WhatsApp वर एका क्लिकमध्ये बुकिंग करा LPG गॅस सिलेंडर, वाचा काय आहे प्रोसेस

LPG Cylinder booking via WhatsApp: तुम्ही एलपीजी गॅस सिलेंडरचं बुकिंग व्हॉट्सअपवरुन सहजपणे करु शकता. त्यासाठी तुम्हाला अवघ्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. जाणून घ्या ते कसे....

how to book lpg gas cylinder via whatsapp number bharat gas bpcl hpcl read tips in marathi
WhatsApp वर एका क्लिकमध्ये बुकिंग करा LPG गॅस सिलेंडर, वाचा काय आहे प्रोसेस 
थोडं पण कामाचं
  • WhatsApp वरुन बूक करा गॅस सिलेंडर
  • जाणून घ्या कोणत्या गॅस एजन्सीचा सिलेंडर कसा करावा बूक

How to book gas cylinder on WhatsApp: पूर्वी गॅस सिलेंडर बूक करायचं म्हणजे खूप त्रासदायक होतं. गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जाऊन गॅस बुकिंग करावा लागत असे. पण आता काळ बदलला आहे. तुम्ही कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सअपवरुन अगदी सहजपणे गॅस सिलेंडर बुकिंग करू शकता. 

जाणून घेऊयात एचपीसीएल (HPCL), बीपीसीएल (BPCL) आणि इंडियन ऑईलचे ग्राहक ऑनलाईन माध्यमातून आपला गॅस सिलेंडर कशा प्रकारे बुकिंग करु शकतात.

हे पण वाचा : गरोदरपणात चिंच खाल्ली तर काय होते?

बीपीसीएल ग्राहकांसाठी BPCL customers how to book gas cylinder via whatsapp

भारत पेट्रोलियम म्हणजेच बीपीसीएल किंवा भारत गॅसचे ग्राहक आपल्या नोंदणीकृत मोबाइलवरुन 1800224344 या नंबवरुन गॅस सिलेंडर बूक करु शकतात. यानंतर ग्राहकाला लगेचच व्हॉट्सअपवरच गॅस सिलेंडर बुक झाल्याचं कन्फर्मेशन मिळेल. तुम्ही गॅस सिलेंडरचं पेमेंट हे ऑनलाईन करु शकतात किंवा कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा करु शकतात.

हे पण वाचा : हे 7 पदार्थ खाल तर बनाल शक्तिमान

एचपीसीएल ग्राहकांसाठी HPCL customers how to book gas cylinder via whatsapp

HPSC ग्राहक कंपनीच्या अधिकृत व्हॉट्सअप क्रमांक 9222201122 यावरुन गॅस सिलेंडर बूक करु शकतात. त्यासाठी ग्राहकांनी आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन बूक असे लिहून व्हॉट्सअप करावे. एचबीसीएलच्या या व्हॉट्सअप नंबरवर गॅस सिलेंडर बूक करण्याव्यतिरिक्त तुम्ही इतर सुविधांचा सुद्धा लाभ घेऊ शकता.

हे पण वाचा : या सवयींमुळे ऐन तारुण्यात येतो हार्ट अटॅक, तुम्हाला आहेत का या सवयी?

इंडियन ऑईल

इंडियन ऑईलचे ग्राहकांनी आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरुन REFILL टाईप करुन 75888888 वर WhatsApp करावे. यानंतर तुमचा गॅस सिलेंडर बूक होईल. इतकेच नाही तर 7718955555 वर कॉल करुन तुम्ही सिलेंडर बूक करु शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी