SBI OTP-based ATM cash withdrawal: नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक एटीएममधून पैसे काढण्यासाठी (Cash withdrawal from ATM) आता ओटीपीवर आधारित सेवा वापरू शकतात. अनधिकृत व्यवहार टाळण्यासाठी बँकेचा वन-टाइम पासवर्ड (OTP) आधारित रोख पैसे काढण्याची सेवा एसबीआयच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ओटीपी हा एक चार-आकडी क्रमांक असतो. त्याचा वापर एका व्यवहारासाठी ग्राहकाची ओळख सत्यापित करण्यासाठी केला जातो. एसबीआयचे ग्राहक प्रत्येक वेळी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर जारी केलेला ओटीपी तसेच डेबिट कार्ड पिन टाकून एटीएममधून 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम काढू शकतात. ही सुविधा १ जानेवारी २०२० पासून कार्यरत आहे. (How to use SBI OTP-based ATM cash withdrawal facility, check the details)
अधिक वाचा : Gold Price Today | लग्नसराईत मोठी संधी...सोन्याची झळाळी आणि चांदीची चमक घटली...पाहा ताजा भाव
ओटीपीवर आधारित कॅश काढण्याच्या सुविधेसंदर्भात स्टेट बॅंकेने ट्विट करताना म्हटले आहे की "एसबीआय एटीएम व्यवहारांसाठी आमची ओटीपीवर आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली ही फसवणूक-प्रतिबंधक लस आहे. आमचे पहिले उद्दिष्ट नेहमीच तुम्हाला फसवणुकीपासून सुरक्षित ठेवणे असेल."
अधिक वाचा : Relief to Home Buyers | गृहकर्ज होणार स्वस्त... रिझर्व्ह बॅंकेने गृहकर्जाशी निगडीत नियम केले शिथिल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फसवणूक टाळण्यासाठी सर्व बँकांना एटीएममधून कार्डलेस रोख पैसे काढण्यास सक्षम करण्याचा निर्णय घेतला होता. "सर्व बँका आणि एटीएम नेटवर्कवर कार्डलेस पैसे काढणे अधिक सुरक्षित करण्यासाठी आता युपीआय वापरण्याची सूचना केली आहे." अशा व्यवहारांसाठी वास्तविक कार्डची आवश्यकता काढून टाकल्याने कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंग आणि इतर प्रकारची फसवणूक टाळण्यास मदत होईल,” असे मत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी द्वि-मासिक पतधोरण आढाव्याची घोषणा करताना मांडले.
अधिक वाचा : Tata Name | पहिल्यांदा जेव्हा कोणत्याही कंपनीसाठी‘टाटा’नाव वापरण्यात आले...त्याची रंजक कहाणी
हल्ली ऑनलाइन बँकिंग (Online Banking) आणि व्यवहारांचा खूप ट्रेंड आहे. लहान दुकानांवरही तुम्हाला क्युआर कोड (QR Code) स्कॅनर बसवलेले दिसतील. या सुविधांमुळे एकीकडे बँकेशी संबंधित लोकांचे काम सोपे झाले आहे. तर दुसरीकडे ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांत क्यूआर कोडच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटनाही समोर आल्या आहेत. QR कोड फसवणुकीचे वाढते प्रकरण लक्षात घेता, देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI)आपल्या 44 कोटी ग्राहकांना सतर्क केले आहे. बँकेने म्हटले आहे की, जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीकडून QR कोड मिळाला तर तो चुकूनही स्कॅन करू नका. असे केल्याने तुम्ही क्षणार्धात सर्व रक्कम गमावू शकता.