यूट्यूब (YouTube)ने घरबसल्या कमाई करा, जाणून घ्या कशी करायची सुरूवात

काम-धंदा
Updated Apr 08, 2021 | 15:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

Youtube money making tips- चांगले व्हिडिओ बनवून त्यांना यू-ट्यूबवर अपलोड करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. हे काम तुम्ही पार्ट टाईम किंवा फूल टाईमच्या स्वरुपात सुरू करू शकता.

How to make money on You Tube
यूट्यूबवर कमाई कशी कराल, जाणून घ्या 

थोडं पण कामाचं

  • यूट्यूबद्वारे कमाई करण्याची संधी
  • यूट्यूब चॅनल कसे सुरू करावे
  • बनवा दर्जेदार व्हिडिओ आणि करा कमाई

नवी दिल्ली : यूट्यूब (YouTube)हे आता फक्त मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही. याच्या माध्यमातून आता चांगली कमाईदेखील केली जाऊ शकते. यूट्यूब हे आपल्यातील कलाकौशल्य दाखवण्यासाठीचे एक मोठे व्यासपीठ आहे. तुम्ही चांगल्या दर्जाचे व्हिडिओ बनवून ते यूट्यूबवर अपलोड करून चांगली कमाई करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हे काम फक्त पार्ट टाईमच नाही तर पूर्णवेळदेखील करू शकता. जर तुम्हाला यूट्यूबर बनून पैसा कमवायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल सुरू करून तुम्ही चांगली कमाई सुरू करू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून कमाई कशी करायची आणि त्यासाठी कोणकोणत्या बाबींची खबरदारी घ्यायची हे समजून घेऊया...

यूट्यूब चॅनल कसे सुरू करावे


यूट्यूबद्वारे कमाई करायची असेल तर तुमचे यूट्यूब चॅनल सुरू करावे लागेल. आपल्या Gmail आयडीच्या मदतीने तुम्हाला यूट्यूबवर लॉग इन करावे लागेल. सर्च बारच्या उजव्या बाजूला तुमचे अकाउंट असते. तिथे 'माय चॅनल' या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या आवडीचे नाव देऊ शकता. नाव देताना तुमच्या चॅनलचे नाव हे अनोखे किंवा वेगळे असले पाहिजे आणि त्याच नावाचे चॅनल आधीच अस्तित्वात नसावे हे लक्षात ठेवले पाहिजे.

तुमच्यातील कलाकौशल्ये ओळखा


यूट्यूबवर तुमचे चॅनल सक्षमपणे चालवण्यासाठी एक कंटेट किएटर म्हणून तुम्हाला इंटरनेट, कॅमकॉर्डर याशिवाय एडिटिंगची बेसिक माहिती असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त तुमच्यातील कलागुण तुम्ही ओळखे अत्यंत महत्त्वाचे आहे. चॅनल सुरू करण्याआधीच हे ठरवा की तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. एकदा हे निश्चित झाले की मग यूट्यूब चॅनल सुरू करा. तुमच्या Gmailद्वारे तुमचे यूट्यूब चॅनल सुरू होते.

तुमची कल्पना अनोखी हवी


यूट्यूबवर रोज लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. त्यामुळे तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहावा यासाठी त्यात काहीतरी वेगळेपण आवश्यक आहे. आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि प्रेक्षकांना आवडतील असे व्हिडिओ बनवून तुम्ही आपल्या व्हिडिओची प्रेक्षकसंख्या वाढवू शकता. त्याचबरोबर व्हिडिओचा दर्जा हा उत्तम असेल याची काळजी घ्या. कमी दर्जाचे व्हिडिओ प्रेक्षक सहसा पाहात नाहीत.

व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा


एकदा चॅनल सुरू केले की व्हिडिओ अपलोड करण्यास सुरूवात करावी. तुम्हाला जर यूट्यूबच्या माध्यमातून कमाई करायची असेल तर आठवड्यातून एक किंवा दोन व्हिडिओ अपलोड केले पाहिजेत. जास्त व्हिडिओ अपलोड केल्यास तुमच्या चॅनलची एकूण प्रेक्षकसंख्या वाढत राहील. व्हिडिओ अपलोड करताना कॉपी राईट, मीडियाशी संबंधित नियम यांची खबरदारी घ्या.

डिझाईनसुद्धा आवश्यक


तुमच्या यूट्यूब चॅनलच्या पेजचे डिझायनिंगसुद्धा महत्त्वाचे आहे. कारण त्यातूनच तुमची कल्पकता दिसते. यूट्यूबवर अनेक लेआऊट आणि डिझाईन टेम्प्लेंट्स उपलब्ध असतात. त्यांच्या आधारे प्रेक्षकांना आवडेल आणि सोपे वाटेल असे चॅनल लेआऊट बनवावे.

प्रत्येक व्हिडिओ मॉनेटाईज करा


मॉनेटायझेशनची परवानगी मिळाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मॉनेटायझेशन (enable) एनेबल किंवा सुरू करावे लागेल. एडिट व्हिडिओ ऑप्शनमध्ये जाऊन ते सुरू करता येते. मॉनेटायझेशन एनेबल झालेले असेल तरच तुम्हाला कमाई करता येईल.

४५:५५ गुणोत्तरात पैशाचे वाटप


यूट्यूब चॅनलवरून जी काही कमाई होते त्याचा ४५ टक्के हिस्सा यूट्यूबकडे जातो तर उरलेला ५५ टक्के हिस्सा तुम्हाला मिळतो. जर तुमच्या चॅनलवर जाहिरात प्रसारित होत असेल तर त्यातून तुम्हाला हे पैसे मिळत असतात. तुमच्या चॅनलला जाहिराती तेव्हाच मिळतात जेव्हा तुमच्या चॅनलची प्रेक्षकसंख्या वाढत असते.

बॅंकखात्याची माहिती


तुम्हाला मॉनेटायझेशनची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही गुगल अॅडसेन्सच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या ईमेल आयडीने लॉग ईन करावे. तिथे तुमचे बॅंकखाते, पत्ता आणि इतर माहिती भरावी. यूट्यूब तुम्हाला पैसे तेव्हाच पाठवते जेव्हा तुमच्या व्हिडिओद्वारे तुमची कमाई किमान १०० डॉलर इतकी झालेली असेल. तुमची कमाई १०० डॉलरवर पोचली की गुगल तुम्हाला भारतीय चलनात १०० डॉलर पाठवते. ही रक्कम त्यावेळेच्या डॉलर आणि रुपयाच्या मूल्यावर अवलंबून असते. पेमेंट पाठवण्याआधी गुगल तुम्हाला एक पिन पाठवते, त्याचे व्हेरिफिकेशन झाले की पेमेंट तुमच्या खात्यात पाठवले जाते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी