Tips for investment: पोस्ट ऑफिसची स्कीम एनएससीमध्ये गुंतवणूक करून बना करोडपती

काम-धंदा
Updated Aug 11, 2020 | 17:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Become millionaire with this scheme: तुम्ही पोस्ट ऑफिसची स्कीम नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट(NSC)मध्ये गुंतवणूक करून करोडपती बनू शकता. 

rupeess
पोस्ट ऑफिसची स्कीम एनएससीमध्ये गुंतवणूक करून बना करोडपती 

थोडं पण कामाचं

  • पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट म्हणजे एनएससीमध्ये गुंतवणूक करा.
  • या स्कीमचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे. 
  • खाली दिलेल्या स्कीमच्या आधारे तुम्ही करोडपती बनू शकता. 

मुंबई: प्रत्येकाला करोडपती बनण्याची इच्छा असते. मात्र केवळ इच्छा असून भागत नाही. यासाठी प्रयत्नही करणे तितकेच गरजेचे असते. सरकार तुम्हाला अशी संधी देत आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही करोडपती बनू शकता. याआधी बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवून अथवा बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून तुम्ही चांगल्या रिटर्नच्या माध्यमातून करोडपती बनू शकत होतात. मात्र कोरोना काळात या स्कीम्सवर(scheme) मिळणारे व्याजदर(interest rate) कमी झाले. यातच तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे पोस्ट ऑफिसच्या योजना. नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट(national savings certificate) म्हणजेच एनएससीमध्ये(NSC) गुंतवणूक(Investment) करून तुम्ही करोडपती बनू शकता. 

एनएससीमध्ये गुंतवणूक करून बना करोडपती

पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट म्हणजेच एनएससीमध्ये गुंतवणूक केल्यास सध्या वर्षाला ६.८टक्के इतका व्याजदर मिळत आहे.या स्कीमची मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षे आहे.  या योजनेत जर तुम्ही दर महिन्याला १२५०० रूपये गुंतवताआणि जेव्हा पाच वर्षे पूर्ण होतील तेव्हा पुन्हा एनएससीमध्ये गुंतवा. जर तुम्ही सातत्याने २६ वर्षांपर्यंत अशी गुंतवणूक करत राहाल तर तुमच्याकडे एक कोटीहून अधिक पैसे जमा होतील. यासोबतच इनकम टॅक्सच्या कलम ८०सी अंतर्गत वर्षाला १.५ लाख रूपयांची टॅक्सवर सूटही मिळवू शकता.

एनएससी(NSC)टॅक्स सेव्हिंग्ज गुंतवणूक आहे

नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट एक टॅक्स सेव्हिंग सर्टिफिकेट आहे. ही स्कीम कोणताही भारतीय निवासी कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकतो. \

सध्या एनएससीवर ६.८ टक्के व्याजदर

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र(National Savings Certificate)वरील व्याजदर अर्थ मंत्रालयाकडडून दिलेल्या निर्णयानंतर वारंवार बदलत असतो. सध्या आर्थिक वर्ष २०२०-२१साठी एनएससी व्याजदर ६.८ टक्के आहे. गेल्या तिमाही(जानेवारी ते मार्च २०२०)मध्ये एनएससीचा दर ७.९ टक्के इतका होता. 

एनएससीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गरजेच्या गोष्टी

कोणताही भारतीय नागरिक एनएससीमध्ये गुंतवणूक करू शकते. एनएससीमध्ये कमीतकमी १०० रूपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. याची जास्तीत जास्त मर्यादा नाही. व्याज हे वार्षिक मिळते मात्र ती रक्कम मॅच्युरिटीच्या वेेस दिली जाते. यावर कोणताही टीडीएस कापला जात नाही. गुंतवणूकदार आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला नॉमिनी करू शकतो. एनएससीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फॉर्म भरणे गरजेचे असते. यासाठी गुंतवणूकदाराकडे आधार, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, फोटो असणे गरजेचे आहे. एनएससीला एका पोस्टातून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये अथवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर केले जाऊ शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी