Cryptocurrency Crash : क्रिप्टोकरन्सी बाजारात विक्रीची त्सुनामी, टेरा लुनाचे मूल्य 7000 रुपयांवरून थेट 80 पैशांवर...

Cryptocurrency : महागाईत (Inflation)होत असलेल्या वाढीच्या चिंतेमुळे जगातील वित्तीय बाजारपेठांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. याला शेअर बाजार (Share Market)आणि क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency)हे दोन्हीही अपवाद नाहीत. क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेला (Cryptocurrency Market)कडक नियमांमध्ये वाढ होत असल्याचा फटका बसतो आहे. कडक नियमांच्या भीतीपोटी एक आठवड्यापासून क्रिप्टोकरन्सीच्या बाजाराला जबरदस्त विक्रीचा सामना करावा लागतो आहे.

Cryptocurrency market Crash
क्रिप्टोकरन्सी झाली क्रॅश 
थोडं पण कामाचं
  • किप्टोकरन्सीची बाजारपेठ झाली क्रॅश
  • टेरा लुनाचे मूल्य थेट 7000 रुपयांवरून 80 पैशांवर आले
  • सर्व क्रिप्टोकरन्सीचा वाजला बॅंड

Cryptocurrency Crash : न्यूयॉर्क : महागाईत (Inflation)होत असलेल्या वाढीच्या चिंतेमुळे जगातील वित्तीय बाजारपेठांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. याला शेअर बाजार (Share Market)आणि क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency)हे दोन्हीही अपवाद नाहीत. क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेला (Cryptocurrency Market)कडक नियमांमध्ये वाढ होत असल्याचा फटका बसतो आहे. कडक नियमांच्या भीतीपोटी एक आठवड्यापासून क्रिप्टोकरन्सीच्या बाजाराला जबरदस्त विक्रीचा सामना करावा लागतो आहे. बहुतेक क्रिप्टोकरन्सी 25 ते 30 टक्के घसरण नोंदवत  व्यवहार करत आहेत. तर काही क्रिप्टोकरन्सी तर 50-60 टक्क्यांपर्यंत आपटली आहेत. यामध्येच स्टेबल कॉइनमध्ये गणना केली जात असलेली लुना (Luna)नावाची क्रिप्टोकरन्सी तर 99 टक्क्यांनी घसरली आहे. (Huge sale off in Cryptocurrency market, Luna losses 99% value)

अधिक वाचा : Elon Musk : ट्विटरच्या सौद्याला नवे वळण...बनावट अकाउंटची आकडेवारी समोर येईपर्यत ट्विटरची डील स्थगित, इलॉन मस्कचे धक्कादायक ट्विट

टेरा लुना शून्याजवळ पोचला

टेरा लुनामध्ये (Tera Luna) सर्वात जास्त घसरण दिसली आहे. गेल्या आठवडाभरात टेरा लुनाचे मूल्य सुमारे सात हजार रुपयांवरून थेट 50 पैशांपर्यंत घसरले आहेत. गेल्या 24 तासांत हे चलन 99.66 टक्क्यांनी घसरले आहे. गुरुवारी, लुना 48.61 टक्‍क्‍यांनी घसरली होती आणि आदल्या दिवशी 50 टक्‍क्‍यांहून अधिक घसरली होती.

भीतीपोटी विक्रीची सुनामी

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून, जागतिक नियमन दबाव, कराचा फटका यासारख्या चर्चांमुळे क्रिप्टो बाजार आपली चमक गमावते आहे. अनेक क्रिप्टो एक्सचेंजेसवर व्हॉल्यूममध्ये मोठी घट झाली. मात्र गेल्या आठवडाभरापासून सुरू झालेली भीतीपोटीची विक्री काही थांबवण्याचे नाव घेत नाही. जणूकाही क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेत विक्रीची सुनामीच आली आहे.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 13 May 2022: सोन्यात किंचित घसरण, आणखी घसरण्याची चिन्हे, खरेदीची संधी, पाहा ताजा भाव

क्रिप्टोकरन्सीचा बाजार नीचांकीवर

क्रिप्टोकरन्सीचे जागतिक मार्केट कॅप म्हणजे बाजारमूल्याच्या सर्वोच्च पातळीबद्दल बोलायचे तर, 9 नोव्हेंबर 2021 रोजी ते 2.93 ट्रिलियन डॉलरच्या विक्रमी पातळीवर होते. आतापर्यंत हा आकडा जवळपास 60 टक्क्यांवर आला आहे. क्रिप्टोकरन्सीचे एकूण बाजारमूल्य आज 1.23 ट्रिलियन डॉलरवर घसरले आहे.

बिटकॉइन कोसळला

गुरुवारी बिटकॉइनच्या किंमतीत 8.66 टक्क्यांची मोठी घसरण झाली. बिटकॉइन कोसळून त्याचे मूल्य 28,647 डॉलरवर आले होते. एका आठवड्यात बिटकॉइन 28.18 वर घसरला आहे, तर इथरियम 32.82 पर्यंत घसरला आहे.

अधिक वाचा : रतन टाटांनी इमोशनल अंदाजात सांगितली Tata Nano ची मनातली गोष्ट

क्रिप्टोकरन्सीच्या या अभूतपूर्व घसरणीमुळे गुंतवणुकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ते धडाधड क्रिप्टोकरन्सीची विक्री करत आहेत. यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेवर आणखी दबाव निर्माण होत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. या तडाख्यातून कोणतीही क्रिप्टोकरन्सी वाचू शकलेली नाही.

विविध क्रिप्टोकरन्सी किती टक्क्यांनी खाली आल्या आहेत आणि सध्या त्यांचे मूल्य किती झाले आहे ते पाहूया-

  1. टेरा लुना 99.66% वरून 80 पैशांवर घसरला
  2. मॅटिक 21.02% घसरून 80.014 रुपयांवर आहे
  3. सेलोना 18.73% घसरून 6,268.87 रुपयांवर आहे
  4. समजा तो 16.10% घसरून 59.36 रुपयांवर आहे
  5. शिबा इनू  15.45% घसरून 0.000892 रुपयांवर आहे
  6. XRP  13.690% घसरून 30.14 रुपयांवर आहे
  7. इथरियम 12.90% घसरून 1.54,735 रुपयांवर आहे
  8. ADA 5.32% घसरून 37.62 रुपयांवर आहे 
  9. डॉजकॉइन 8.48% घसरून 6.40 रुपयांवर आहे
  10. बिटकॉइन 6% घसरून 22,68,477 रुपयांवर आहे
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी