Aadhaar Card शी मोबाईल नंबर लिंक करायचा आहे?, फॉलो करा 'ही' सोपी Process

काम-धंदा
Pooja Vichare
Updated Jul 11, 2022 | 11:30 IST

Aadhaar Card Mobile Number Update : जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल किंवा नंबर बदलायचा असेल तर तुम्हाला एक सोपी प्रोसेसनुसार काम करावं लागेल.

Aadhaar Card
आधार कार्ड 
थोडं पण कामाचं
  • आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख पत्ता आणि बायोमेट्रिक अशी माहिती असते.
  • आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असणं देखील महत्त्वाचं आहे.
  • जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक असेल तर तुम्ही तुमची अनेक कामं सहज करू शकता.

नवी दिल्ली: आजकाल प्रत्येक कामांसाठी आधार कार्डची गरज लागते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. कोणतंही काम असो ओळखपत्र म्हणून आधार कार्ड महत्त्वाचं आहे. बँक खातं उघडायचं असेल, रेशन कार्ड, सरकारी कोणत्याही सुविधांचा लाभ घ्यायचा असल्यास, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी या आणि अशा अनेक ठिकाणी आधार कार्डची मुख्यत्वे गरज असते. नागरिकांच्या आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख पत्ता आणि बायोमेट्रिक अशी माहिती असते. त्यामुळे आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असणं देखील महत्त्वाचं आहे. 

जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक असेल तर तुम्ही तुमची अनेक कामं सहज करू शकता. तुमच्या मोबाईल नंबरवर येणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून तुम्ही आधार कार्डसंबंधित अनेक सुविधा आणि सेवांचा लाभ घेऊ शकता. मात्र जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल किंवा नंबर बदलायचा असेल तर तुम्हाला एक सोपी प्रोसेसनुसार काम करावं लागेल.  या सोप्या प्रोसेससाठी अधिक जाणून घ्या. 

अधिक वाचा- ढसाढसा रडलेल्या बंडखोर आमदारावर शिवसेनेची कारवाई, उद्धव ठाकरेंनी दिला मोठा दणका 

जर तुम्हाला आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर खालीलप्रमाणे दिलेली प्रोसेस फॉलो करा. 

  • जर तुम्हाला आधार कार्डसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर बदलायचा असेल किंवा दुसरा नंबर लिंक करायचा असेल तर यासाठी सर्वात आधी UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ ला भेट द्या. 
  • या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यावर तुम्हाला आधार सेवा केंद्रावरील अपॉइंमेंट घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही तारखेची निवड करू शकता. याशिवाय थेट सेवा केंद्रावर देखील जाऊ शकता.
  • जर तुम्ही आधार सेवा केंद्रावर गेल्यात तर तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आधार करेक्शन फॉर्म भरावा लागेल. 
  • या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं नाव, आधार नंबर आणि मोबाईल नंबर कार्डशी लिंक करायचा आहे, त्याची माहिती द्यावी.
  • त्यानंतर तुम्ही भरलेला हा फॉर्म आधार सेवा केंद्रावरील अधिकाऱ्याकडे द्या. मग बायोमेट्रिक माहिती तपासली जाईल आणि तुमचा नवीन मोबाईल नंबर काही तासात अपडेट होऊन जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी