Ration Card | तुमचे रेशन कार्ड कसे चेक कराल? जाणून घ्या

Ration Card | अन्नधान्य पुरवठा विभागाने (Food, Civil Supplies and Consumer Protection Department) रेशन कार्डाची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे.आता कोणतीही व्यक्ती आपल्या मोबाइल किंवा कॉम्प्युटरद्वारे गावातील रेशन कार्डची लिस्ट चेक करू शकतात. मात्र बहुतांश लोकांना रेशन कार्ड चेक करण्याची ऑनलाइन प्रक्रिया अद्याप माहित नाही. रेशन कार्ड चेक करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्या.

How to check Ration Card
रेशन कार्डची माहिती कशी तपासावी 
थोडं पण कामाचं
  • रेशन कार्डची माहिती मिळवा ऑनलाइन स्वरुपात
  • घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने तपासा तुमचे रेशन कार्ड
  • अन्नधान्य पुरवठा विभागाने ऑनलाइन उपलब्ध करून दिली माहिती

How to check Ration Card | नवी दिल्ली : एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रेशन कार्ड (Ration Card) दिले जातात. मात्र अनेकांना ठाऊक नसते की त्यांच्या रेशन कार्डमध्ये नेमकी काय माहिती आहे. जर तुम्हाल आपले रेशन कार्ड चेक करायचे असेल आणि जाणून घ्यायचे असेल की यामध्ये तुमचे नाव आहे की नाही तर तुम्ही ते सहजपणे घरबसल्या ऑनलाइन चेक करू शकता. अन्नधान्य पुरवठा विभागाने (Food, Civil Supplies and Consumer Protection Department) रेशन कार्डाची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. (How to check your Ration card details? see the details)

आता कोणतीही व्यक्ती आपल्या मोबाइल किंवा कॉम्प्युटरद्वारे गावातील रेशन कार्डची लिस्ट चेक करू शकतात. मात्र बहुतांश लोकांना रेशन कार्ड चेक करण्याची ऑनलाइन प्रक्रिया अद्याप माहित नाही. रेशन कार्ड चेक करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्या.

रेशन कार्डची माहिती अशी मिळवा-

  1. स्टेप १- रेशन कार्ड चेक करण्याची वेबसाइटवर जा.आपले रेशन कार्ड चेक करण्यासाठी सर्वात आधी रेशन कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जा. यासाठी mahafood.gov.in या वेबसाइटवर जा. 
  2. स्टेप २- महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर गेल्यावर उजव्या बाजूला ऑनलाइन सर्व्हिसेस पर्याय सिलेक्स करा. इथे सर्वात आधी पहिल्या ऑप्शनवर ऑनलाइन फेअर प्राइस शॉप्स आणि मराठीमद्ये ऑनलाइन रास्तभाव दुकानाला सिलेक्ट करा.
  3. स्टेप ३ - यानंतर एक नवीन विंडो सुरू होईल. इथे AePDS-All Districts चा पर्याय असेल. त्यानंतर AePDS मधील सर्व जिल्ह्यांच्या पर्यायावर क्लिक करा.
  4. स्टेप ४ आता पुन्हा एक नवीन वेब पोर्टल ओपन होईल. इथे डाव्या बाजूस रिपोर्ट सेक्शन मिळेल. याच्या खाली RC Details हा पर्याय असेल. रेशन कार्ड लिस्टमध्ये नाव पाहण्यासाठी या पर्यायावर क्लिक करा.
  5. स्टेप ५ यानंतर स्क्रीनवर तुम्हाला SRC Number विचारला जाईल. RC Details चेक करण्यासाठी SRC Number भरून सब्मिट करा.
  6. स्टेप ६ SRC नंबर भरून सब्मिट केल्याबरोबर, रेशन कार्ड डिटेल्स स्क्रीनवर येतील. यामध्ये Member Details, Entitlement for RC आणि Transaction Details for RC चेक करता येतील. 

या पद्धतीने तुम्ही घरबसल्या ऑनलाइन रेशन कार्डची माहिती घेऊ शकता आणि तपासू शकता की तुमचे नाव रेशन कार्डमध्ये आहे की नाही. सध्या तुमच्या रेशन कार्डचे काय स्टेटस आहे. 

रेशन कार्ड लिस्ट २०२२ चेक करण्याची दुसरी देखील एक पद्धत आहे. तुम्हाला जिल्हावार यादी मिळणार नाही मात्र SRC नंबरद्वारे तुम्ही माहिती घेऊ शकाल. यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या लाभाचे विवरण मिळू शकेल. यासाठी rcms.mahafood.gov.in ही वेबसाइट ओपन करा. रेशन कार्डची माहिती मिळवण्यासाठी नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्रॅमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यासाठी rcms.mahafood.gov.in ही वेबसाइट वापरा. त्यानंतर Know Your Ration Card हा पर्याय निवड. मेनूमध्ये रेशन कार्ड या पर्यायाचा वापर करा. यानंतर RC Details पर्यायाचा वापर करा. यानंतर SRC Number भरून सब्मिट करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी