PM Kisan eKYC | पीएम किसानच्या 11 व्या हप्त्यासंदर्भात मोठे अपडेट, ही सुविधा सुरू

PM Kisan 11th installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे ( PM Kisan Yojana)लाभार्थी 11 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकारने 11 वा हप्ता जारी करण्यापूर्वी लाभार्थींना केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. अनेकांना याची काळजी वाटते. आता केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रांना भेट देण्याची गरज नाही.

PM Kisan Samman Nidhi Yojana
पीएम किसान सम्मान निधी योजना 
थोडं पण कामाचं
  • पीएम किसान योजनेसाठी ईकेवायसी बंधनकारक
  • 31 मे पूर्वी ई-केवायसी ईकेवायसी पूर्ण करावी लागणार
  • लवकरच जारी होणार पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता

How To Complete eKYC for PM Kisan : नवी दिल्ली :  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे ( PM Kisan Yojana)लाभार्थी 11 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकारने 11 वा हप्ता जारी करण्यापूर्वी लाभार्थींना केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. अनेकांना याची काळजी वाटते. आता केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रांना भेट देण्याची गरज नाही. म्हणजेच तुम्ही घरी बसूनही केवायसी पूर्ण करू शकता. घरबसल्या पीएम किसान योजनेचे केवायसी कसे पूर्ण करायचे त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. (How to complete eKYC for PM Kisan Yojana, check the details)

अधिक वाचा : Jeff Bezos on Musk | इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यावर, जेफ बेझॉस यांना चीनबद्दल आहे मोठी शंका...पाहा काय आहे प्रकरण

OTP प्रमाणीकरण सुरू

यासाठी तुमचा आधार आणि मोबाईल नंबर लिंक करावा. जर या दोन्ही लिंक असतील तर तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवरून ओटीपीद्वारे ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता. पीएम किसान पोर्टलवर आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण काही दिवसांसाठी थांबवण्यात आले होते, जे आता पुनर्संचयित करण्यात आले आहे.

31 मे पूर्वी पूर्ण करा ई-केवायसी

तुम्ही पीएम किसानशी संबंधित ई-केवायसी अद्याप पूर्ण केले नसेल, तर तुमचा 11 वा हप्ता थांबू शकतो. पीएम किसान पोर्टलवर आधार आधारित ई-केवायसी पुन्हा सुरू करण्यात आले आहे. वास्तविक, सरकारने ई-केवायसी नियम बंधनकारक केले आहेत.

अधिक वाचा : Gold price today | घसरणीनंतर सोन्याच्या भावात झाली वाढ तर चांदीची चमकदेखील वाढली, पाहा ताजा भाव

ई-केवायसी कसे पूर्ण करावे

  1. प्रक्रिया क्रमांक 1: सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर PM किसान वेबसाइट (pmkisan.gov.in) उघडा. येथे उजव्या बाजूला e-KYC ची लिंक दिसेल.
  2. प्रक्रिया क्रमांक 2: येथे आधार (AADHAAR) शी लिंक केलेला मोबाइल नंबर प्रविष्ट करा आणि शोध बटणावर टॅप करा.आता तुमच्या मोबाईलवर 4 अंकी OTP येईल. दिलेल्या बॉक्समध्ये टाईप करा.
  3. प्रक्रिया क्रमांक 3: तुम्हाला पुन्हा आधार प्रमाणीकरणासाठी बटण टॅप करण्यास सांगितले जाईल. त्यावर टॅप करा आणि आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर आणखी 6 अंकी OTP येईल. ते भरा आणि सबमिट वर टॅप करा.
  4. प्रक्रिया क्रमांक 4: यानंतर तुमचे eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid लिहिले जाईल. असे झाल्यास, तुम्ही आधार सेवा केंद्राला भेट देऊन ते दुरुस्त करू शकता. eKYC आधीच केले असल्यास, eKYC आधीच पूर्ण झाले आहे असा संदेश प्रदर्शित केला जाईल.

अधिक वाचा : LIC IPO Date | इंतजार खत्म ! 4 मे ला येणार एलआयसीचा आयपीओ... सोडू नका सरकारच्या दुभत्या गाईकडून कमाईची मोठी संधी...7 महत्त्वाच्या गोष्टी

30 जूनपर्यंत सोशल ऑडिट केले जाणार 

1 मे ते 30 जून दरम्यान शासनाकडून सोशल ऑडिट करण्यात येत असल्याचेही वृत्त आहे. या ऑडिटमध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून पात्र व अपात्र लोकांची माहिती संकलित केली जाणार आहे. यानंतर, यादीतून अपात्रांची नावे काढून टाकली जातील आणि पात्र लोकांची नावे जोडली जातील.

11वा हप्ता कधी येणार

पात्र शेतकऱ्यांच्या हस्तांतरणाच्या विनंतीवर (RFT) राज्य सरकारांनी स्वाक्षरी केली आहे. यानंतर FTO जनरेट होईल. यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू होईल. केंद्र सरकारच्या या योजनेत 12.5 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी