ICICI Bank Share: बँक उघडणार नव्या 130 ब्रान्च, कुठे आणि कधी जाणून घ्या

काम-धंदा
पूजा विचारे
Updated Sep 24, 2019 | 17:18 IST

ICICI बँकेनं घोषणा केली आहे की, बँक या आर्थिक वर्षात 130 नव्या बँक ब्रान्च आणखीन सुरू करणार आहे. बँकेची या संपूर्ण आर्थिक वर्षांत 450 ब्रान्च सुरू करण्याची योजना आहे.

ICICI Bank
ICICI Bank Share: बँक उघडणार नव्या 130 ब्रान्च, कुठे आणि कधी जाणून घ्या   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • ICICI बँक या आर्थिक वर्षांत बँक 130 नवीन ब्रान्च सुरू करणार आहे.
  • बँक याच्या माध्यमातून आपला रिटेल नेटवर्क वाढवेल.
  • बँकेचं या आर्थिक वर्षांत नव्या 450 ब्रान्च सुरू करण्याचं लक्ष्य आहे.
  • यापैकी 320 ब्रान्च ग्राहकांसाठी ऑपरेशनल केल्या आहेत.

मुंबईः  सरकारच्या कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यानंतर ICICI बँकेनं केलेली मोठी घोषणा सर्वांसमोर आली आहे. बँकेनं म्हटलं की, या आर्थिक वर्षांत बँक 130 नवीन ब्रान्च सुरू करणार आहे. बँक याच्या माध्यमातून आपला रिटेल नेटवर्क वाढवेल. बँकेचं या आर्थिक वर्षांत नव्या 450 ब्रान्च सुरू करण्याचं लक्ष्य आहे. यापैकी 320 ब्रान्च ग्राहकांसाठी ऑपरेशनल केल्या आहेत. 130 बँक ब्र लवकरच सुरू होतील. आज ICICI बँकेचे शेअर 7.5 टक्क्यांनी वाढून 448 रूपयांवर ट्रेडमध्ये आहेत.

ICICI बँकेच्या आता 5 हजार बँक ब्रान्च झाल्यात. ICICI बँकेनं महाराष्ट्र राज्यात ठाण्यात 5000वी ब्रान्च उघडली आहे. यासोबतच बँकेकडे एकूण 5190 ब्रान्च, एक्सटेंशन काऊंटर आणि एटीएएमचं नेटवर्क झालं आहे. बँकेनं एका आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे की, आता त्यांच्या ब्रान्चचं नेटवर्क जम्मू काश्मीरच्या लेहपासून तामिळनाडूच्या नागेरकॉयलपर्यंत आणि गुजरातमध्ये नालियापासून मिझोराममध्ये आयजोलपर्यंत झालं आहे. 

आयसीआयसीआय बँकेचे ईडी अनूप बागची यांनी सांगितलं की, रिटेल बँकिंगसाठी ब्रान्चचं मोठं नेटवर्क असणं गरजेचं आहे. ब्रान्चमध्ये व्यवहाराची पद्धत गेल्या काही वर्षांपासून बदलेली आहे. आता ग्राहकांना ब्रान्चमध्ये कॉम्प्लेक्स व्यवहार, लोन आणि गुंतवणूक यासाठी सल्ल्याची गरज असते. साधारण व्यवहारासाठी ग्राहक इंटरनेट आणि मोबाइल बँकिंगचा उपयोग करतात. बँकेनं यासाठी 24 तास चालणारी ई लॉबी देखील काही ब्रान्चमध्ये लावली आहे. 

घर बसल्या ICICI बँकेकडून एक कोटींचं होम लोन 

काही महिन्यांपूर्वीच ICICI बँकेनं इंस्टंट आणि पेपरलेस होम लोनच्या दोन सुविधा लॉन्च केल्या आहेत. बँकेनं दावा केला की, इंडस्ट्रीमध्ये अशाप्रकारची सुविधा देणारी ही पहिली बँक आहे. याच्या अंतर्गत लगेचच सँक्शन लेटर मिळेल. दुसऱ्या सेवेच्या अंतर्गत विद्यमान ग्राहक टॉप अप लोन आपल्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होईल. इंस्टंट होम लोनच्या अंतर्गत प्री अप्रूव्ह सॅलेराइड ग्राहकांना होम लोनची सुविधा मिळेल. याच्या अंतर्गत १ कोटी रूपयांपर्यंत ३० वर्षांपर्यंत लोन घेऊ शकणार आहात. हे लोक इंटरनेट बँकिंगनं घेऊ शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी