EPFO Nominee : नवी दिल्ली : प्रत्येक कर्मचार्याच्या पगारातून एक ठराविक रक्कम कापली जाते आणि त्याच्या प्रोव्हिंड फंड खात्यात जमा केली जाते. कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याला किंवा मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना ही रक्कम मिळते. यासाठी कर्मचार्याला नोकरी सुरू करताना आपला वारस असलेल्या व्यक्तीची नोंद करावी लागते. EPFO च्या वेबसाईटवर आपल्या वारसदार व्यक्तीची नोंदणी करण्यासाठी कुठलीही शेवटची तारीख नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून अनेकांना वेबसाईटवर वारस नोंद करण्यास अडचणी येत आहे. जाणून घेऊया या मागील कारणे
अधिक वाचा : पीएमसी बँकेचे, युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत लगेच होणार विलीनीकरण, सरकारची मंजुरी
ट्विटरवर अनेकांनी EPFO च्या साईटबद्दल तक्रार केली आहे. आपला वारस नोंद करण्यात अडचण आल्याचे अनेकांनी ट्विटरवर म्हटले आहे. तसेच या वेबसाईट लॉग इन होत नसल्याचेही काही युजर्सने म्हटले आहे. २२ जानेवारी ते २४ जानेवारीदरम्यान वेबसाईटच्या दुरुस्तीमुळे ही वेबसाईट बंद डाऊन होती. EPFO ने २० जानेवारी रोजी याबाबत माहिती दिली होती. म्हणूनच कर्मचार्यांना वारसदाराची नोंद करणे, लॉग इन करण्यासारख्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
@LabourMinistry please check @socialepfo Portal member interface,it's showing pathetic behaviour. Govt make e-Nomation compulsory but from all over India people can't Verify e-sign withAadhar details through @cdacindia !It's our money unable to Claim &Withdraw in tough time — Janmejay जन्मेजय ©®✨ (@janmejayrk) January 23, 2022
Has anyone been successful in the e-nomination on EPFO portal? @socialepfo - I have been unable to complete the e-sign process. Even logging into the member portal seems a challenge, where one out of 10 logins work! — ramblingchennai (@ramblingchennai) January 24, 2022
What happened to EPF website. e-nomination is NOT working since one month. Shows ERROR or SERVICE UNAVAILABLE.... @socialepfo @PMOIndia @LabourMinistry #atmanirbharbharat — shiva kumar (@pujyamssk) January 24, 2022