How to get Voter Id Card: नवी दिल्ली : आपल्या देशात निवडणुकांची धामधूम सतत सुरूच असते. कोणत्या कोणत्या प्रकारच्या निवडणुका (Elections) आणि मतदान (Voting)होतच असते. अशावेळी मतदानासाठी मतदान ओळखपत्र महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर मतदार यादीत तुमचे नाव असणेदेखील आवश्यक असते. तुमचे नाव मतदार यादीत आहे मात्र तुमच्याकडे मतदान ओळखपत्र (Voter Id Card) नसेल तरी चिंता करण्याचे कारण नाही. निवडणूक आयोगाने यासाठी मतदारांना एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदार ओळखपत्र तुम्ही ऑनलाइन स्वरुपात डाउनलोड करू शकता. तुम्ही मतदार कार्ड e-EPIC ची PDF आवृत्ती डाउनलोड करू शकता. मतदार ओळखपत्र (Voter Card) कसे डाउनलोड करायचे त्याबद्दल जाणून घ्या. (How to download voter Card online read in Marathi)
अधिक वाचा : तुम्ही सुद्धा ब्रेड खाता? मग हे वाचाच, अन्यथा....
निवडणूक आयोगाकडून मतदारांना e-EPIC डाउनलोड करण्याची सुविधा मिळते. e-EPIC ही तुमच्या मतदार ओळखपत्राची PDF आवृत्ती आहे. तुम्ही ही कॉपी तुमच्या फोनमध्ये साठवू शकतात. त्याचबरोबर हवे असल्यास तुम्ही डिजीलॉकरवर ई-एपिक कार्ड देखील अपलोड करू शकता. याला तुम्ही प्रिंट करू शकता आणि लॅमिनेट देखील करू शकता. हे कसे डाउनलोड करायचे त्याबद्दल पाहा.
अधिक वाचा : या आयुर्वैदिक उपचाराने अॅसिडिटीला करा बाय-बाय
अधिक वाचा : लहान मुलांसाठी मनुक्याचे असंख्य फायदे
हे डिजिटल वोटर आयडी कार्ड तुम्हाला पुन्हा मतदार ओळखपत्र परत मिळवण्यासाठी किंवा पत्ता बदलण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा देते. जरी तुमचा पत्ता बदलला असला तरी चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही NVSP च्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने पत्ता बदलण्यासाठी अर्ज करू शकता. नवीन पत्त्याची माहिती दिल्यानंतर तुम्ही पुन्हा मतदार ओळखपत्र डाउनलोड करू शकता.
डिजिटल सेवांचे महत्त्व लक्षात घेऊन सरकार अनेक सुविधा आणि दस्तावेज ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध करून देते आहे. त्यामुळे अलीकडच्या बहुतांश कामे ऑनलाइन स्वरुपात करणे सोपे झाले आहे.