PPF Account : घरबसल्या उघडा पीपीएफ खाते...मिळवा मोठी रक्कम

Investment Tips : पीपीएफ हा छोटी गुंतवणूक दीर्घकालावधीसाठी करून मोठी संपत्ती निर्माण करण्याचा उत्तम मार्ग आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेद्वारे उघडता येते. सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अल्पबचत योजना चालवल्या जातात. पीपीएफ हा पर्याय फायदेशीर आहे कारण याद्वारे तुम्ही करोडो रुपये जमा करू शकता. प्राप्तिकर कायद्याअंतर्गत यातील गुंतवणूक कर कपातीसाठी पात्र आहे.

PPF Account
पीपीएफ खाते 
थोडं पण कामाचं
  • सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अल्पबचत योजना चालवल्या जातात
  • पीपीएफ हा अत्यंत लोकप्रिय गुंतवणूक प्रकार
  • घरबसल्या सहरजरित्या सुरू करा पीपीफ खाते आणि उभी करा मोठी रक्कम

PPF Investment: नवी दिल्ली : सर्वसामान्य गुंतवणुकदार गुंतवणूक (Investment) करताना सुरक्षितता आणि चांगला परतावा या दोन्ही बाबींना महत्त्व देत असतो. सरकारकडून सर्वसामान्यांसाठी अल्पबचत योजना चालवल्या जातात. यातीलच एक अत्यंत लोकप्रिय आणि जबरदस्त पर्याय म्हणजे पीपीएफ (PPF) म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund). पीपीएफ हा छोटी गुंतवणूक दीर्घकालावधीसाठी करून मोठी संपत्ती निर्माण करण्याचा उत्तम मार्ग आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेद्वारे उघडता येते. हा पर्याय फायदेशीर आहे कारण याद्वारे तुम्ही करोडो रुपये जमा करू शकता. नियमांनुसार, यामध्ये दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहे. पीपीएफचा व्याजदर सरकारकडून दर तिमाहीत निश्चित करण्यात येतो. (How to open PPF account online)

अधिक वाचा : संजय राऊतांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला

पीपीएफचे लाभ

बचतीतून मोठी रक्कम उभारण्याबरोबरच पीपीएफचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीपीएफ खात्यावरही कर्ज घेता येते. शिवाय यात दरवर्षी करबचतीचा पर्यायदेखील आहे. या योजनेत नियमितपणे गुंतवणूक करून तुम्ही पीपीएफ योजनेद्वारे 1 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक निधी उभा करू शकता. छोट्या बचतीतून करोडो रुपये जमा करण्यासाठी पीपीएफसारखा दुसरा सुरक्षित पर्याय नाही.

पीपीएफ खाते कसे उघडायचे?

घरबसल्या पीपीएफ खाते उघडण्यासाठीची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया पाहा - 

आवश्यक गोष्टी- एक ओळख पुरावा (मतदार आयडी/पॅन कार्ड/आधार कार्ड), रहिवासाचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, पे-इन-स्लिप (बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध), नामनिर्देशन फॉर्म, इंटरनेट कनेक्शन

अधिक वाचा : Beed : नवरात्रौत्सवात 10 जणांना विषबाधा, काहींची प्रकृती चिंताजनक

कसे सुरू करायचे पीपीएफ खाते-

नेट बँकिंग
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड घरात बसून उघडण्यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या नेट बँकिंग पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.

नवीन खाते
येथे तुम्हाला नवीन पीपीएफ खाते उघडण्याचा पर्याय दिसेल. यावर क्लिक करा.

तपशील
नॉमिनीचे तपशील, बँक तपशील इत्यादी टाकून येथे PPF खाते उघडण्यास सुरुवात करा.

पडताळणी
येथे तुमचा पॅन सारखी काही माहिती देखील प्रदर्शित केली जाईल. येथून आपण स्क्रीनवर प्रदर्शित केलेले सर्व तपशील योग्य आहेत की नाही याची खातरजमा करता येणार आहे.

अधिक वाचा : Sukesh Chandrashekhar तुरुंगातूनच कसं हॅंडल करायचा नेटवर्क?, पोलिसांनी दोन अभिनेत्रींसोबत सीन केला रिक्रिएट

ठेव
सर्व तपशील भरल्यानंतर, तुम्हाला जितक्या रकमेची गुंतवणूक करायची ती रक्कम भरा. तितकी रक्कम पीपीएफ खात्यात जमा होईल.

OTP
आता तुम्हाला OTP टाकावा लागेल. हा OTP तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येईल.

खाते क्रमांक
आता तुमचे पीपीएफ खाते उघडले जाईल. स्क्रीनवर दिसणारा खाते क्रमांक नोंदवा.

बचत आणि गुंतवणूक या दोन्ही बाबी तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पीपीएफद्वारे एकाचवेळी तुम्ही नियमितपणे बचत आणि गुंतवणुकदेखील करता. दीर्घ कालावधीत याचा तुम्हाला जबरदस्त फायदा होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी