IEC 2022 : आव्हाने स्वीकारून आणि पूर्ण करून भारत प्रगतीपथावर : विनीत जैन, एमडी, टाइम्स ग्रुप

IEC 2022 : Times Group MD Vineet Jain says India has always progressed despite challenges : टाइम्स ग्रुपचे एमडी विनीत जैन म्हणाले की, भारत नवनव्या आव्हांनाना स्वीकारून आणि पूर्ण करून प्रगती करत आहे. 

IEC 2022 : Times Group MD Vineet Jain says India has always progressed despite challenges
भारत प्रगतीपथावर : विनीत जैन, एमडी, टाइम्स ग्रुप  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • IEC 2022 : आव्हाने स्वीकारून आणि पूर्ण करून भारत प्रगतीपथावर : विनीत जैन, एमडी, टाइम्स ग्रुप
  • IMFने केले भारताचे कौतुक : विनीत जैन
  • कार्यक्रमात सहभागी होणार असलेले दिग्गज

IEC 2022 : Times Group MD Vineet Jain says India has always progressed despite challenges : मुंबई : भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात देशातील आघाडीची मीडिया कंपनी 'टाइम्स नेटवर्क'चा 'इंडिया इकोनॉमिक कॉन्क्लेव २०२२' हा सोहळा सुरू आहे. या दोन दिवसांच्या सोहळ्यात देशाविदेशातील अनेक दिग्गज सहभागी झाले आहेत. 'द ग्रेट इंडियन डेमोक्रॅटिक डिव्हिडंड' ही यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे. भारतापुढील आर्थिक आव्हाने आणि या आव्हानांचा मुकाबला करत प्रगती करत असलेला भारत देश या विषयावर चर्चा होणार आहे. विकासासाठीच्या भारताच्या आगामी  धोरणांवर सर्वांगाने चर्चा होणार आहे. 

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. याप्रसंगी टाइम्स ग्रुपचे एमडी विनीत जैन, टाइम्स नेटवर्कचे एमडी आणि सीईओ एमके आनंद, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकुर, आयडीएफसी फर्स्ट बँकेचे एमडी आणि सीईओ व्ही. वैद्यनाथन सहभागी झाले होते. 

उद्घाटन सोहळ्यात बोलताना टाइम्स ग्रुपचे एमडी विनीत जैन म्हणाले की, इंडिया इकोनॉमिक कॉन्क्लेवचे हे आठवे वर्ष आहे. यंदा 'इंडिया इकोनॉमिक कॉन्क्लेव २०२२' सुरू आहे. या निमित्ताने विविध क्षेत्रांतील दिग्गज भारताच्या विकासाच्या धोरणांवर वेगवेगळ्या दृष्टीकोनातून त्यांचे मत मांडतील. या अशा मुक्त वातावरणातील चर्चेतून धोरणाची रुपरेखा आखणे आणखी सोपे होईल. भारताची संस्कृती प्राचीन आहे. ही संस्कृती नवी आव्हाने स्वीकारणे आणि ती पूर्ण करण्यासाठी गुंतागुंतीची धोरणे आखून ती अंमलात आणण्यासाठी सक्षम आहे. यामुळेच भारत नवनव्या आव्हांनाना स्वीकारून आणि पूर्ण करून प्रगती करत आहे. 

IMFने केले भारताचे कौतुक : विनीत जैन

कोरोना संकटातून सावरत असलेल्या भारताने वेगाने आर्थिक प्रगती सुरू केली आहे. ज्या वेगाने ही प्रगती सुरू आहे ते पाहून आयएमएफने भारताचे कौतुक केले आहे. भारतातील दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या वेगाने कमी होत आहे. नागरिकांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. भारतीयांची क्रय शक्ती वाढत आहे. भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था आहे. क्रय शक्तीचा विचार केल्यास भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेसाठी उज्ज्वल भविष्याची धोरणे आखण्याच्या निमित्ताने चर्चा करण्यासाठी देशाविदेशातील अनेक दिग्गज 'इंडिया इकोनॉमिक कॉन्क्लेव २०२२'च्या माध्यमातून एकाच मंचावर एकत्र आल्याचे टाइम्स ग्रुपचे एमडी विनीत जैन म्हणाले.

कार्यक्रमात सहभागी होणार असलेले दिग्गज

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी, भारती एंटरप्राइजेसचे संस्थापक अध्यक्ष सुनील भारती मित्तल, वेदांता समुहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह अनेक दिग्गज कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. न्यूयॉर्कमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन पण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी