Aadhaar Pan Link Status: तुमचा पॅन कार्ड आधारसोबत लिंक आहे की नाही, हे सेकंदात करू शकता चेक

काम-धंदा
Updated Mar 28, 2023 | 21:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pan Adhaar Link Status Online : आयकर विभागच्या ई - फायलिंग पोर्टल वर जाऊन तुम्ही तुमचा पॅन आधार कार्डसोबत जोडला आहे की नाही याबद्दलची माहीती घेऊ शकता. पॅनला आधार सोबत लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. 

आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जाणून घ्या पॅन- आधार लिंक स्टेटस
31 मार्च 2023 आहे पॅन आधारबरोबर लिंक करण्याची शेवटची तारीख  |  फोटो सौजन्य: Shutterstock
थोडं पण कामाचं
  • आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जाणून घ्या पॅन- आधार लिंक स्टेटस
  • 31 मार्च 2023 आहे पॅन आधारबरोबर लिंक करण्याची शेवटची तारीख
  • पुढील महिन्यामध्ये लिंक केले जाणार नाही, आणि पॅन अवैध होणार

Pan Adhaar Card Link Deadline नवी दिल्ली: पॅनला आधारसोबत जोडण्याची शेवटची तारीख आता केवळ दोन दिवसांवर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे बहुतांश लोक लवकरात लवकर आपले पॅन कार्ड आधारला जोडण्यात गुंतले आहे. तत्पूर्वी, आपला पॅन आधारला लिंक आहे की नाही याबद्दलची नेमकी माहिती कुठे मिळेल? याची देखील एक प्रोसेस आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पॅन-आधार लिंकचा स्टेटस पडताळू शकता. How to Check Pan Card  with Aadhaar Card linking status online. 

अधिक वाचा : ​New rules:1 एप्रिलपासून लागू होणार 'हे' नवे नियम

आम्ही तुम्हाला याबद्दलच्या पूर्ण प्रोसेस बद्दल सांगणार आहोत. आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ आहे. या तारखेपर्यंत तुमचे पॅनकार्ड आधारशी लिंक केले नाही तर ते निरुपयोगी होईल. अवैध पॅन कार्ड वापरल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. तसेच, तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टी करू शकणार नाही.

पॅन-आधार लिंकचे स्टेटस कसे तपासायचे ?

  1. सर्वप्रथम, तुम्हाला आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल. त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे- https://www.incometax.gov.in/iec/foportal
  2. यानंतर तुम्हाला सर्वात वर दिलेल्या 'Link Aadhaar Status' वर क्लिक करावे लागेल.
  3. आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल, त्यावर म्हाला तुमचा पॅन नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकावा लागेल.
  4. आता खाली उजव्या बाजूला दिसत असलेल्या 'View Link Aadhaar Status' वर क्लिक करा. 
  5. जर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल, तर तुमच्या समोर  PAN not linked with Aadhaar. Please click the "Link Aadhaar" असा संदेश दिसून येईल.  दुसरीकडे, तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक असल्यास, "Your Aadhaar is linked with PAN" असा संदेश दिसेल. 

अधिक वाचा : नैसर्गिकरित्या 7 दिवसात वजन कमी करण्याच्या टिप्स

३१ मार्चपर्यंत पॅन-आधार लिंक केले नाही तर ?

जर तूमचे पॅनकार्ड 31 मार्चच्या आत आधारसोबत लिंक झाले नाही तर ते निरुपयोगी होऊन जाईल. आयकर कायदा, 1961 अंतर्गत, पॅन दिले नसल्याच्या बरोबर ते जबाबदार धरले जाईल.  त्यानंतर जिथे पॅन कार्डची आवश्यकता भासते, अशा ठिकाणी तुम्ही तूमचे आर्थिक काम करू शकणार नाही. पुढील महिन्यापासून तुम्ही म्युच्युअल फंड, स्टॉक आणि बँक खाती उघडण्यासारख्या गोष्टी करू शकणार नाही. आयकर कायद्याच्या कलम 272B अंतर्गत, अवैध पॅन वापरल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड भरावा लागेल.  


  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी