ICICI Bank: घर बसल्या ICICI बँकेकडून एक कोटींचं होम लोन 

काम-धंदा
Updated Mar 28, 2019 | 16:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Home Loan: ICICI बँकेनं ग्राहकांच्या सुविधेसाठी मोठं पाऊल उचललं आहे. आता तुम्ही बँकेत न जाता घर बसल्या १ कोटी रूपयांपर्यंत होम लोन घेऊ शकता. 

ICICI Bank
ICICI Bank: घर बसल्या ICICI बँकेकडून एक कोटींचं होम लोन   |  फोटो सौजन्य: BCCL

ICICI Bank Home Loan: प्रायव्हेट बँक ICICI बँकेनं इंस्टंट आणि पेपरलेस होम लोनच्या दोन सुविधा लॉन्च केल्या आहेत. बँकेचा दावा आहे की, इंडस्ट्रीमध्ये अशाप्रकारची सुविधा देणारी ही पहिली बँक आहे. याच्या अंतर्गत लगेचच सँक्शन लेटर मिळेल. दुसऱ्या सेवेच्या अंतर्गत विद्यमान ग्राहक टॉप अप लोन आपल्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होईल. 

इंस्टंट होम लोनच्या अंतर्गत प्री अप्रूव्ह सॅलेराइड ग्राहकांना होम लोनची सुविधा मिळेल. याच्या अंतर्गत १ कोटी रूपयांपर्यंत ३० वर्षांपर्यंत लोन घेऊ शकणार आहात. हे लोक इंटरनेट बँकिंगनं घेऊ शकता. 

तसंच याच्या अंतर्गत ग्राहकांना केवायसी डॉक्यूमेंट, अॅप्लिकेशन फॉर्म आणि आय के डॉक्यमेंट घेऊन बँकेत जाण्याची गरज नाही आहे. बँक का सँक्शन लेटर तुमच्या ईमेल आयडीवर येईल आणि ६ महिन्यांपर्यंत ते वैध राहिल. तसंच होम लोनचे ग्राहक १० वर्षांसाठी २० लाख रूपयांपर्यंत टॉप अप लोन देखील घेऊ शकतात. हे लोन एकदम पेपरलेस पद्धतीनं तुमच्या बँक अकाऊंटमध्ये येईल. 

बँक या लोनसाठी ग्राहकांचं क्रेडिट स्कोर, सॅलरी, एव्हरेज बॅलेन्स आणि रिपेमेंटचा रेकॉर्ड बघणार आहे. तुमच्या क्रेडिट स्कोरच्या आधारावर हे लोन दिलं जाईल. तुम्ही फक्त काही क्लिकच्या माध्यमातून या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहात. 

अशाप्रकारे घ्या इंस्टंट होम लोन अप्रूव्हल 

  1. सर्वांत पहिलं आपल्या ICICI बँकच्या नेट बँकिंग अकाऊंटचं लॉग इन करा. 
  2. त्यानंतर तुम्ही एक्सक्लुझिव्ह ऑफरिंगच्या पर्यायावर क्लिक करा.
  3. तिथेच तुम्हांला इंस्टंट सेक्शन- होम लोन दिसेल. त्यावर क्लिक करा. 
  4. आता तुम्ही रक्कम आणि लोनची वेळ निश्चित करा. त्यानंतर प्रोसेसिंग फि भरा. 
  5. आता सँक्शन लेटर डाऊनलोड करा किंवा ते तुमच्या ईमेलवर येईल. 
  6. तिथेच तुम्ही पंतप्रधान आवास योजनेसाठी आपली पात्रता देखील तपासू शकता. 
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी