7th Pay Commission:कसा ठरवला जातो महागाई भत्ता? जाणून घ्या यावेळी किती मिळणार फायदा

काम-धंदा
Updated Apr 06, 2021 | 15:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

7th Pay Commission: महागाई दरात वाढ झाल्यामुळे या वेळी सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे की त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाईल.

money
कसा ठरवला जातो महागाई भत्ता? जाणून घ्या किती मिळणार फायदा 

थोडं पण कामाचं

  • महागाई भत्ता  (Dearness allowance) केंद्र सरकार वेळेनुसार बदलत असते
  • कागदोपत्री कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता २१ टक्के इतका झाला आहे.
  • 7th Pay Commission अंतर्गत मिळणाऱ्या DA पूर्णपणे टॅक्सेबल असतो.

मुंबई: केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे सरकारने जून २०२१ पर्यंत महागाई भत्त्यातील वाढ रोखली होती. मात्र लवकरच यावर लावण्यात आलेली सीलिंग हटवण्यात येणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचे तीन हप्ते दिले जाणार आहेत. महागाई दरात वाढ केल्यामुळे यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे की त्यांच्या महागाई भत्त्यात सर्वाधिक वाढ होईल. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना मिळणारा सॅलरीचा एक भाग असतो. हा कर्मचाऱ्यांच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंगवर अवलंबून असतो. 

महागाई भत्ता  (Dearness allowance) केंद्र सरकार वेळेनुसार बदलत असते. याचे गणिक बेसिक पेच्या आधारावर टक्क्यांमध्ये गणले जाते. आता कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना १७ टक्के महागाई भत्ता दिला जातो. यात ४ टक्के वाढ गेल्या जुलैमध्ये झाली होती. मात्र कोरोना महामारीमुळे ही वाढ स्थगित करण्यात आली होती. कागदोपत्री कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता २१ टक्के इतका झाला आहे. मात्र ४ टक्क्यांचा हा गॅप अद्याप त्यांना दिला गेलेला नाही. आता जानेवारीमध्ये आलेल्या AICPI च्या आकड्यानुसार यात वाढ होण्याची शक्यता आहे. वर्षातून दोन वेळा DA घोषित केला जातो पहिला हप्ता जानेवारी ते जून पर्यंत आणि दुसरा हप्ता जुलै ते डिसेंबरपर्यंत दिला जातो. 

जाणकारांच्या मते 7th Pay Commission अंतर्गत मिळणाऱ्या DA पूर्णपणे टॅक्सेबल असतो. म्हणजेच जितकी रक्कम महागाई भत्त्यांच्या नावावर दिली जाते ती रक्कम टॅक्सेबल असते. 

असे केले जाते DAचे कॅलक्युलेशन

DA ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स (AICPI)शी लिंक असते. याच्या फॉर्म्युलामध्ये AICPI ची सरासरी घेतली जाते. 
DA% = ((AICPI ची सरासरी (आधार वर्ष २००१=१००) गेल्या १२ महिन्यांसाठी-११५.७६)/११५.७६)X१००

शहराच्या आधारावर ठरवला जातो डीए

डीए कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाच्या जागेवरून ठरवला जातो. शहरी भागांसाठी डीए जास्त असतो तर निम शहरी आणि ग्रामीण भागासाठी डीए कमी असतो. 

PSU कर्मचाऱ्यांसाठी असा ठरवला जातो डीए

जर PSU (पब्लिक सेक्टर यूनिट्स)मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी महागाई भत्त्याबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्या कॅलक्युलेशनचे गणित असे असते. 

महागाई भत्ता टक्क्यामध्ये = (गेल्या ३ महिन्यांचा उपभोक्ता मूल्य सूचकांकची सरासरी( (Base Year 2001=100)-126.33))*100

पेन्शनधारकांचा असा घेतला जातो निर्णय

वेतन आयोगाकडून जेव्हा सॅलरी स्ट्रक्चर रिव्हाईज्ड केले जाते तेव्हा सेवानिवृ्त्त कर्मचाऱ्यांच्या डीएमध्येही बदल होतो. याचप्रमाणे जेव्हा डीएमध्ये वाढ केली जाते तेव्हा त्या दरानुसार पेन्शनधारकांच्या डीएमध्येही वाढ केली जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी