Finance Alert : 31 मार्चपर्यंत 'हे' काम न केल्यास बंद होणार तुमचे खाते, काय आहेत नियम?

काम-धंदा
Updated Mar 25, 2023 | 14:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Finance Alert : जर तुमच्याकडे SSY सुकन्या समृद्धी आणि PPF सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे खाते असेल आणि या वर्षी तुम्ही तुमच्या दोन्ही खात्यांमध्ये कोणतीही रक्कम जमा केली नसेल, तर 31 मार्चनंतर तुमचे दोन्हीही खाते बंद केले जाऊ शकतात. सदर खाती सक्रिय ठेवण्यासाठी शक्य तितक्या लवकर काही पैसे खात्यात जमा करा.

31 मार्चपर्यंत पैसे जमा न केल्यास बंद होणार ही खाती!
31 मार्चपर्यंत पैसे जमा न केल्यास बंद होणार ही खाती!  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • सुकन्या समृद्धी (SSY) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे (PPF) खाते या कारणांमुळे बंद होऊ शकते
  • सुकन्या समृद्धी योजना खात्यावर 7.6 टक्के व्याज देत आहे
  • पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के व्याज दिले जाते

Account will be closed after 31st March : तुमच्याकडे जर सुकन्या समृद्धी योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे खाती आहेत आणि त्यात तुम्ही वर्षभर काहीच पैसे भरलेले नाहीत तर ही खाती 31 मार्च रोजी बंद होणार आहेत. खाती बंद होऊ नयेत यासाठी तुम्हाला 31 मार्चपूर्वी किमान रक्कम खात्यात जमा करणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचे खाते सक्रिय राहतील. 

दुसरीकडे, 31 मार्चनंतर, खाती पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला काही दंडासोबत रक्कम जमा करावी लागेल. सुकन्या समृद्धी योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची खाती सक्रिय ठेवण्यासाठी किमान किती रक्कम राखली पाहिजे, जेणेकरून तुमची खाती नेहमी सक्रिय राहतील, हे आम्ही तुम्हाला आह सांगणार आहोत. (If you don't pay by 31st March your account will be closed, what are the rules?)

अधिक वाचा : ​'या' दिशेला बसून पूजा करणे शुभ मानले जाते,पण करू नका या चुका

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

भारतात सातत्याने घटत चाललेल्या लिंग गुणोत्तराची समस्या लक्षात घेऊन, सरकारने मुलींसाठी एक विशेष योजना राबवली आहे, मुलीच्या शिक्षणापासून तिच्या लग्नापर्यंतचा खर्च सुलभ होण्यासाठी या सुकन्या समृद्धी योजनेचा अवलंब करण्यात आला आहे. यासाठी तुम्ही भारतीय पोस्टच्या कोणत्याही कार्यालयात जाऊन 'सुकन्या समृद्धी योजना खाते' उघडू शकता. 

जर तुम्ही SSY खाते उघडले असेल, तर ते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला वार्षिक किमान 250 रुपये जमा करावे लागतील. तुम्ही 31 मार्चपर्यंत 250 रुपये जमा न केल्यास तुमचे खाते बंद केले जाईल. बंद झालेले हे खाते तुम्हाला जर पुन्हा सुरू करायचे असेल तर 250 रुपयांसह 50 रुपये दंड भरावा लागेल. सरकार सध्या सुकन्या समृद्धी योजना खात्यावर 7.6 टक्के व्याज देत आहे.

अधिक वाचा : ही औषधी वनस्पती करते मधुमेहापासून झटक्यात सुटका

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी / पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)

जर तुम्हाला लवकर पैसे कमवायचे असतील आणि पैसे गुंतवण्याचा योग्य मार्ग माहिती असेल तर तुमच्यासाठी ही काही मोठी गोष्ट राहिलेली नाही. आज खुल्या अर्थव्यवस्थेच्या विश्वात, जलद पैसे कमवण्यासाठी Mutual Fund सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र बाजार जोखमीमुळे अनेक लोक त्यामध्ये गुंतवणूक करणे टाळतात. आज आम्ही तुम्हाला 'पब्लिक प्रॉव्हिडंट फंड' या गुंतवणुकीच्या पर्यायाविषयी सांगणार आहोत.

PPF खाते फक्त 500 रुपये गुंतवणुकीपासून सुरू केले जाऊ शकते. या खात्यात वर्षाला कमाल 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकते. 31 मार्चपूर्वी तुम्हाला पीपीएफ खात्यात किमान 500 रुपये गुंतवावे लागतील. असे केले नाही तर तुमचे चालू खाते बंद केले जाईल. सध्या पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के व्याज दिले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी