Hybrid work : बापरे! 54% कर्मचारी म्हणतात, घरून आणि ऑफिस दोन्हीमधून काम करून द्या, नाहीतर देतो राजीनामा...

Working Culture After Corona : कोरोना महामारीचा (Corona Pandemic) सामना करताना दोन वर्षांच्या कालखंडाने जागतिक स्तरावर मोठे बदल घडवून आणले आहेत. जवळजवळ सर्व कंपन्यांना आधी वर्क फ्रॉम होम (Work From Home)आणि आता हायब्रीड स्वरुपात (Hybrid Model) काम करावे लागते आहे. सुरुवातीला, जवळपास सर्व कामे घरून केली जात असताना, काही कार्यालये पुन्हा सुरू झाली आणि कर्मचाऱ्यांना वेळेत परत येण्यास सांगण्यात आले. मात्र आता कर्मचाऱ्यांना हायब्रीड स्वरुपातील कार्यसंस्कृती हवी आहे.

hybrid model for work
कामासाठीचे हायब्रीड मॉडेल  
थोडं पण कामाचं
  • कोरोना काळात जगभर वर्क फ्रॉम होम कार्यसंस्कृतीचा प्रसार
  • कोरोना आटोक्यात आल्यावर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना बोलावले कार्यालयात
  • जगभरातील कर्मचाऱ्यांना हवे हायब्रीड मॉडेल

Hybrid Working Culture : नवी दिल्ली : कोरोना महामारीचा (Corona Pandemic) सामना करताना दोन वर्षांच्या कालखंडाने जागतिक स्तरावर मोठे बदल घडवून आणले आहेत. जवळजवळ सर्व कंपन्यांना आधी वर्क फ्रॉम होम (Work From Home)आणि आता हायब्रीड स्वरुपात (Hybrid Model) काम करावे लागते आहे. सुरुवातीला, जवळपास सर्व कामे घरून केली जात असताना, काही कार्यालये पुन्हा सुरू झाली आणि कर्मचाऱ्यांना वेळेत परत येण्यास सांगण्यात आले. मात्र या दोन वर्षांनी जगाला हे दाखवून दिले आहे की काम कोठूनही केले जाऊ शकते आणि ते पूर्ण करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्यामुळे जेव्हा आता कंपन्यांनी पुन्हा कार्यालयात येऊन काम करण्याची सक्ती कर्मचाऱ्यांना सुरू करताच कर्मचाऱ्यांनी बंडाचा झेंडा रोवण्यास सुरूवात केली आहे. त्यांना वर्क फ्रॉम होम किंवा हायब्रीड स्वरुपात काम करायचे आहे. हायब्रीड म्हणजे काही दिवस घरून आणि काही दिवस कार्यालयातून काम करण्याची पद्धत. (If hybrid model is not offered, 54% Employees may resign says WorkInSync report)

अधिक वाचा : QR code scam : सावधान! क्युआर कोडद्वारे पैसे मिळत नाहीत...घोटाळ्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे जाणून घ्या

घरून काम केल्याने कर्मचारी खूश

घरून काम केल्याने कर्मचार्‍यांना त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्याची संधी मिळाली आहे. त्यांना जास्त संघर्ष न करता कार्यालय आणि घर हाताळण्यासाठी वेळ मिळाला आहे. शिवाय असे दिसून येते की बहुतेक कर्मचारी अशाप्रकारे काम करणे पसंत करतात. कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणातून त्यांचा काम करण्याची दृष्टीकोन स्पष्ट झाला आहे. ते कार्यालयात पूर्णवेळ परतण्यास तयार नाहीत. वर्कइनसिन्क द्वारे (WorkInSync report) करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तर अशा कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे, ज्यांना हायब्रीड स्वरुपात काम न दिल्यास ते नोकरी सोडण्याचा विचार करू शकतात.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 09 May 2022: सोन्याच्या भावात घसरण! अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण, बॉंडचा परतावा याचा सोन्यावर दबाव...पाहा ताजा भाव

हायब्रीड मॉडेलचा दबदबा

हायब्रीड मॉडेल कंपन्यांना कर्मचाऱ्यांना जास्त काळ टिकवून ठेवण्यास मदत करत आहे असे दिसून आले आहे. सर्वेक्षणात सुमारे 54 टक्के कर्मचाऱ्यांनी असे म्हटले आहे की जर त्यांना हायब्रीड स्वरुपाची कार्य पद्धती आणि लवचिकता दिली गेली नाही तर ते नोकरी सोडण्याचा विचार करतील.

कंपनी आणि कर्मचारी दोघेही फायद्यात

हायब्रीड वर्क मॉडेलला बहुतेक कर्मचार्‍यांनी स्पष्टपणे प्राधान्य दिले असले तरी ते कंपन्यांसाठी देखील फायदेशीर आहे. अहवालानुसार, हायब्रीड वर्क मॉडेल अंतर्गत कंपन्यांच्या उत्पादनक्षमतेत 13 ते 24 टक्के वाढ झाली आहे. शिवाय या मॉडेलमुळे दरवर्षाकाठी प्रति कर्मचारी होणारी अंदाजे बचत सुमारे 11,000 डॉलर इतकी आहे.

अधिक वाचा : Warren Buffett Thoughts : पैशांच्या राशीवर लोळणारा कुबेर...'वॉरेन बफे' म्हणतात तुमच्याकडील संपत्ती हे तुमच्या यशाचे मोजमाप नाही...याला मानतात खरी संपत्ती

WorkInSync ने सर्वेक्षणात , हायब्रीड मॉडेलमध्ये सरासरी 44 टक्के कर्मचारी एका महिन्यात केवळ 1-5 दिवस कार्यालयातून काम करतात. याव्यतिरिक्त, 29 टक्के कर्मचारी महिन्यातून 6-10 दिवस कार्यालयात काम करत आहेत. तर 27 टक्के कर्मचारी महिन्यात 11 दिवसांपेक्षा जास्त दिवस कार्यालयात असतात.

काय आवडते कर्मचाऱ्यांना

या अहवालानुसार कार्यालयातून काम करणार्‍यांसाठी, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे दिवस येण्यासाठी पसंतीचे दिवस आहेत आणि हे कर्मचारीही त्यांच्या कामाची सुरूवात सकाळी लवकर करत आहेत. अहवालात असे नमूद केले आहे की कार्यालयात येणारे 100 टक्के कर्मचारी आता सकाळी 7:30 ते सकाळी 9 या वेळेत कामाची सुरुवात करतात.

हायब्रीड मॉडेल

आपण असंख्य वेळा ऐकले आहे की " हायब्रीड मॉडेल हेच कामाचे भविष्य आहे" तर "हायब्रीड मॉडेल" म्हणजे काय? हायब्रीड मॉडेल म्हणजे हायब्रीड कार्यसंस्कृती अशी असते जेथे कर्मचार्‍यांना घरातून (किंवा इतर कुठेही) काम करण्याची परवानगी असते आणि आवश्यकतेनुसार आठवड्यातून दोन वेळा कार्यालयात यावे लागते. Apple, Google, आणि Microsoft सारख्या मोठ्या टेक कंपन्या, यांनी सर्वात आधी हायब्रिड वर्क मॉडेलची सुरूवात केली होती.

सध्या, हायब्रीड वर्क मॉडेल थोडे अधिक विकसित झाले आहे . जगात दोन कार्यसंस्कृती किंवा मॉडेल आहेत. एक, ‘हायब्रिड ऑफिस’ मॉडेल जिथे कर्मचारी आठवड्यातून दोन दिवस कार्यालयात येतात (गुगल, ऍपल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या या मॉडेलसह काम करत आहेत) आणि दोन, ‘रिमोट फर्स्ट’ मॉडेल जेथे कर्मचारी केवळ सहयोगी प्रकल्पांसाठी कार्यालयात येतात (Pinterest, LinkedIn आणि Shopify या मॉडेलवर काम करत आहेत).


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी