Bullet Train Ticket Price: लोक बुलेट ट्रेनची (Bullet train) आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेनच्या (Train ) वेगापासून ते त्यांचे भाडे लोकांना जाणून घ्यायचे आहे. पहिली बुलेट ट्रेन मुंबई (Mumbai) ते अहमदाबाद (Ahmedabad) दरम्यान धावणार आहे. 2026 पर्यंत प्रवाशांसाठी ते सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. परंतु प्रत्यक्षात महाराष्ट्रात (Maharashtra) आतापर्यंत भूसंपादन (Land acquisition) न झाल्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम रखडले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, प्रवाशांच्या सोयीसाठी सरकार अहोरात्र काम करत आहे. या चर्चेदरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही बुलेट ट्रेनच्या भाड्याबाबत संकेत दिले होते.
रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, भाड्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण रेल्वेचे भाडे हे लोकांच्या आवाक्यात असेल. यासाठी फर्स्ट एसीचा आधार घेतला जात आहे, जो फारसा नसेल. म्हणजेच बुलेट ट्रेनचे भाडे फर्स्ट एसीच्या भाड्याच्या आसपास असू शकते.
बुलेट ट्रेनचे भाडे हवाई प्रवासापेक्षा कमी असेल आणि त्यात सुविधाही चांगल्या असतील, असेही रेल्वेमंत्र्यांनी संवादादरम्यान सांगितले. मात्र, बुलेट ट्रेनच्या भाड्याबाबत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच दुसरा हायस्पीड रेल्वे प्रकल्प सुरू होईल. बुलेट ट्रेनबाबत सरकार गांभीर्याने काम करत आहे.
Read Also : धावत्या लोकलमध्ये महिलेसोबत छेडछाड; प्रवाशांनी आरोपीला धुतला
मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान 508 किमी अंतरावर एकूण 12 स्थानके असतील. याशिवाय दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या बुलेट ट्रेनला गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात दोन थांबे असतील. या अंतर्गत दिल्लीतील सराय काले खान येथून निघाल्यानंतर त्याचा पहिला थांबा नोएडा सेक्टर-148 मध्ये असेल. दुसरा थांबा हा नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर असेल. म्हणजेच, यानुसार तुम्ही विमानतळावर अवघ्या 21 मिनिटांत पोहोचाल.
Read Also : लोकांच्या नोकऱ्या गेल्या पण मंत्र्यांच्या वाढल्या मालमत्ता
दिल्लीहून वाराणसीला जाण्यासाठी नोएडा सेक्टर-148, जेवार विमानतळ, मथुरा, आग्रा, इटावा, कन्नौज, लखनौ, रायबरेली, प्रतापगढ, भदोही, वाराणसी येथून एकूण 11 थांबे असतील.