Early Retirement Tips : वयाच्या 40 व्या वर्षी निवृत्त होऊन उर्वरित आयुष्याचा आनंद घ्यायचांय? मग वापरा ही सूत्रे

Financial Tips: अनेकांना लवकर निवृत्त होत आयुष्याचा आनंद घ्यायचा असतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात किती वर्षे काम करायचे आहे? हा प्रश्न आजच्या तरुणांना विचारला तर त्यांचे उत्तर 35 ते 45 वर्षांच्या दरम्यान असेल. लवकर निवृत्त व्हावे आणि आयुष्य मजेत जगावे असेच अलीकडच्या तरुणाईला वाटते. लोकांना लवकर निवृत्त व्हायचे असते आणि बाकीचे आयुष्य आरामात घालवायचे असते. आर्थिक नियोजन केल्यास हे शक्य आहे

Financial Tips
आर्थिक नियोजनाची सूत्रे 
थोडं पण कामाचं
  • लवकर निवृत्ती होण्यासाठी तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 50 ते 70% बचत आवश्ययक
  • तुमच्या पॅसिव्ह उत्पन्नावर लक्ष द्या
  • पैसे वाचवण्याच्या टिप्स वापरा

How to Retire Early : नवी दिल्ली : करियर आणि रिटायरमेंट हे सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक असतात. अलीकडच्या काळात आर्थिक नियोजन (Financial Planning) आणि गुंतवणुकीविषयी जागरुकता वाढत असताना निवृत्ती नियोजनाचेही (Retirement Planning) महत्त्व वाढले आहे. अनेकांना लवकर निवृत्त होत आयुष्याचा आनंद घ्यायचा असतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात किती वर्षे काम करायचे आहे? हा प्रश्न आजच्या तरुणांना विचारला तर त्यांचे उत्तर 35 ते 45 वर्षांच्या दरम्यान असेल. लवकर निवृत्त व्हावे आणि आयुष्य मजेत जगावे असेच अलीकडच्या तरुणाईला वाटते.  लोकांना लवकर निवृत्त व्हायचे असते आणि बाकीचे आयुष्य आरामात घालवायचे असते. आर्थिक नियोजन केल्यास हे शक्य आहे. तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षीदेखील  निवृत्त होऊ शकता. पण यासाठी आर्थिक शिस्त खूप महत्त्वाची आहे. गुंतवणुकीशी (Investment) संबंधित काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही लवकर निवृत्त होऊ शकता. यासंदर्भातील महत्त्वाची सूत्रे जाणून घेऊया. (How to retire ealy in your life, know the finanical tips)

अधिक वाचा  : Relationship Tips : गर्लफ्रेंडशीच लग्न करण्याच्या विचारात असाल तर लक्षात घ्या या 5 गोष्टी

लवकर निवृत्त होण्याची सूत्रे - 

तुमचा खर्च किती 
आर्थिक नियोजन आले म्हणजे पहिली पायरी खर्चाची असते. स्वतःला दोन मूलभूत प्रश्न विचारा. लवकर सेवानिवृत्तीमध्ये तुमची जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला किती उत्पन्नाची आवश्यकता आहे? आणि दुसरा प्रश्न तुम्हाला किती लवकर निवृत्त व्हायचे आहे? तुमचा मासिक किंवा वार्षिक खर्च किती असेल यावर बरेच काही अवलंबून आहे. याबाबतचा एक नियम तुम्हाला मदत करेल. हा 4% नियम आहे. जर तुम्ही 5 कोटी रुपयांच्या रकमेसह निवृत्त झालात.. तर 4% नियमानुसार, तुम्ही दरवर्षी 5 कोटींपैकी 4% वापरू शकता. ही रक्कम 20 लाख रुपये होते. वास्तविक, हे करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे नियम उलट करणे. याचा अर्थ असा की तुमचा सेवानिवृत्ती निधी तुम्ही पहिल्या वर्षी काढलेल्या रकमेच्या 25 पट असावा. समजा तुम्हाला निवृत्तीच्या पहिल्या वर्षी 10 लाख खर्चाची गरज आहे, तर 25 गुणिले 2.5 कोटी रुपये. त्यामुळे ही रक्कम निवृत्तीच्या वेळी तुमच्याकडे असायला हवी.

अधिक वाचा  : वडापावचा वाढणार भाव; सर्वसामान्यांचा हिशोब होणार तिखट

उत्पन्नातील वाढ महत्त्वाची
यासाठी तुम्हाला दरमहा तुमच्या उत्पन्नाच्या 50 ते 70% बचत करावी लागेल. अर्थात भाडे, जेवण, मुलांचे शिक्षण, गृहकर्ज इत्यादी काही अत्यावश्यक खर्चांसह एखाद्याच्या निम्म्या उत्पन्नाची बचत करणे शक्य होणार नाही. मात्र आपण जितकी जमेल तितकी बचत करावी. आपण आपले उत्पन्न वाढविण्याचा विचार करू शकतो. अर्धवेळ नोकरी, पगार वाढ मागणे, चांगल्या पगारासाठी नोकरी बदलणे, तुमची कौशल्ये वाढवणे किंवा उत्पन्नाचे दुसरे स्रोत शोधणे यासारखे मार्ग शोधून तुम्ही उत्पन्न वाढवा. 

जास्तीत जास्त बचत करा
तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या 50 ते 70% बचत करण्यास सुरुवात करता. यातून तुम्ही खर्च कमी करून आर्थिक शिस्त लावता. तुमची बचत इंडेक्स फंडांसारख्या पर्यायात हुशारीने गुंतवावी लागेल. जास्त बचत करा आणि कमी खर्च करा. त्यानंतर हुशारीने गुंतवणूक करा.

अनावश्यक खर्च कमी करा
खर्चाचे नियोजन करण्यासाठी तुम्ही अनेक टिप्स वापरू शकता. नवीन ऐवजी वापरलेली कार चालविण्यासारखे, तुम्ही शहरात राहत असाल तर सार्वजनिक वाहतूक वापरा, घर घेण्याऐवजी भाड्याने घेण्याचा विचार करा. स्वतःचे जेवण बनवा, रेस्टॉरंट खर्च कमी करा. शिवाय क्रेडिट कार्डचे कर्ज टाळा आणि बक्षिसे मिळवा इत्यादींसाठी वापरा. असे खूप मार्ग आहेत.

अधिक वाचा - Fruits for high Uric Acid : रक्तातील युरिक ॲसिड कमी करण्यासाठी खा ही पाच फळं, स्वस्तातली फळं खाऊन टळतील गंभीर आजार

योग्य गुंतवणूक 
एकदा बचत केल्यानंतर तुम्ही योग्य पर्यायात गुंतवणूक केली पाहिजे. तुम्ही शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू केली पाहिजे. लोकांना पैसे गुंतवावे लागतात जिथे त्यांना त्यांचे पैसे वाढवण्याच्या सर्वोत्तम संधी असतात. अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये, कमी किंमतीचे इंडेक्स फंड किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड यासाठी वापरले जातात. भारतातही इंडेक्स फंड आणि ईटीएफ मोठ्या प्रमाणात होत आहेत. तुम्ही त्यांचा अधिक हुशारीने वापर करू शकता आणि बेंचमार्कपेक्षा जास्त परतावा मिळवू शकता.

पॅसिव्ह उत्पन्न महत्वाचे
निष्क्रिय म्हणजे पॅसिव्ह उत्पन्न खूप महत्वाचे आहे. आता निष्क्रिय उत्पन्नाचे अनेक प्रकार असू शकतात.तुमच्या शेअर्समधील लाभांश, तुमच्या FD मधून मिळणारे व्याज, तुमच्या ब्लॉगचे उत्पन्न, तुमच्या YouTube चॅनेलमधून कमाई करणे, मालमत्तांचे भाडे इ. निष्क्रिय उत्पन्नाची उदाहरणे आहेत. यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न केले पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी