CIBIL Score: घर खरेदी करण्यासाठी किती सिबिल स्कोअर असल्यास किती मिळणार होम लोन, जाणून घ्या...

CIBIL Score for Loan: घर असो किंवा कार असो कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी बँक किंवा वित्तीय संस्था या तुमचा सिबिल स्कोअर तपासतात. सिबिल स्कोअर चांगला असल्यास कर्जही स्वस्त मिळते आणि कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येत नाही.

how much Cibil score minimum requirement for home loan you should know financial tips in marathi
CIBIL Score: घर खरेदी करण्यासाठी किती सिबिल स्कोअर असल्यास किती मिळणार होम लोन, जाणून घ्या... 
थोडं पण कामाचं
  • कर्ज मिळवण्यासाठी चांगला सिबिल स्कोअर आवश्यक
  • किती सिबिल स्कोअर असल्यावर किती कर्ज मिळते?
  • तुमचा सिबिल स्कोअर किती?

CIBIL Score and Home Loan: आपल्या स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असे प्रत्येकाला वाटत असते. 2023 या वर्षात तुम्ही सुद्धा नवे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोअर नक्की जाणून घ्या कारण कोणतेही कर्ज देताना बँका तुमचा सिबिल स्कोअर तपासतात आणि त्यानुसार कर्ज दिले जाते. खर खरेदी करण्याची योजना आखणाऱ्या ग्राहकांसाठी एलआयसी हाऊसिंगने सिबिल स्कोअर निश्चित केला आहे. नोकरदार, व्यापाऱ्यांना घर, जमीन, दुकान, संपत्ती खरेदी करण्यासाठी एलआयसी कर्ज उपलब्ध करुन देते. कर्जाची रक्कम ही कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या सिबिल स्कोअरवर अवलंबून असते.

एलआयसी हाऊसिंग फायनान्सने नोकरदार आणि व्यापारी वर्गासाठी होमलोन दर रिवाइज करत काही अटी स्पष्ट केल्या आहेत. यामुळे तुम्ही जर होम लोन घेण्याचं नियोजन करत असाल तर लोन घेण्यापूर्वी अटी-शर्ती, लोन अमाऊंट आणि सिबिल स्कोअर याच्या संदर्भात माहिती करुन घ्या. एलआयसी हाऊसिंग फायनान्सने होम लोनवर व्याज दर हे संदर्भात डिसेंबर 2022 च्या शेवटच्या आठवड्यात रिवाइज केले आहेत.

हे पण वाचा : स्वप्नदोषाच्या समस्येने त्रस्त आहात? मग हे ट्राय करा

एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या वेबसाईटनुसार, बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट 16.45 टक्के इतका झाला आहे. कर्जदारांसाठी सामान्य व्याज दर 8.65 टक्के इतका ठेवण्यात आला आहे.

800 सिबिल स्कोअर असलेल्या प्रोफेशनल्ससाठी 15 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज 8.30 टक्के दराने मिळेल.

750-799 क्रेडिट स्कोअर असलेल्या नोकरदार प्रोफेशनल्ससाठी 8.40 टक्के या दराने 5 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज मिळेल.

700-749 सिबिल स्कोअर असलेल्या ग्राहकांना 8.70 टक्के दराने 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल.

700-749 सिबिल स्कोअरवर 50 लाख रुपयांपासून ते 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर 8.90 टक्के इतका व्याज दर आकारण्यात येईल.

हे पण वाचा : जुळी मुलं होण्याची ही आहेत लक्षणे

List of Important Documents of Home Loan

  1. पॅन कार्ड
  2. आधारकार्ड
  3. एनआरआय असल्यास पासपोर्ट आवश्यक
  4. नागरिकत्त्वाचा पुरावा
  5. सॅलरी स्लिप आणि फॉर्म - 16
  6. 6 ते 12 महिन्यांचं बँक स्टेटमेंट
  7. 3 वर्षांचं आयटीआर 
  8. प्रॉपर्टी ओनरशिप प्रूफ
  9. फ्लॅट असल्यास बिल्डर किंवा सोसायटीकडून अलॉटमेंट लेटर
  10. टॅक्स पेमेंट पावती

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी