Cryptocurrency Fraud | क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करतांय, मग या ५ बनावट वेबसाइट्सपासून रहा सावध!

Cryptocurrency scam : आपल्या देशात क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency Popularity) क्रेझ शिगेला पोहोचली आहे. त्याला कायदेशीर दर्जा मिळाला नसला तरी गुंतवणूकदार (Cryptocurrency Investors) थांबण्याचे नाव घेत नाहीत. ही सरकारची सर्वात मोठी समस्या आहे. डिजिटल चलनाच्या गुंतवणूकदारांसोबत होत असलेला क्रिप्टोकरन्सी घोटाळा किंवा फसवणुकीचे प्रकार लक्षात घेऊन या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार क्रिप्टोकरन्सी नियमन विधेयक आणू शकते.

Cryptocurrency Scam in India
भारतातील क्रिप्टोकरन्सी गैरव्यवहार आणि स्कॅम 
थोडं पण कामाचं
  • क्रिप्टोकरन्सीच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस मोठी वाढ
  • क्रिप्टोकरन्सीसंदर्भातील गैरव्यवहार करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्या वेबसाइटचा भारतीयांना धोका
  • टॉप ५ बनावट वेबसाइटची यादी

Cryptocurrency Investment : नवी दिल्ली : आपल्या देशात क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency Popularity) क्रेझ शिगेला पोहोचली आहे. त्याला कायदेशीर दर्जा मिळाला नसला तरी गुंतवणूकदार (Cryptocurrency Investors) थांबण्याचे नाव घेत नाहीत. ही सरकारची सर्वात मोठी समस्या आहे. डिजिटल चलनाच्या गुंतवणूकदारांसोबत होत असलेला क्रिप्टोकरन्सी घोटाळा किंवा फसवणुकीचे प्रकार लक्षात घेऊन या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार क्रिप्टोकरन्सी नियमन विधेयक आणू शकते. दरम्यान, ब्लॉकचेन फर्म चैनालिसिसने एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, मागील वर्षाच्या तुलनेत २०२१ मध्ये क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यांमध्ये मोठी घट झाली आहे.काही बनावट वेबसाइट (Fake Cryptocurrency websites)आहेत ज्या ग्राहकांची क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करत आहेत. (If you are investing in cryptocurrency, beware of these 5 bogus cryptocurrency websites)

भारतीयांचा क्रिप्टोकरन्सीकडील वाढता कल

२०२१ मध्ये भारतीयांनी क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याच्या वेबसाइटला 96 लाख वेळा भेट दिली. २०२० मध्ये, भारतीयांनी क्रिप्टोकरन्सीसंदर्भातील गैरव्यवहार करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्या वेबसाइटला १.७८ कोटी वेळा भेट दिली. अलीकडेच फाइंडर क्रिप्टोकरन्सी स्वीकार निर्देशांक (Finder cryptocurrency adoption index) प्रसिद्ध झाला. फाइंडर क्रिप्टोकरन्सी निर्देशांकानुसार, डिसेंबरमध्ये, क्रिप्टोकरन्सीचा स्वीकार घेण्याच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. अहवालात असेही म्हटले आहे की लोक क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करतात मात्र त्यांना यातील धोक्याबद्दल जास्त माहिती नसते.

टॉप ५ स्कॅमिंग वेबसाइट्स (Fake Cryptocurrency websites)

चेनॅलिसिस अहवालात असे नमूद केले आहे की भारतातील टॉप-५ स्कॅमिंग वेबसाइट्सची नावे आहेत,  adbtc.top, hackertyper.net, dualmine.com आणि coingain.app. बहुतेक क्रिप्टो स्कॅम वेबसाइट्स फिशिंग वेबसाइट्स आहेत. याच्या मदतीने युजर्सची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो. पॉन्झी योजना आणि बनावट गुंतवणूक योजनांचीही यात माहिती आहे.

सोशल मीडियाद्वारे फसवणूक

लाइव्हमिंटच्या रिपोर्टनुसार, आजकाल इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामच्या मदतीने क्रिप्टो स्कॅमचा प्रयत्न केला जात आहे. 'सेफ सिक्युरिटी' या भारतीय सायबर सिक्युरिटी फर्मचे सह-संस्थापक राहुल त्यागी यांच्या मते, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये काम करणारे कर्मचारी देखील ग्राहक किंवा गुंतवणुकदारांची माहिती सायबर गुन्हेगारांसोबत शेअर करतात. हे सायबर गुन्हेगार गुंतवणुकदार किंवा ग्राहकांचा डेटाट मिळाल्यानंतर ग्राहकांना व्हॉट्सअॅप आणि मेसेजच्या माध्यमातून लक्ष्य करतात. यासाठी फिशिंग अकाउंट लिंक शेअर केली जाते.

१२०० कोटींची फसवणूक

क्रिप्टोकरन्सी घोटाळे हा भारत सरकार आणि तपास यंत्रणांसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. याच महिन्यात, अंमलबजावणी संचालनालय आणि इतर अनेक तपास यंत्रणांनी क्रिप्टोकरन्सी ऑफर करण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची १,२०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल केरळ-स्थित व्यावसायिकाची मालमत्ता जप्त केली आहे. 'मॉरिस कॉईन क्रिप्टोकरन्सी' योजना सुरू करून ठेवीदारांना फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या व्यापाऱ्यावर पीएमएलए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत ३६.७२ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तपास यंत्रणेच्या मते, गुंतवणूकदारांना उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे उभे करणे बेकायदेशीर आहे आणि कोणत्याही नियामक यंत्रणेच्या पूर्वपरवानगीशिवाय ते केले जाऊ शकत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी