Saving Account Interest Rate | या बँकेने ग्राहकांना दिली मोठी भेट! बचत खात्याच्या व्याजदरात थेट 1 % वाढ

Bank savings account : बँकांच्या एफडीवरील व्याजदरात (Bank FD interest rate) गेल्या काही काळापासून सातत्याने वाढ होते आहे. मात्र, बँकांच्या बचत खात्यांवरील व्याजदर (Savings account interest rate) अनेक दिवसांपासून कमी आहेत. पण याच दरम्यान, आयडीएफसी फर्स्ट बँकेने (IDFC First Bank) आपल्या ग्राहकांना दिलासा देत बचत खात्यांवरील व्याजदरात वाढ केली आहे.

IDFC First Bank Saving Account Interest Rate
आयडीएफसी फर्स्ट बॅंकेच्या बचत खात्यावरील व्याजदर 
थोडं पण कामाचं
  • आयडीएफसी फर्स्ट बँकेने ग्राहकांना दिला मोठा दिलासा
  • बचत खात्याच्या व्याजदरात थेट 1 % वाढ
  • बॅंकेचे नवीन व्याजदर जाणून घ्या

Saving Account Interest Rate increased : नवी दिल्ली : बँकांच्या एफडीवरील व्याजदरात (Bank FD interest rate) गेल्या काही काळापासून सातत्याने वाढ होते आहे. मात्र, बँकांच्या बचत खात्यांवरील व्याजदर (Savings account interest rate) अनेक दिवसांपासून कमी आहेत. पण याच दरम्यान, आयडीएफसी फर्स्ट बँकेने (IDFC First Bank) आपल्या ग्राहकांना दिलासा देत बचत खात्यांवरील व्याजदरात वाढ केली आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेने जाहीर केले आहे की 1 एप्रिलपासून बँक आपल्या ग्राहकांना 6 टक्के दराने व्याज देईल. मात्र, बँकेने वेगवेगळ्या रकमांच्या आधारे व्याजदर निश्चित केले आहेत. (IDFC First Bank gave big relief to customers by increasing interest rate on savings account by 1 %)

अधिक वाचा : Gold Price Today | मोठी संधी ! सोन्याच्या भावात मोठी घसरण...झाले 4,087 रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली, पाहा ताजा भाव

हे लक्षात घेण्यासारखे आहे की आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या बचत खात्यांवर पूर्वी 5 टक्के व्याजदर होते. त्यात वाढ होत ते आता 6 टक्के करण्यात आले आहेत. बॅंकेकडून हे वाढीव व्याजदर किती रकमेसाठी मिळतील ते जाणून घ्या. 

अधिक वाचा : EPF Account update | तुमच्या पीएफ खात्यासंदर्भात 1 एप्रिलपासून नवीन नियम, पाहा काय बदलणार...

आयडीएफसी फर्स्ट बँकेचे नवीन व्याजदर -

  1. - बचत खात्यातील 1 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर बँक ४ टक्के दराने व्याज देईल.
  2. - 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेच्या बचत खात्यावर 4.50 टक्के दराने व्याज मिळेल.
  3. - त्याच वेळी 10 लाखांपेक्षा जास्त परंतु 25 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेवर व्याज 5 टक्के दराने मिळेल.
  4. - बचत खात्यांमध्ये 25 लाखांपेक्षा जास्त परंतु 1 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम असल्यास ग्राहकांना 6 टक्के दराने व्याज मिळेल.
  5. - बदलेल्या व्याजदरानंतर 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त परंतु 100 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम असलेल्या बचत खात्यांवर 5 टक्के दराने व्याज दिले जाईल.
  6. - यासह, आम्ही तुम्हाला सांगूया की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार, बचत बँक खात्यावरील प्रत्येक दिवसाच्या शेवटी शिल्लक रकमेवर व्याज मोजले जाईल आणि ते मासिक आधारावर दिले जाईल. आरबीआयचे हे नियम 1 जुलै 2021 पासून लागू झाले आहेत.
  7. - तसेच, हे जाणून घ्या की व्याज दर प्रगतीशील शिल्लक म्हणजे प्रोग्रेसिव्ह बॅलन्सच्या आधारावर ठरवले जाईल.

अधिक वाचा : Tax Payers Alert | कोणत्याही परिस्थितीत 31 मार्चपर्यंत हे करा, होईल जबरदस्त फायदा!

ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बॅंकांच्या खास एफडी होणार बंद

कोरोना महामारीच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय (ICICI  Bank) बँक, बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), एचडीएफसी (HDFC Bank) बँक या बॅंकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदतठेव योजना ( Senior Citizen FD) सुरू झाली होती. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अधिक लाभ मिळत आहेत. मात्र, आता काही बँका ही योजना बंद करू शकतात. खरेतर, एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या विशेष योजना दोन वर्षांसाठी बंद करू शकतात कारण या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना वाढवण्याची घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत या दोन बँका विशेष एफडी योजना बंद करू शकतात, असे मानले जात आहे. 1 एप्रिलपासून या खास एफडी बंद होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी