तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट आहे का? तर हे जरूर वाचा

काम-धंदा
Updated Mar 03, 2021 | 15:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Post office charges: पोस्ट ऑफिसमध्ये आता जमा करण्यासाठी, काढण्यासाठी तसेच AEPS ट्रान्झॅक्शनवर चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर कमीत कमी २५ रूपये लागतील.

india post
पोस्ट ऑफिसमध्ये खाते असल्यास नक्की वाचा ही बातमी...a 

थोडं पण कामाचं

  • जर तुमचे पोस्टात बचत खाते आहे तर महिन्यातून चार वेळा पैसे काढणे फ्री आहे
  • Basic Saving Accountsमध्ये पैसे जमा करण्यावर कोणताही चार्ज लागणार नाही
  • अकाऊंटमध्ये पैसे भरण्यासाठीही लिमिट आहे. दर महिन्याला  १० हजार रूपयांपर्यंत रक्कम तुम्ही फ्रीमध्ये भरू शकता

मुंबई: जर तुमचे पोस्टात खाते(account in post office) आहे तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. India Post Payment Banks ने आता पैसे काढणे, जमा करणे आणि AEPS(आधार आधारित पेमेंट सिस्टीम)वर चार्ज आकारण्याचा निर्णय घेतला आहे. नवा नियम १ एप्रिल २०२१ पासून लागू केला जाईल. जर तुमचे पोस्टात बचत खाते आहे तर महिन्यातून चार वेळा पैसे काढणे फ्री आहे. त्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर कमीत कमी २५ रूपये अथवा रकमेच्या ०.५० टक्के चार्ज कापला जाईल. 

Basic Saving Accountsमध्ये पैसे जमा करण्यावर कोणताही चार्ज लागणार नाही. पोस्ट ऑफिससोबत जर सेव्हिंग्स अथवा करंट अकाऊंट आहे तर महिन्याला २५हजार रूपये काढणे फ्री आहे. त्यानंतर ही मर्यादा पार केल्यानंतर रकमेवर ०.५० टक्के अथवा कमीत कमी २५ रूपये प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर द्यावे लागतील. दरम्यान, अकाऊंटमध्ये पैसे भरण्यासाठीही लिमिट आहे. दर महिन्याला  १० हजार रूपयांपर्यंत रक्कम तुम्ही फ्रीमध्ये भरू शकता. त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास त्या रकमेवरील ०.५० टक्के अथवा कमीत कमी २५ रूपये द्यावे लागतील. 

आधार आधारित पेमेंट सिस्टीमवर लागणार चार्ज

Aadhaar आधारित AEPS transactions बाबत बोलायचे झालेस इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या नेटवर्कवर अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन पूर्णपणे प्री आहे. नॉन आयपीपीबी नेटवर्कवर एका महिन्यात तीन ट्रान्झॅक्शन फ्री आहेत. यात कॅश जमा करणे, काढणे, तसेच मिनी स्टेटमेंट काढणे हे सामील आहे. त्यानंतर होणाऱ्या ट्रान्झॅक्शनवर चार्ज लागेल. फ्री लिमिट पूर्णझाल्यानंतर कॅश जमा करण्यावरील सर्व ट्रान्झॅक्शनवर २० रूपये लागतील. 

जीएसटी चार्ज वेगळा

याशवाय मिनी स्टेटमेंटसाठी ५ रूपये चार्ज. फ्री लिमिटनंतर फंड ट्रान्सफर करण्यासाठी ट्रान्सफर चार्ज ट्रान्झॅक्शन अमाऊंटवर १ टक्के, अधिकाधिक २० रूपये कमीत कमी १ रूपये असेल.. इंडिया पोस्टककडून १ मार्चला हे नोटिफिकेशन जारी करण्यात आले. ग्राहकांना याची सूचना मेसेजवरून देण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी