Online Shopping offer: या बँकेची मोठी ऑफर...ऑनलाइन शॉपिंगसाठी पैशांची तजवीज आणि करा जबरदस्त बचत

Pay later Facility : अनेकदा इच्छा असूनही बजेट नसल्यामुळे किंवा आर्थिक अडचणीमुळे खरेदी (Shopping) करता येत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या खिशात नेहमी पैसे असतीलच असे नाही. सध्या अनेक वेबसाइट्स सणानिमित्त आकर्षक ऑफर देत आहेत. जर तुम्ही या बॅंकेच्या ही सुविधा घेतली तर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग सहज करता येईल. तुमच्या खिशात पैसे नसतानादेखील तुम्हाला खरेदी करता येईल.

ICICI Bank Pay later Offer
आयसीआयसीआय बॅंक पे लेटर ऑफर 
थोडं पण कामाचं
  • सध्या खरेदीचा आणि ऑफर्सचा सीझन सुरू आहे
  • अनेकदा इच्छा असूनही बजेट नसल्यामुळे किंवा आर्थिक अडचणीमुळे खरेदी (Shopping) करता येत नाही
  • अशावेळी आयसीआयसीआय बॅंकेने एक जबरदस्त सुविधा ऑनलाइन शॉपिंगवर दिली आहे

Pay Later offer online shopping : नवी दिल्ली : शॉपिंग आणि ऑफर्सचा सध्या सीझन सुरू आहे. सणासुदीच्या हंगामात खरेदीला उधाण येत असते. मात्र अनेकदा इच्छा असूनही बजेट नसल्यामुळे किंवा आर्थिक अडचणीमुळे खरेदी (Shopping) करता येत नाही.  प्रत्येक व्यक्तीच्या खिशात नेहमी पैसे असतीलच असे नाही. अनेकवेळा गरजेच्या वेळी तुमच्याकडे पैसे नसतात, अशा परिस्थितीत मग उसनवार पैसे घेण्याची वेळ येते. अनेक वेबसाइट्स सणानिमित्त आकर्षक (Online shopping Offer)ऑफर देत आहेत. अशा परिस्थितीत अनेकांना खरेदी करायची इच्छा असते, पण पैशांच्या कमतरतेमुळे हा प्लॅन रद्द करावा लागतो. मात्र जर तुम्ही या बॅंकेच्या ही सुविधा घेतली तर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग सहज करता येईल. तुमच्या खिशात पैसे नसतानादेखील तुम्हाला खरेदी करता येईल. शिवाय बॅंक (Bank Offer) तुम्हाला जे पैसे वापरायला देईल त्यावर व्याज किंवा शुल्कदेखील द्यावे लागणार नाही. (ICICI bank offers Pay Later facility for online shopping)

अधिक वाचा : PM Modi: देशाला मिळाली तिसरी Vande Bharat Express, पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

ICICI बँकेची जबरदस्त सुविधा (ICICI Bank Pay later Offer)

या सुविधेअंतर्गत तुम्ही ICICI बँकेकडून 30 दिवसांसाठी पैसे उधार घेऊ शकता. यासाठी काही अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. बँकेच्या या सुविधेचे नाव आहे पे-लेटर (Buy Now Pay Later offer online shopping). बँकेची पे-लेटर सुविधा अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना 20 हजार रुपयांपर्यंत कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे नाही आणि ते ही रक्कम 30 दिवसांच्या आत परत करतील. PayLater खाते ही डिजिटल क्रेडिट सेवा आहे. ही सुविधाही क्रेडिट कार्डसारखी आहे, जिथे तुम्ही आधी खर्च करा आणि नंतर पैसे द्या. मात्र इथे तुम्हाला कोणतेही कार्ड घ्यावे लागणार नाही.

अधिक वाचा : आण्विक दुर्घटना टाळण्यासाठी रशियाच्या सैन्याची मोठी कारवाई

पे लेटर सुविधा काय आहे?

PayLater सुविधा वापरून, ग्राहकाला 30 दिवसांसाठी व्याजाशिवाय कर्ज मिळते. याद्वारे तुम्ही तुमचे कोणत्याही प्रकारचे बिल भरू शकता. याशिवाय, तुम्ही याचा वापर ऑनलाइन खरेदीसाठी किंवा इतर कोणत्याही गरजेसाठी करू शकता. याच्या मदतीने तुम्ही UPI आयडीद्वारे कोणत्याही दुकानदाराला पेमेंट करू शकता. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की याद्वारे तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरू शकत नाही आणि निधी हस्तांतरित करू शकत नाही.

या सुविधेचा फायदा कसा घ्यायचा?

ICICI बँकेची ही सुविधा फक्त 'इन्व्हाईट-ओन्ली' आधारावर उपलब्ध आहे. म्हणजेच, तुमचा ट्रॅक रेकॉर्ड आणि CIBIL रिपोर्ट पाहिल्यानंतर, जर बँकेला वाटत असेल की तुम्हाला ही सुविधा दिली जावी, तर तुम्हाला पॉकेट्स वॉलेट, i-Mobile आणि इंटरनेट बँकिंग अॅपवर त्याचे पॉप-अप दिसेल. याशिवाय अर्ज करूनही पाहू शकता.

अधिक वाचा : Pakistani Airlines latest : एअर होस्टेसने विमानात योग्य अंडरगारमेंट परिधान करावे... पाकिस्तानी एअरलाइनचा विचित्र आदेश

शुल्क किती आहे

जर तुम्ही विचार करत असाल की यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागेल, तर तुमच्या माहितीसाठी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही शुल्क किंवा व्याज भरावे लागणार नाही. जर तुम्ही बँकेने निश्चित केलेल्या शेवटच्या तारखेला पेमेंट केले नसेल तर तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागेल. जोपर्यंत तुमची देय रक्कम पूर्ण होत नाही तोपर्यंत हे शुल्क घेतले जाईल.

Paylater ची मर्यादा किती रकमेची असेल?

Paylater खात्यावर, तुम्हाला बँकेकडून 10 ते 25 हजार क्रेडिट मिळू शकतात. बँक अनेक अटी आणि नियमांच्या आधारे तुम्ही किती पात्र आहात हे ठरवते. तुम्हाला ही रक्कम परत मिळण्याची काळजी करण्याची गरज नाही. ही रक्कम देय तारखेला तुमच्या खात्यातून आपोआप कापली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी