LPG Gas Cylinder : तुम्हाला मिळू शकतो 200 रुपयांनी स्वस्त एलपीजी गॅस सिलिंडर, करा फक्त हे काम...

LPG Subsidy : सतत वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) नुकतीच मोठी घोषणा केली होती. यावर्षी, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PM Ujjwala Yojana)करोडो लाभार्थ्यांना एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी (LPG Gas Subsidy)देण्याचा निर्णय घेतला आहे. 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना 12 एलपीजी गॅस सिलिंडरसाठी याचा लाभ मिळणार आहे.

PM Ujjwala Yojana
पंतप्रधान उज्ज्वला योजना 
थोडं पण कामाचं
  • अलीकडेच अर्थमंत्र्यांनी सिलिंडरवर सबसिडी देण्याची घोषणा केली होती.
  • 200 रुपयांच्या अनुदानामुळे वार्षिक 6100 कोटी रुपयांच्या महसुलावर परिणाम होईल.
  • सरकारने 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती.

PM Ujjwala Yojana Application: नवी दिल्ली : सतत वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) नुकतीच मोठी घोषणा केली होती. यावर्षी, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PM Ujjwala Yojana)करोडो लाभार्थ्यांना एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी (LPG Gas Subsidy)देण्याचा निर्णय घेतला आहे. 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना 12 एलपीजी गॅस सिलिंडरसाठी याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, सबसिडीचा (PM Ujjwala Yojana Eligibility) लाभ कोणाला मिळणार यासारखे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊया- (How to get benefit of PM Ujjwala Yojana, check the details)

अधिक वाचा : SBI New Feature: स्टेट बॅंकेच्या ग्राहकांचा जबरदस्त फायदा, आता घर बसल्या मिळणार 35 लाखांपर्यंतचे कर्ज...पाहा कसे

उज्ज्वला योजनेसाठीची पात्रता (PM Ujjwala Yojana Eligibility)

  1. या सरकारी योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात.
  2. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे.
  3. त्याच घरात इतर कोणत्याही तेल कंपनीचे एलपीजी कनेक्शन नसावे.
  4. फक्त SC, ST, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), अतिमागास वर्ग, अंत्योदय अन्न योजना, वनवासी, बेट रहिवासी, गरीब कुटुंबे इत्यादींनाच याचा लाभ घेता येईल.

अधिक वाचा :  Gold-Silver Rate Today, 24 May 2022: अमेरिकन शेअर बाजाराने रोखली सोन्याच्या भावातील तेजी, चांदीच्या भावातदेखील थोडीशी वाढ, पाहा ताजा भाव

उज्ज्वला योजनेचा फायदा कसा घ्यावा? (How to Apply Pradhan Mantri Ujjwala Yojana)

ऑनलाइन मोडद्वारे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्ही ऑनलाइन अर्जाद्वारे नावनोंदणी करू शकता. अर्ज सबमिट करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्राशीही संपर्क साधू शकता.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्ही डिस्ट्रिब्युटरशिपद्वारे अर्ज सबमिट करून नावनोंदणी करू शकता.

हे नमूद केले जाऊ शकते की प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 अंतर्गत नोंदणी केलेल्या कनेक्शनसाठी आधार प्रमाणीकरण बायोमेट्रिक किंवा मोबाइल OTP द्वारे केले जाते. या सरकारी योजनेअंतर्गत अर्जदार १४.२ किलो सिंगल सिलिंडर किंवा ५ किलो सिंगल सिलिंडर किंवा ५ किलो डबल सिलिंडर कनेक्शनमधील कोणताही पर्याय निवडू शकतो.

अधिक वाचा : Restaurant Service Charges: आता रेस्टॉरंटमध्ये जेवण होणार स्वस्त, ग्राहकांना द्यावा लागणार नाही सर्व्हिस चार्ज; सरकारचा नवा आदेश जाणून घ्या 

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर महागले

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या लढाईमुळे तेल आणि गॅस उद्योगावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीमुळे भारतात कंपन्यांनी घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरची किंमत ३ रुपये ५० पैशांनी वाढली आहे. 

याआधी ७ मे २०२२ रोजी घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरची किंमत ५० पैशांनी वाढविण्यात आली होती. तसेच २२ मार्च २०२२ रोजी सबसिडीच्या घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरची किंमत ५० पैशांनी वाढविण्यात आली होती.

दरवाढीमुळे दिल्लीत घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १००३ रुपयांत उपलब्ध होईल. मुंबईत घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १००२.५० रुपयांत उपलब्ध होईल. कोलकाता येथे घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १०२९ रुपयांत उपलब्ध होईल. चेन्नईत घरगुती वापराचा १४.२ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर १०५८.५० रुपयांत उपलब्ध होईल.

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याचा फटका सर्वसामान्यांना लगेच बसतो. त्यांचे बजेट कोलमडून जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी