Life Insurance : तुमच्यासाठी किती रकमेचा आयुर्विमा पुरेसा ठरेल? यासाठीची सूत्रे जाणून घ्या

Insurance Tips : आयुर्विमा हा आर्थिक नियोजनातील (Financial Planning)अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आयुर्विमा पॉलिसी (Life Insurance)हा एक प्रकारे विमा कंपनी आणि विमाधारक यांच्यातील एक करार आहे जो विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देतो. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा किंवा लाभार्थीचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला आर्थिक मदत मिळते. म्हणूनच प्रत्येक कमावत्या व्यक्तीसाठी आयुर्विम्याचे संरक्षण असणे अत्यंत आवश्यक आहे.

life insurance coverage
आयुर्विम्याची रक्कम किती असावी 
थोडं पण कामाचं
  • आयुर्विमा हा कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.
  • आपल्या पश्चात कुटुंबाच्या आर्थिक गरजांसाठीच्या पैशाची तजवीज आयुर्विम्यातून केली जाते.
  • आयुर्विमा नेमका किती रकमेचा असावा याची सूत्रे जाणून घ्या

Life insurance coverage : नवी दिल्ली: आयुर्विमा हा आर्थिक नियोजनातील (Financial Planning)अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आयुर्विमा पॉलिसी (Life Insurance) हा एक प्रकारे विमा कंपनी आणि विमाधारक यांच्यातील एक करार आहे जो विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देतो. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा किंवा लाभार्थीचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला आर्थिक मदत मिळते. म्हणूनच प्रत्येक कमावत्या व्यक्तीसाठी आयुर्विम्याचे संरक्षण असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र ते फक्त असून उपयोगाचे नाही तर पुरेसे आयुर्विमा संरक्षण असणेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. आता एक महत्त्वाचा प्रश्न जो बहुतेक वेळा अनुत्तरीत राहतो तो म्हणजे - माझ्यासाठी विमा संरक्षणाची (life insurance coverage) आदर्श रक्कम किती असेल? सोप्या भाषेत, याचे उत्तर त्या व्यक्तीकडेच आहे. ज्याला आयुर्विमा घ्यायचा आहे त्यांनी त्यांच्या आर्थिक गरजा आणि इच्छा बारकाई लक्षात घेतल्या पाहिजेत. तुमच्या आयुर्विम्याची रक्कम किती रक्कम असली पाहिजे ते जाणून घेऊया. (How much life insurance coverage do you need? check the details)

अधिक वाचा : EPFO Update: या तारखेला तुमच्या PF खात्यात येणार व्याजाचे पैसे, असा तपासा पीएफ बॅलन्स...

या महत्त्वाच्या मुद्द्याकडे पाहताना येथे काही घटक आहेत जे निर्णय घेण्यास मदत करू शकतात. आयुर्विमा संरक्षणाची रक्कम ठरवतानाचे मुद्दे आणि सूत्रे समजून घेऊया.

आयुर्विम्याची रक्कम किती असावी यावर प्रभाव टाकणारे घटक -

चालू वार्षिक उत्पन्न
आयुर्विम्या पॉलिसी खरेदी करू पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने प्रथम त्यांचे वार्षिक उत्पन्न तपासले पाहिजे. वार्षिक उत्पन्नाच्या 10 पट कव्हरेज ठरवताना अंगठ्याचा नियम वापरला जातो, तथापि, वाढत्या महागाई दर, राहणीमानात वाढ याविषयी विसरू नका. त्यामुळे, तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या जवळपास 20 पट विमा संरक्षण असणे चांगले होईल.

अधिक वाचा : SBI Update : स्टेट बॅंकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे ! बँकेत खाते असल्यास, लगेच बनवा हे कार्ड...नाहीतर जमा होणार नाहीत पैसे

जबाबदाऱ्या
तुमच्या आयुर्विम्या योजनेसाठी विम्याची रक्कम ठरविणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे जबाबदाऱ्या. लाइफ इन्शुरन्स पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची हमी देतो, कव्हरेज असे असले पाहिजे की ते कुटुंबातील सदस्यांना ही कर्जे फेडण्यास आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर जीवन जगण्यास मदत करेल.

आर्थिक उद्दिष्टे
कोणतीही गुंतवणूक आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन केली पाहिजे - नवीन खरेदी, घर, लग्न, शिक्षण इ. कारण, आयुर्विम्या पॉलिसीचा संपूर्ण मुद्दा पॉलिसीधारकाच्या निधनानंतर कुटुंबाच्या आर्थिक गरजा, कव्हरेज सुरक्षित करणे आहे. कमीत कमी मुलांचे शिक्षण आणि लग्न यांसारख्या महत्त्वाच्या खर्चाचा समावेश असावा.

अधिक वाचा : Credit Card Rule : जबरदस्त! आरबीआयचा नवा नियम...जर तुम्ही क्रेडिट कार्डधारक असाल तर असे झाल्यास बॅंका तुम्हाला दररोज देणार 500 रुपये

वय
लाइफ कव्हर विकत घेण्याचा निर्णय घेताना महत्त्वाचा घटक म्हणजे वय. म्हणजेच 25-35 वयोगटातील तरुण व्यक्ती जास्त रकमेचे विमा संरक्षण घेऊ शकतात कारण सध्या त्यांच्याकडे जास्त जबाबदाऱ्या नाहीत हे लक्षात घेऊन ते जास्त प्रीमियम भरू शकतात. जसजसे लोकांचे वय वाढत जाते तसतसे त्यांच्या जबाबदाऱ्या, भार वाढतात आणि त्यामुळे ते जास्त प्रीमियम देऊ नाहीत आणि त्यामुळे त्यांना मिळणारे विमा संरक्षण हे कमी रकमेचेअसेल.

शिवाय, आयुर्विम्या खरेदी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला त्यांना कोणत्या प्रकारची आणि किती गरज आहे याची जाणीव असणे आवश्यक आहे. पॉलिसी आणि त्यांच्यासाठी योग्य कव्हरेज निवडण्यात मदत करण्यासाठी व्यक्ती ऑनलाइन कॅल्क्युलेटर देखील वापरू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी