Income Tax Alert | कॅश देऊन केलीत ही ५ कामे तर घरी येईल इन्कम टॅक्सची नोटिस, जाणून घ्या इन्कम टॅक्सचे नियम

Income Tax Department | मागील काही वर्षात प्राप्तिकर विभागाने बॅंक (bank), म्युच्युअल फंड हाउस (Mutual fund house), ब्रोकर कंपन्या (brokerage firm) इत्यादी विविध ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत असलेल्या रोख रकमेच्या (Cash transactions) व्यवहारांसंदर्भातील नियम अधिक कडक केले आहेत. अनेक व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन असे असतात की त्यावर प्राप्तिकर विभागाचे लक्ष असते.

Income Tax Notice
इन्कम टॅक्स नोटिस 
थोडं पण कामाचं
  • इन्कम टॅक्स विभाग रोख व्यवहारांबाबत अधिक सतर्क
  • कॅशद्वारे व्यवहार करण्यावर आहेत मर्यादा
  • गुंतवणूक करताना, बॅंकेचे व्यवहार करताना, प्रॉपर्टीचे व्यवहार करताना रोख रकमेच्या मर्यादा जाणून घ्या

Income Tax Notice | नवी दिल्ली : प्राप्तिकर विभाग (Income tax department)सध्या देशातील रोख रकमांच्या व्यवहारांबाबत बराच सतर्क झाला आहे. मागील काही वर्षात प्राप्तिकर विभागाने बॅंक (bank), म्युच्युअल फंड हाउस (Mutual fund house), ब्रोकर कंपन्या (brokerage firm) इत्यादी विविध ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत असलेल्या रोख रकमेच्या (Cash transactions) व्यवहारांसंदर्भातील नियम अधिक कडक केले आहेत. अनेक व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन असे असतात की त्यावर प्राप्तिकर विभागाचे लक्ष असते. बॅंक, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊस, प्रॉपर्टी रजिस्ट्रार (property registrar) यांच्याकडे जर तुम्ही मोठ्या रकमांचे व्यवहार रोखीने कराल तर तुम्हाला प्राप्तिकर विभागाला याची माहिती द्यावी लागते. पाहूया अशा ५ ट्रान्झॅक्शनबद्दल जे तुम्हाला अडचणीत आणू शकतात. (Income Tax rule: If you do this 5 transactions in cash, then you will get Income Tax Notice)

रोख रकमेने ट्रान्झॅक्शन केलेत तर प्राप्तिकर विभागाच्या नोटिसला तोंड द्यावे लागेल असे ५ व्यवहार पाहूयात-

१. बॅंकेची मुदतठेव (FD)
एका वर्षात जर तुम्ही एकापेक्षा अधिक वेळा एफडीमध्ये १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केलीत तर प्राप्तिकर विभाग तुमच्या उत्पन्नाच्या साधनांबद्दल विचारू शकते. अशावेळी शक्यतो एफडी जास्त रकमेची असल्यास पैसे ऑनलाइन स्वरुपात किंवा चेकद्वारे जमा करावेत.

२. बॅंकेच्या बचत खात्यातील जमा
जर एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात आपल्या एक किंवा एकापेक्षा अधिक बॅंक खात्यात १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केली तर प्राप्तिकर विभाग तुमच्या उत्पन्नाच्या साधनांबद्दल चौकशी करू शकते. चालू खात्यात जमा करावयाच्या रकमेची कमाल मर्यादा ५० लाख रुपये आहे.

३. क्रेडिट कार्डचे बिल भरणे
अनेकवेळा लोक क्रेडिट कार्डचे बिलदेखील रोख रकमेद्वारे जमा करतात. जर तुम्ही एकावेळेस १ लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी जमा केलीत तर प्राप्तिकर विभागाकडून चौकशी होऊ शकते.

४. प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन
प्रॉपर्टी रजिस्ट्रारकडे जर तुम्ही रोखीने मोठे ट्रान्झॅक्शन केलेत तर त्याचा रिपोर्ट प्राप्तिकर विभागाकडे जातो. जर तुम्ही ३० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या प्रॉपर्टीची खरेदी किंवा विक्री रोखीने केलीत तर प्रॉपर्टी रजिस्ट्रारकडून याची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाते.

५. शेअर, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स आणि बॉंडची खरेदी
जर तुम्ही शेअर, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स आणि बॉंडमध्ये मोठ्या प्रमाणात कॅशद्वारे ट्रान्झॅक्शन केले तर तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकते. एका आर्थिक वर्षात या प्रकारांमध्ये कमाल १० लाख रुपयांपर्यतच कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन केले जाऊ शकतात. जर तुम्ही यापैकी कोणत्याही गुंतवणूक प्रकारात पैसे गुंतवणार असाल तर एक बाब लक्षात ठेवा ती म्हणजे मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा वापर करू नका.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी