aadhar card update status check । मुंबई : सध्याच्या घडीला आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जर तुमचे आधार नसेल तर अनेक ठिकाणी तुमचे सरकारी दरबारी काम होणार नाही. इतकेच नाही तर आधार आणि इतर कागदपत्रावरील माहितीमध्ये साधर्म्य नसेल तरीही पंचायत होण्याची शक्यता आहे. अशा वेळी आधारमधील माहिती बदलणे किंवा अपडेट करणे गरजेचे असते. आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख तसेच आपले जेंडर अपडेट करण्याचीही तरतूद आहे. जाणून घेऊया आधारवरील माहिती अपडेट करण्याचे काय आहेत नियम. (how many times you can update aadhaar information see UIDAI guidelines)
UIDAI ने जारी केलेल्या नियमांनुसार आधार युजर आपले नाव फक्त दोनच वेळा बदलू शकतात. UIDAIने यासंबंधी यापूर्वीच एक अधिसूचना जारी केली होती. जर तुम्हाला आपल्या आधारमधील नावात बदल करायचे असतील तर तुम्हाला फक्त दोनदाच बदल करत येतं. त्यानंतर आधारमधील नावात तुम्हाला बदल करता येणार नाही.
आधारमधील जन्मतारीख तुम्हाल कधीच बदलत येणार नाही. आधार कार्ड धारकाला आपल्या जन्मतारखेत बदल करता येत नाही. फक्त आधार कार्ड बनवताना जन्म तारीख चुकली असेल तर इतर दस्तएवजाचा दाखला देऊन ती चूक दुरुस्त करता येते. अशा प्रकारे तुम्ही आधार कार्डमध्ये आपली जन्मतारीख एकदा दुरुस्त करता येते.
आधार कार्डधारक आपला पत्ताही अपडेट करता येतो. परंतु आधार कार्डधारकाला एकदाच आपला पत्ता बदलता येतो. तसेच आधार कार्डधारकांना आपले जेंडर अपडेट करण्याचाही पर्याय देतात. परंतु पत्ता, जन्मतारीखप्रमाणे ही माहितीही एकदाच अपडेट करता येते.