाठी सरकारकडून मिळतं प्रशिक्षण

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे अनेकांचे आयुष्य बदलले आहे. शहरात काम करणाऱ्या रामूपासून तो बाबूपर्यंतच्या सर्व स्तरातील लोकांचा रोजगार गेला. यामुळे शहरात पोटाची खळगी भरायला गेलेल्या अनेकांनी गावाकडचा रस्ता पकडला. गावात राहून अनेकांनी आपला नवीन व्यवसाय सुरू केला, आणि आपल्या जीवनाचा गाडा चालवू लागले. अशा जिद्दीने काम करणाऱ्यांसाठी आज आम्ही काही व्यवसायाची आयडिया देणार आहोत, ज्यातून तुमच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. विशेष म्हणजे तुम्ही हे व्यवसाय आपल्या घराच्या छतावर करू शकतात. तसेच यातील व्यवसायासाठी सरकारकडून आर्थिक मदत देखील मिळते. शिवाय या व्यवसायासाठी गुंतवणूक पण कमी आहे.चला तर मग जाणून घेऊया या व्यवसायांविषयी...( home terrace Four business Ideas)

 मोबाईल टॉवर (Mobile tower)वरुन मिळेल जबरदस्त पैसा

जर तुम्ही व्यवसाय किंवा धंदा करण्यात नवखे असाल तर तुम्ही आपल्या घरावर मोबाईल टॉवर (Mobile tower) लावून भांडे मिळू शकतात. यामुळे या व्यवसायात  आपल्याला कोणतीच जोखीम घ्यावी लागणार नाही. कंपनीशी करार केल्यानंतर आपल्याला मुबलक पैसा मिळू शकतो. दरम्यान मोबाईल टॉवर लावण्यासाठी तुम्हाला टेलीकॉम कंपनीच्या एजेंटशी संपर्क करावा लागेल.

दरम्यान टॉवर तुमच्या छतावर लावल्यानंतर तुमच्या परिसरानुसार कंपनी तुम्हाला एकदम सर्व रक्कम देईल. ही रक्कम ३० हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत असू शकते. टॉवर बसवण्यापुर्वी तुम्हाला तुमच्या शेजारील लोकांचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल. स्थानिक महानगरपालिकेची परवानगी पण घ्यावी लागेल. 

सोलर प्लांट(Solar plant)पासून कमवा पैसा

विजेची वाढत्या गरजेनुसार सरकार सोलर प्लांट (Solar plant) बसविण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. त्यात जर तुम्ही घराचे छत सोलर प्लांट लावण्यास भाड्याने देऊ शकतात. भाडे तत्वावर सोलर लावल्यास कंपनी आपल्याला बक्कळ पैसा देईल. शिवाय तुम्ही स्वत सोलर प्लांट इंस्टॉल करुन यातून निर्मित होणारी वीज पॉवर हाऊस किंवा खासगी इलेक्ट्रिक कंपनीला विकू शकतात. वीज विकल्यानंतर तुम्हाला यूनिटच्या हिशोबाने रक्कम मिळेल. दरम्यान तुम्हाला हा व्यवसाय करण्याची इच्छा असेल किंवा आवड असेल तर तुम्ही सरकारमार्फत राबवण्यात येणाऱ्या सोलर पॉलिसीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भागातील डिस्कॉमशी संपर्क करू शकतात.

सेंद्रिय शेतीतून (Organic farming) घरात येईल लक्ष्मी

जर तुम्हाला बागकाम करायची आवड असेल तर तुम्ही आपल्या घराच्या छतावर ऑर्गेनिक फार्मिंग (Organic farming) करुन पैसा कमावू शकतात. शहरात जागेची उणीव दिवसेंदिवस भासत आहे. यामुळे शहरी भागात टेरेस फार्मिंगचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान काही वर्षांपासून लोक आता सेंद्रिय भाजीपाला घेण्याकडे वळले आहेत. सेंद्रिय भाजीपाल्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असून तुम्ही यातून पैसा कमावू शकतात. दरम्यान यात आपल्याला कमी पैश्यांची गुंतवणूक करावी लागते. दरम्यान टेरेस फार्मिंग करताना एक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. रोपांना पाणी देताना ठिबकाचा वापर करावा यामुळे घराचे छत खराब होत नाही.

पापड - लोणचं बनवण्याचा व्यवसाय (Papad -pickles making  business)

महिलांसाठी लघू उद्योगाची सुरुवातासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यातील सर्वात अधिक चालणारा व्यवसाय आहे, पापड, लोणचं बनवण्याचा. याचे प्रशिक्षण देखील आपल्याला सरकारकडून दिले जाते. दरम्यान जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या छताचा वापर या कामासाठी करू शकतात.  यात सरकारकडून कर्जदेखील पुरवले जाते. यासाठी तुम्ही अंगणवाडी केंद्राशी संपर्क करू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी