Monthly Saving Tips : पगार पुरतच नाही...मग कशी आणि किती बचत करावी? कुठे गुंतवायची? या आहे महत्त्वाच्या टिप्स

Financial Planning Tips : बहुतांश लोक पगार वाढेल, उत्पन्न वाढेल तेव्हा बचत करू असा विचार करतात. मात्र यातून प्रश्न सुटत नाही. बचतही होत नाही आणि गुंतवणूकदेखील (Investment) होत नाही. आर्थिक शिस्त (Financial Discipline)लावल्यास तुम्हाला जितका पगार असेल तितक्याच तुम्ही बचत करू शकता. यासाठी तुम्हाला नियोजन (Financial planning) आणि शिस्तीची आवश्यकता असते.

Salary Saving Tips
पगारातून बचत करण्यासाठीच्या टिप्स 
थोडं पण कामाचं
  • बचत न करणे हे नोकरदारांचे मोठे दुखणे
  • अनेकजण पगारवाढीची वाट पाहतात
  • दरमहा किती बचत करायची आणि कुठे गुंतवायची याच्या टिप्स

Financial Tips : नवी दिल्ली :  अनेकांना ही अडचण असते की दरमहा कमाई तर होते, ठीक ठाक पगार तर मिळतो मात्र बचतच (Savings) होत नाही. पैसा कुठे जातो हेच कळत नाही. नोकरदारांचे हे मोठे दुखणे असते. मग बहुतांश लोक पगार वाढेल, उत्पन्न वाढेल तेव्हा बचत करू असा विचार करतात. मात्र यातून प्रश्न सुटत नाही. बचतही होत नाही आणि गुंतवणूकदेखील (Investment) होत नाही. कारण ज्यांना वाटते पगार (Salary) वाढल्यावर किंवा कमाई वाढल्यावर बचत करू, ते कधीही बचत करू शकत नाहीत. बचतीसाठी लागणारा पगारवाढीची वाट पाहणे कधीही थांबत नाही. मात्र आर्थिक शिस्त (Financial Discipline)लावल्यास तुम्हाला जितका पगार असेल तितक्याच तुम्ही बचत करू शकता. यासाठी तुम्हाला नियोजन (Financial planning) आणि शिस्तीची आवश्यकता असते. जाणून घेऊया पगारातून बचत कशी करायची याच्या टिप्स. (How much money you should save from your salary, check the tips)

अधिक वाचा  : लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी करा हे तुळशीचे उपाय

20 हजार पगारवालेदेखील करू शकतात बचत (Monthly Salary Saving Tips)

जर तुमचा पगार 20,000 रुपये असेल तरीदेखील तुम्ही बचत करू शकता. यासाठी पहिले सूत्र असे की बचत करण्यासाठी पगार होताच एक निश्चित रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करावी. जर दुसरे बॅंक खाते नसेल तर ठरवून घ्या की एक निश्चित रकमेची तुम्ही बचत करणारच. त्या पैशांना हात लावायचा नाही. जर तुम्हाला हे थोडे कठीण वाटत असेल तर सुरूवातीला पगाराच्या फक्त 10 टक्केच रक्कम वाचवा. म्हणजेच जर 20 हजार रुपये पगार असेल तर सुरूवातीचे सहा महिने दरमहा फक्त 2,000 रुपयेच वाचवा.

अलीकडच्या काळात चांगला पगार मिळतो आहे. त्यामुळे 40,000 ते 50,000 रुपये पगार अनेकांना सहज मिळत असतो. जर तुमचा पगारदेखील 50,000 रुपये असेल तर आपण असे सूत्र समजून घेऊया ज्यामुळे तुम्हाला दरमहा चांगली बचत करता येईल. नेमकी किती बचत करायची आणि त्याची गुंतवणूक कशी करायची हे जाणून घ्या.

समजा तुमचे लग्न झालेले आहे आणि तुम्हाला दोन मुले आहेत. तरीदेखील तुम्ही या 50,000 रुपयांच्या पगारात बचत करू शकता. सर्वसाधारणपणे नोकरदारांनी आपल्या पगाराच्या जवळपास 30 टक्के रक्कम वाचवली पाहिजे. म्हणजेच 15,000 रुपयांची दरमहा बचत केली पाहिजे. जर तुम्ही दरमहा इतकी बचत करू शकला नाहीत तर तुम्हाला अपेक्षित असलेली रक्कम भविष्यात तुम्ही उभारू शकणार नाही. यासाठी तुम्हाला आर्थिक शिस्तीची आवश्यकता असणार आहे.

अधिक वाचा  : शरद पोंक्षेंची अंदमानातून राहुल गांधींवर टीका

सुरूवात 10 टक्के बचतीने

सुरूवातील मोठी बचत करणे अवघड जाते. म्हणून 10 टक्के बचतीपासून सुरूवात करा. यात दर 6 महिन्यांनी वाढ करा. म्हणजे लवकरच तुम्ही 30 टक्क्यांपर्यत बचत करू लागाल. सुरूवातीला यात अडचणी येतील, खर्चाची जुळवाजुळव करताना त्रास होईल. मात्र हळूहळू याची सवय होईल. काही महिन्यातच तुमची खर्चाची सवय बदलेल. यासाठी खरोखर काय आवश्यक आहे, त्याची प्राधान्यक्रमाची यादी बनवा. आपल्या दरमहा होणाऱ्या खर्चावर विचार करा. यातील जो खर्च टाळता येणे शक्य असेल तिथे त्या खर्चाला कात्री लावा. 

म्हणजेच जर तुम्हाला महिन्यातून चार वेळा हॉटेलमध्ये जेवायला जायची सवय आहे. तर त्यात कपात करून ती दोन वेळा करावी. अनावश्यक शॉपिंग टाळावी. दर महिन्याला कुठे आणि किती खर्च होतो याची यादी करावी. साधारणपणे प्रत्येक माणूस हा आपल्या उत्पन्नाच्या जवळपास 10 टक्के खर्च अनावश्यक बाबींमध्येच करत असतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या ऑनलाइन शॉपिंगचा काळ आहे. त्यातही क्रेडिट कार्ड सर्रास वापरले जाते. मात्र या ट्रॅपपासून स्वत:ला दूर ठेवा. कारण यामुळे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करण्याची शवय लागते. नंतर मग बिल भरता भरता नाकी नऊ येतात. घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग करत सतत काही ना काही मागवण्याची काहींना सवय असते. यातून दरमहिन्याला मोठा खर्च होत असतो. 

अधिक वाचा  : महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील,'शिवाजी तर जुने झाले'

घरातून बाजारात जाताना नेहमी एक यादी बनवून बाहेर पडा. त्या यादीनुसारच खरेदी करा. इतर अनावश्यक खरेदी टाळा. खासकरून वेगवेगळ्या ऑफरच्या मोहात फसू नका. असे केल्यास तुम्ही दरमहा चांगली बचत करू शकाल.

योग्य ठिकाणी गुंतवणूक करा

एकदा बचतीला सुरूवात झाल्यानंतर बचत केलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. साधारणपणे दरमहा 50,000 रुपये पगार असलेले लोक वर्षाकाठी 1.80 लाख रुपये वाचवू शकतात. जेव्हा तुम्ही दर महिन्याला 15,000 रुपयांची बचत करता. तेव्हा त्यातील साधारण 5,000 रुपये इमर्जन्सी फंडासाठी बाजूला ठेवावेत. याशिवाय 5,000 रुपयांची तुम्ही दरमहा म्युच्युअल फंडात एसआयपी करू शकता. याशिवाय 5,000 रुपये रिकरिंग डिपॉझिट, गोल्ड बॉंड यासारख्या योजनांमध्ये गुंतवू शकता. जर तुम्ही या पद्धतीने सातत्याने 10 वर्षे बचत आणि गुंतवणूक केली तर भविष्यात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. निवृत्तीनंतर आणि संकट काळात तुम्हाला हे पैसे उपयोगी पडतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी