Debit cards fraud | आपले डेबिट कार्ड कसे सुरक्षित ठेवाल? फ्रॉडपासून वाचण्याचे ५ सोपे उपाय

Debit card | मागील काही वर्षात प्रत्यक्ष बॅंकेत जाऊन व्यवहार करण्यापेक्षा डिजिटल बॅंकिंगचा (digital banking) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आर्थिक व्यवहार डिजिटल स्वरुपात होण्याचा वेग वाढल्यापासून डिजिटल फ्रॉड होण्याच्या प्रमाणातदेखील वाढ झाली आहे. डेबिट कार्डचा (debit card)वापर हा पैसे काढण्यसाठी, दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी, ऑनलाइन शॉपिंगसाठी, बिले भरण्यासाठी आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी केला जातो.

Debit card safety
डेबिट कार्ड सुरक्षितपणे वापरण्याच्या टिप्स 
थोडं पण कामाचं
  • डिजिटल बॅंकिंगचे वाढते स्वरुप
  • सायबर फ्रॉड किंवा डिजिटल फ्रॉडच्या संख्येत वाढ
  • डेबिट कार्ड सुरक्षितपणे कसे हाताळावे याच्या टिप्स

Debit cards security | नवी दिल्ली : मागील काही वर्षात डेबिट कार्डसंदर्भात होणाऱ्या फ्रॉड (Debit card fraud) प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. मागील काही वर्षात प्रत्यक्ष बॅंकेत जाऊन व्यवहार करण्यापेक्षा डिजिटल बॅंकिंगचा (digital banking) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आर्थिक व्यवहार डिजिटल स्वरुपात होण्याचा वेग वाढल्यापासून डिजिटल फ्रॉड होण्याच्या प्रमाणातदेखील वाढ झाली आहे. डेबिट कार्डचा (debit card)वापर हा पैसे काढण्यसाठी, दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी, ऑनलाइन शॉपिंगसाठी, बिले भरण्यासाठी आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी केला जातो. त्यामुळे डेबिट कार्डसंदर्भातील फ्रॉडदेखील मोठ्या प्रमाणात होतात. (How to avoid debit card fraud, see the easy 5 ways to tackle it)

डेबिट कार्ड फ्रॉड म्हणजे असे ट्रान्झॅक्शन जे तुमच्या परवानगीशिवाय किंवा तुमच्या माहितीशिवाय केले जाते. डेबिट कार्डचा वापर करून होणारे फ्रॉड कसे थांबवावेत. आपली कॅश कशी सुरक्षित ठेवावी, डेबिट कार्ड कसे सुरक्षितपणे हाताळेत हे जाणून घेऊया. 

१. स्टेटमेंट व्यवस्थित वाचा

अनेकवेळा डिजिटल फ्रॉड छोट्या छोट्या रकमेचे असतात. अशावेळी आपल्या ट्रान्झॅक्शन स्टेटमेंटला नीट बारकाईने पाहा. जर स्टेटबद्दल काही शंका वाटत असेल तर लगेच बॅंकेला कळवा.

२.  विश्वासू विक्रेत्याकडेच ट्रान्झॅक्शन करा

डेबिट कार्डचा वापर त्याच जागी करा जो ब्रॅंडेड आहे आणि विश्वासू विक्रेता आहे. डेबिट कार्डचा वापर करताना नीट लक्ष ठेवा

३. एटीएम ट्रान्झॅक्शनच्या वेळेस अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका

अनेकवेळा एटीएममध्ये डेबिट कार्डचा वापर करताना काही अडचणी येतात. अशावेळी पटकन अनोळखी व्यक्तीची मदत घेतली जाते. असे कधीही करू नका. शिवाय तुमचे ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यावर एटीएम मशीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यत वाट पाहा. शिवाय एकाच बॅंक खात्यात किंवा डेबिट कार्डमध्ये सर्व पैसे ठेवू नका. कारण तिथे फ्रॉड झाल्यास तुमचे सर्वच पैसे गायब होण्याची शक्यता असते.

४. डेबिट कार्डचा पासवर्ड, सीव्हीव्ही कोणालाही सांगू नका किंवा कोठेही लिहून ठेवू नका.

५. शक्यतो तुमच्या डेबिट कार्डचे डिटेल कोणत्याही वेबसाईटवर किंवा इतर कोठेही सेव्ह करू नका.

बॅंकेकडून मिळेल पूर्ण रिफंड

जर काही कारणास्तव तुमच्या डेबिट कार्ड किंवा बॅंक खात्यात फ्रॉड झाला तर सर्वात आधी बॅंकेला याची सूचना द्या. कार्डला ब्लॉक करा आणि पोलिसांकडे तक्रार करा. अशा परिस्थितीत सरळ सायबर सेललादेखील तक्रार केली जाऊ शकते. आरबीआयच्या नियमानुसार जर तुम्ही काहीही चूक केलेली नाही आणि काही कारणास्तव फ्रॉड झाला असल्यास बॅंकेकडून तुम्हाला पूर्ण रिफंड मिळेल.

बॅंकिंगचे स्वरुप बदलून डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाल्याने ग्राहकांना सुविधा तर मिळत आहेत. मात्र त्याचबरोबर नवनवीन धोकेदेखील निर्माण होत आहेत. आपल्या डिजिटल व्यवहारांसाठी इतरांवर अवलंबून न राहता आणि बेसावध न राहता आर्थिक व्यवहार करणे महत्त्वाचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी