जाणून घ्या कसे एका फळविक्रेत्याच्या मुलाने उभारले नॅच्युरल्स आईसक्रीमचे 300 कोटींचे साम्राज्य

नॅच्युरल्स आईसक्रीम या लोकप्रिय ब्रँडच्या मागे ज्यांचे डोके आहे त्या रघुनंदन कामत यांनी आपल्या आईच्या क्लृप्त्या आणि आपल्या वडिलांचा फळविक्रीचा अनुभव आणि तज्ञता यांचा वापर करून एक भारतीय ब्रँड उभा केला.

Raghunandan Kamath of Natural Ice Creams
जाणून घ्या कसे एका फळविक्रेत्याच्या मुलाने उभारले नॅच्युरल्स आईसक्रीमचे 300 कोटींचे साम्राज्य  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • देशभरात नॅच्युरल्स आईसक्रीमची आहेत 135 दुकाने
  • भवतालाचे निरीक्षण करून उभा केला आईसक्रीम ब्रँड
  • अस्सल फळांच्या रसाच्या वापरावर दिला भर

300 crore empire of Naturals ।  नॅच्युरल्स आईसक्रीम (Naturals Ice Cream) या लोकप्रिय ब्रँडच्या (famous brand) मागे ज्यांचे डोके आहे त्या रघुनंदन कामत (Raghunandan Kamath) यांनी आपल्या आईच्या (mother) क्लृप्त्या (ideas) आणि आपल्या वडिलांचा (father) फळविक्रीचा अनुभव (experience) आणि तज्ञता (expertise) यांचा वापर करून एक भारतीय ब्रँड (Indian brand) आईसक्रीम क्षेत्रात उभारला. सुरुवातीला त्यांनी पावभाजी आणि त्यासोबत फळांच्या चवीचे आईसक्रीम या आगळ्यावेगळ्या जोडीने लोकप्रियता मिळवली. काहीतरी तिखट आणि मसालेदार गरम पदार्थ खाल्ल्यानंतर लोकांना काहीतरी थंड खायला किंवा प्यायला आवडते हे त्यांच्या लक्षात आले. 200 चौरस फुटांच्या दुकानापासून सुरू झालेला नॅच्युरल्स आईसक्रीमचा प्रवास आज 300 कोटीच्या घरात पोहोचला आहे.

देशभरात नॅच्युरल्स आईसक्रीमची आहेत 135 दुकाने

लोकांच्या खाण्यापिण्याच्या आवडींची नस धरून रघुनंदन यांनी 200 चौरस फुटांच्या दुकानापासून सुरू केलाला नॅच्युरल्स आईसक्रीमचा प्रवास आज कोट्यावधी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. देशभरात नॅच्युरल्स आईसक्रीमची तब्बल 135 दुकाने आहेत. या दुकानांमध्ये एकावेळी आपल्याला सरासरी 20 चवींची आईसक्रीम्स चाखता येतात. आर्थिक वर्ष 2021मध्ये या कंपनीची एकंदर आर्थिक उलाढाल 300 कोटींच्या घरात होती. केपीएमजीच्या सर्वेक्षणात ग्राहकांच्या अनुभवांच्या आधारे या ब्रँडचा समावेश देशातल्या सर्वोच्च 10 ब्रँड्समध्ये करण्यात आला होता.

भवतालाचे निरीक्षण करून उभा केला आईसक्रीम ब्रँड

रघुनंदन कामत यांनी नॅच्युरल्स आईसक्रीमचे नाव घराघरात पोहोचवण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यांच्या वडिलांसारखी उत्तम फळे निवडणे असो किंवा त्यांच्या आईची ग्राहकांनी दिलेल्या प्रतिक्रियांचा गांभीर्याने विचार करण्याची सवय असो. या दोन देणग्यांच्या आधारे त्यांनी नॅच्युरल्स आईसक्रीमची उभारणी केली. आज त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा आणि मुले सिद्धांत आणि श्रीनिवास ही दोघेही कंपनीच्या व्यवस्थापकीय समितीत आहेत. त्यांचा 125 लोकांचा कर्मचारी वर्ग दररोज 20 टन आईसक्रीम तयार करतो.

अस्सल फळांच्या रसाच्या वापरावर दिला भर

फळे, साखर आणि दूध हा कामत यांचा हातखंडा होता. त्यांना आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्करच द्यायची नव्हती, तर त्यांचे उत्पादनही लोकांपर्यंत पोहोचवायचे होते. यासाठी त्यांनी तेव्हा वापरात असलेल्या फ्लेवर्सपासून फारकत घेतली आणि फळांच्या क्षेत्रातला त्यांचा अनुभव वापरून घेतला. अस्सल फळांच्या रसाच्या वापरावर त्यांनी भर दिला. त्यांच्या सिताफळ, शहाळे या फ्लेवर्सच्या आईसक्रीममध्येही खरीखुरी फळे वापरली जातात, कृत्रिम चवी नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी