एनपीएस : आता आधार ई-केवायसीद्वारे उघडा ऑनलाईन एनपीएस खाते, ही आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस

काम-धंदा
Updated May 04, 2021 | 21:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

how to open nps account : आधी ई-एनपीएस अंतर्गत नोंदणी ही आधार ऑफलाईन ई- केवायसी किंवा व्यक्तीचे पॅन आणि बॅंक खाते यांच्याद्वारे होत असे. मात्र आता आधार बेस्ड ऑनलाईन ई-केवायसी (e-KYC)प्रमाणीकरण प्रक्रियेद्वारे ए

open NPS account online
एनपीएस खाते उघडा ऑनलाईन 

थोडं पण कामाचं

  • एनपीएस खाते उघडा ऑनलाईन
  • सोपी आणि सरळ पद्धत
  • एनपीएस सरकारी योजना

नवी दिल्ली : पीएफआरडीए (PFRDA)ग्राहकांना अशी एक सुविधा पुरवते, ज्याद्वारे ऑनलाईन आधार ई-केवायसीचा वापर करत नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS)खाते उघडणे सोपे झाले आहे. NSDL–CRA ने आपल्या e-NPS प्लॅटफॉर्मवर ग्राहकांच्या नोंदणीसाठी आधार बेस्ड ऑनलाईन ई-केवायसी प्रमाणीकरण प्रक्रियाला अधिक सुलभ बनवले आहे. ई-एनपीएस पीएफआरडीए द्वारा नियुक्त सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सीस (CRA)चे एक ऑनलाईन एनपीएस ऑन-बोर्डिंग प्लॅटफॉर्म आहे. इथे कोणीही एनपीएस नोंदणी करू शकतो आणि ऑनलाईन प्रक्रिया करू शकतो.

ऑनलाईन ई-केवायसी

ज्यांचे आधीच एनपीएस खाते आहे ते या प्लॅटफॉर्मवर आपले टियर-२ खाते सुरू करू शकताा. याआधी ई-एनपीएस अंतर्गत नोंदणी आधार ऑफलाईन ई-केवायसी किंवा व्यक्तीच्या पॅन आणि बॅंक खात्याद्वारे होत होती. मात्र आता आधार बेस्ड ऑनलाईन ई-केवायसी (e-KYC)प्रमाणीकरण प्रक्रियाद्वारे एनपीएस खाते सुरू करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. या प्रक्रियेची स्टेप बाय स्टेप माहिती करून घेऊया.

अशी आहे प्रक्रिया...

स्टेप १. ई-एनपीएस पोर्टलवर (https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html) जा.
स्टेप २. आता “National Pension System” आणि त्यानंतर  “Registration” या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप ३. आता "New Registration" मध्ये जाऊन खात्याचा प्रकार निवडा. त्यानंतर भारतीय नागरिक, एनआरआय किंवा ओसीआयमधील योग्य पर्याय निवडा.
स्टेप ४. आता "Register With" मधून  “Aadhaar Online/Offline KYC” या पर्यायाची निवड करा. त्यानंतर ‘Tier types’ मधून "Tier I only" पर्यायाची निवड करा. 

स्टेप ५ . आता तुम्हाला १२ आकडी आधार किंवा १६ आकड्यांचा व्हर्च्युअल आयडी त्यात टाकावा लागेल. त्यानंतर जनरेट ओटीपीवर क्लिक करा.
स्टेप ६. त्यानंतर तुम्हाला ओटीपी मिळेल आणि तो ओटीपी तुम्हाला त्यात टाकावा लागेल.
स्टेप ७. यशस्वीरित्या प्रमाणीकरण केल्यानंतर तुमची माहिती उदाहरणार्थ तुमचे नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता, फोटो इत्यादी माहिती आधार कार्डच्या रेकॉर्डमधून आपोआप घेतली जाईल.
स्टेप ८. आता तुम्हाला एनपीएस नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इतर विचारण्यात आलेली माहिती द्यावी लागेल.
स्टेप ९. आता तुम्हाला आपली पहिली रक्कम जमा करावी लागेल आणि ओटीपीदेखील भरावा लागेल. हे झाल्याबरोबर तुमचे एनपीएस खाते सुरू झालेले असेल. 

एनपीएसचा फायदा

एनपीएस ही एक सरकारी योजना असून रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यात लागणाऱ्या आर्थिक गरजा आणि दैनंदिन गरजांसाठी यातून तुमची गरज भागू शकते. शिवाय यात दीर्घकालीन गुंतवणूक असल्यामुळे याचा मोठा फायदा तुम्हाला रिटायरमेंटनंतर होतो. असंघटित क्षेत्रातील नागरिक किंवा ज्यांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा नाही अशा नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यासाठीची तरतूद तरुण वयातच करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे एनपीएससारख्या दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक करणे श्रेयस्कर असते. यातून तरुण वयातच बचतीची आणि नियमित गुंतवणुकीची शिस्तदेखील लागते. यामुळे आर्थिक नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करता येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी