तुमच्या नोटेवर लिहिला आहे का ७८६ नंबर? बनू शकता लक्षाधीश

काम-धंदा
Updated Jul 21, 2021 | 18:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

जर तुम्हाला लाखो रूपये सोप्या पद्धतीने कमवाये आहेत तर तुमच्यााठी ही चांगली बातमी आहे. जर तुमच्याकडे असलेल्या नोटेवर ७८६ नंबर लिहिलेला आहे तर तुम्ही लाखो रूपये कमवू शकता.

money
तुमच्या नोटेवर लिहिला आहे का ७८६ नंबर? बनू शकता लक्षाधीश 

थोडं पण कामाचं

  • ७८६ हा अंक खूप भाग्यवान मानला जातो
  • अशा नोटांना मागणी असते.
  • अनेक वेबसाईट या युनिक नंबर असलेल्या नोटांचा सेल करत आहे. 

मुंबई: जर तुम्हाला पैसे कमवायचे आहेत तर तुम्हाला सजग रहावे लागेल. जेव्हा तुमच्या हातात नोटा(note) येतील तेव्हा त्यांच्यावर नजर जरूर टाका. युनिक नंबर असलेल्या नोटा सुरक्षित ठेवा. यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. जर तुमच्याकडे १०,२०,५०, १००, ५००  रूपयांची एखादी नोट आहे आणि त्यावर ७८६ असे लिहिले असेल तर तुम्ही लाखो रूपये कमवू शकता. अशा नोटा खरेदी विक्रीसाठी अनेक वेबसाईट आहे. या नोटेला प्रचंड मागणी आहे. 

अनेक लोकांना जुन्या तसेच युनिक नोटा, नाणी जमवण्याची हौस असते. त्यासाठी ते कितीही रूपये खर्च करण्यास तयार असतात. तुम्ही ७८६ असा नंबर असलेल्या नोटा eBay च्या वेबसाईटवर जाऊन विकू शकता.

कुठे विकू शकता?

खरंतर ७८६ हा अंक खूप भाग्यवान मानला जातो. ७८६ असा नंबर असलेल्या कोणत्याही नोटा विकल्या जातात. यासाठी  eBayवर पोस्ट करा आणि यासाठी बोली लावा.   eBayच्या वेबसाईटवर नोटांसाठी बोली लावली जाते. यात कोणीही व्यक्ती भाग घेऊ शकता. जेव्हा तुम्ही यात विक्रीसाठी नोट ठेवता तेव्हा तुम्ही यासाठी बोली लावू शकता. यामुळे तुम्हाला ३ लाखांपर्यंतचा फायदा होऊ शकतो. 

कशी विकाल नोट

  1. यासाठी सगळ्यात आधी www.ebay.com वर लॉग इन करा. 
  2. होमपेजवर रजिस्ट्रेशनवर क्लिककरा आणि स्वत: विक्रीदार म्हणून रजिस्टर करा. 
  3. तुमच्या नोटेचा एक फोटो घ्या आणि तो साईटवर अपलोड करा. 
  4. ebay तुमची ही जाहिरात त्या लोकांना दाखवणार ज्यांना अशा नोटा खरेदी करायच्या असतात. 
  5. ज्यांना अशा नोटा खरेदी करण्यात रस असतो ते तुमची जाहिरात बघतील आणि तुम्हाला संपर्क करतील. 
  6. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि नोट विकू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी