Income Tax Alert : इन्कम टॅक्स रिफंडचा केला असेल दावा तर ठेवा हा पुरावा, येतायेत प्राप्तिकर विभागाच्या नोटिस

ITR Refund : प्राप्तिकर विभागाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर करदात्यांना कर सूट आणि विशेषत: TDS सूट मिळविण्यासाठी करदात्यांनी केलेल्या कपातीशी संबंधित पुरावे पुन्हा पडताळण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी ईमेल नोटिसद्वारे सतर्क करत आहे. 31 जुलैपर्यंत दाखल केलेल्या आयकर रिटर्नच्या प्रक्रियेत, प्राप्तिकर विभाग या वर्षी AI च्या आधारे शोधत आहे की ज्या करदात्यांनी दावा केलेला TDS कापला गेला आहे, त्यांना ही रक्कम परतावा म्हणून मिळणे योग्य आहे की नाही.

ITR refund
प्राप्तिकर परतावा 
थोडं पण कामाचं
  • तुमच्या प्राप्तिकर परताव्याशी निगडीत गोष्टी सांभाळून ठेवा
  • प्राप्तिकर विभागाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर अलर्ट देते आहे
  • परतावा कमी करणे किंवा दुरुस्त करणे हा या नोटिसांमागील उद्देश आहे

TDS Refund : नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर करदात्यांना कर सूट आणि विशेषत: TDS सूट मिळविण्यासाठी करदात्यांनी केलेल्या कपातीशी संबंधित पुरावे पुन्हा पडताळण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी ईमेल नोटिसद्वारे सतर्क करत आहे. 31 जुलैपर्यंत दाखल केलेल्या आयकर रिटर्नच्या प्रक्रियेत, प्राप्तिकर विभाग या वर्षी AI च्या आधारे शोधत आहे की ज्या करदात्यांनी दावा केलेला TDS कापला गेला आहे, त्यांना ही रक्कम परतावा म्हणून मिळणे योग्य आहे की नाही. जर एखाद्या करदात्याने वेगवेगळ्या कलमांतर्गत एकापेक्षा जास्त रिफंडचा दावा केला असेल, तर त्याला अशी नोटीस मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात अनेक करदात्यांना एक मेल येत आहे की, जर करदात्याकडे गुंतवणुकीचा पुरावा नसेल किंवा करदात्याने रिटर्नमध्ये चुकीची सूट घेतली असेल, तर तत्काळ त्याची पडताळणी करून रिटर्नमध्ये सुधारणा करा. परतावा कमी करणे किंवा दुरुस्त करणे हा या नोटिसांमागील उद्देश आहे.(If you have claimed for income tax refund keep investment proofs as Income tax department is sending notice)

अधिक वाचा : Xanthelasma : डोळ्यांवर का साचतं कोलेस्ट्रॉल? ही असतात लक्षणं

  1. 80G मध्ये सूट घेतलेल्या अशा पगारदार आणि छोट्या व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत.
  2. 200% दंड आणि अतिरिक्त व्याज आकारणीमध्ये जोडले जाऊ शकते
  3. त्या बदल्यात दावा कपातीची पडताळणी करा

नोटीसमध्ये दिलेले कारण असे आहे की वजावट फॉर्म 16 पेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे रिटर्नमधील दाव्यातील कपातीची पडताळणी करा आणि फॉर्म 16 शी बरोबर जुळवा. व्यावसायिकाला पाठवलेल्या नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, 'तुम्ही घोषित केलेल्या एकूण उत्पन्नात (म्हणजे एकूण उत्पन्न) घट झाली आहे, त्याची पडताळणी करा. असेही लिहिले आहे की या ईमेलचा उद्देश तुम्हाला कोणत्याही चुकीच्या दाव्याबद्दल सूचीत करणे हा आहे आणि तुम्ही ते AIS मध्ये दर्शविलेल्या उत्पन्नाशी देखील जुळवू शकता.

अधिक वाचा : Aamir Khan: 'लाल सिंग चड्ढा'ने रिलीजपूर्वी कमावले तब्बल 12 कोटी

या प्रकरणांमध्ये येत आहेत नोटिसा- 

जाणकारांनुसार, अशा पगारदार आणि छोट्या व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत, ज्यांनी प्रथमच कलम 80G अंतर्गत सूट घेतली आहे. यासोबतच अशा करदात्यांना नोटिसाही येत आहेत ज्यांनी एलआयसी अंतर्गत सूट घेतली आहे. गृहकर्जावरील व्याजात सूट, भाड्यात सूट, इतर कोणतीही करमुक्त गुंतवणूक म्हणून घेतलेली सूट असे निश्चित करून करदात्याला नोटीस पाठवली जात आहे. ज्या करदात्यांना अशा नोटिसा मिळाल्या आहेत त्यांनी प्रथम त्यांनी दावा केलेल्या सर्व गुंतवणुकीचे पुरावे गोळा करावेत. करदात्याकडे उत्तर देण्यासाठी 15 दिवस आहेत. करदात्याकडे सवलतीचा पुरावा नसला तरीही रिटर्नमध्ये सुधारणा करणे चांगले आहे, अन्यथा असेसमेंटमध्ये अतिरिक्त व्याज आणि 200% दंड आकारला जाऊ शकतो. रिटर्नमध्ये सुधारणा करून दंड टाळता येऊ शकतो.

अधिक वाचा : Crime : पहिल्या मुलीचा हुंड्यासाठी खून, दुसऱ्या मुलीलाही घातली मागणी! नकार दिल्यावर केलं गुन्हेगारी कृत्य

प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे ही अत्यंत महत्त्वाची आर्थिक बाब आहे. अजूनही तुम्ही आयटीआर भरला नसल्यास दंडाच्या रकमेसह तुम्हाला तो भरता येईल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी