Honda Bonus News : मिळाला दणकून बोनस, खूश होते कर्मचारी...पण कंपनीने दिला आदेश, परत करा बोनस नाहीतर पगारातून कपात

Honda Motors : कोणत्याही कर्मचाऱ्यामध्ये बोनसबद्दल खूप उत्साह असतो आणि तो त्याची वाट पाहतो. होंडाने आधी कर्मचाऱ्यांना बोनस देऊन खुश केले आणि नंतर बोनसचे पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. होंडाने कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत की बोनसची अतिरिक्त रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे ती परत करा नाहीतर पगारातून कापण्यात येईल.

Honda Bonus news
होंडाची बोनसची बातमी 
थोडं पण कामाचं
  • होंडा मोटर्समधील धक्कादायक गोष्ट
  • कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला बोनस
  • आता कंपनी म्हणते बोनस जरा जास्त दिला, अतिरिक्त रक्कम परत करा

Honda Seeks Refund Of Overpays Bonus : नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांना जशी वेतनवाढ हवी असते तसेच त्यांना बोनसदेखील हवाहवासा असतो. वर्षातून एकदाच मिळणाऱ्या बोनसच्या (Bonus) रकमेकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष असते. कोणत्याही कर्मचाऱ्यामध्ये बोनसबद्दल खूप उत्साह असतो आणि तो त्याची वाट पाहतो. पण, कल्पना करा की जर कर्मचाऱ्यांना चांगला बोनस मिळाला आणि बोनस मिळाल्याचा आनंद साजरा करण्याआधीच जर कंपनीने ते पैसे परत मागायला सुरुवात केली, तर त्या कर्मचाऱ्यांना किती धक्का बसेल. असाच प्रकार होंडा (Honda Motors) या जगातील आघाडीच्या जपानी वाहन उत्पादक कंपनीच्या कर्मचाऱ्यांबरोबर घडला आहे. होंडाने आधी कर्मचाऱ्यांना बोनस देऊन खुश केले आणि नंतर बोनसचे पैसे परत(Honda Bonus) करण्याचे आदेश दिले. पाहूया हे संपूर्ण प्रकरण प्रकरण काय आहे ते. (Honda motors asked employees to return the additional amount of bonus)

अधिक वाचा : Weather Update: 'या' 10 राज्यांना IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या महाराष्ट्रातल्या पावसाची परिस्थिती

आधी खात्यात बोनस जमा केला

होंडाचे ज्या कर्मचाऱ्यांना हा मोठा धक्का बसला आहे, ते अमेरिकेतील ओहायो राज्यातील मेरीसविले शहरात कंपनीच्या कारखान्यात काम करतात. कंपनीने कर्मचाऱ्यांना नुकताच एक मेमो पाठवला आहे. त्यात असे म्हटले आहे आहे की जास्त रकमेचा बोनस तुम्हाला पाठवला गेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला जास्तीची रक्कम परत करावी लागेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना जितका बोनस मिळणार होता त्यापेक्षा जास्त रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली.

अधिक वाचा-  चमकेल चेहरा फक्त वापरा जिऱ्याच्या पाण्याचा टोनर

कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सूचना

समोर आलेल्या वृत्तात NBC4 च्या हवाल्याने म्हटले आहे की, होंडाच्या या कारखान्यात काम करणारे कर्मचारी हा मेमो मिळाल्यानंतर गोंधळले आहेत. होंडाच्या वतीने कर्मचार्‍यांना कडक सूचना देत, त्यांना लवकरात लवकर ही जादा बोनसची रक्कम परत करावी लागेल, असे सांगण्यात आले आहे. जर कर्मचाऱ्यांनी या मेमोकडे दुर्लक्ष केले किंवा त्याला प्रतिसाद दिला नाही, तर अशा परिस्थितीत बोनसची अतिरिक्त रक्कम त्यांना मिळणाऱ्या मासिक पगारातून आपोआप कापली जाईल असे कंपनीने म्हटले आहे.

विचार करायला दिवसभराचा वेळ

कर्मचाऱ्यांनी बोनसची अतिरिक्त रक्कम कशी परत करायची याचा विचार करण्यासाठी कर्मचाऱ्यांना होडांने 22 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. रक्कम परत करायची आहे की त्यांना त्यांच्या मासिक पगारातून बोनसची रक्कम कापायची आहे का? असे कंपनीने विचारले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार होंडाच्या प्रवक्त्याने ईमेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कर्मचार्‍यांच्या भरपाईशी संबंधित बाबी संवेदनशील आहेत आणि ते त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कोणताही दबाव कमी करण्यासाठी योग्य पावले उचलत आहेत.

अधिक वाचा-  Skin Care Tips:चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी नक्की ट्राय करा बीटचा ‘हा’ फेसपॅक, चेहऱ्यावर दिसेल एक अद्भुत चमक

कर्मचाऱ्यांसाठी कठीण काळ

होंडाने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की या महिन्याच्या सुरुवातीला होंडा मोटर्सने त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनसचे जादा पेमेंट केले होते. यावेळी काही कर्मचाऱ्यांना जास्त पगार देण्यात आला. त्याचवेळी कंपनीचा हा मेमो पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे. काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की ही रक्कम परत करणे त्यांच्या कुटुंबासाठी कठीण गोष्ट झाली आहे. होंडा मेरीस्विलच्‍या या प्रकल्पामध्‍ये जी वाहने तयार करते, त्यात अकॉर्ड, CR-V, Integra, TLX आणि NSX यांचा समावेश आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी