Multibagger Stock : या आयटी कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये गुंतवले असते तर आज 900 कोटींचा मालक झाला असता, पाहा कसे

Share Market Investment : जर तुम्ही 10 वर्षे थांबू शकत नसाल तर शेअर मार्केटमध्ये 10 मिनिटेही थांबू नका. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणुकदाराला हे तत्त्व लागू होते. तुमचा पैसा चांगल्या शेअर्समध्ये गुंतवला तर वाट पाहण्याचे म्हणजेच संयमाचे फळ इतके गोड असेल की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून तुम्ही करोडपती किंवा अब्जाधीशही होऊ शकता. एका आयटी कंपनीचे शेअर्स याचे उत्तम उदाहरण आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • शेअर बाजारातील सर्वोत्तम एक्का म्हणजे संयमाने गुंतवणूक करणे
  • विप्रो लि. या आघाडीच्या आयटी कंपनीच्या शेअरमधील गुंतवणुकीने हे सिद्ध होते
  • काही हजारांच्या गुंतवणुकीने करून दिली 900 कोटींची कमाई

Multibagger Stock Investment : मुंबई : जर तुम्ही 10 वर्षे थांबू शकत नसाल तर शेअर मार्केटमध्ये 10 मिनिटेही थांबू नका. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणुकदाराला हे तत्त्व लागू होते. तुमचा पैसा चांगल्या शेअर्समध्ये गुंतवला तर वाट पाहण्याचे म्हणजेच संयमाचे फळ इतके गोड असेल की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून तुम्ही करोडपती किंवा अब्जाधीशही होऊ शकता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे विप्रोचे शेअर्स (Wipro Ltd). 1980 मध्ये ज्याने विप्रो स्टॉकमध्ये फक्त 10 हजार रुपये गुंतवले होते, ते कंपनी आणि स्प्लिटने दिलेल्या बोनस शेअर्सनुसार आज हे 10 हजार सुमारे 900 कोटी झाले असते. त्यातही कंपनीने वेळोवेळी दिलेला लाभांश समाविष्ट नसेल तर. यामागचे भन्नाट गणित समजून घेऊया.... (If you have invested Rs 10,000 in shares of Wipro ltd, it could have turned into Rs 900 crores)

अधिक वाचा : Multibagger Stock : हा 23 पैशांचा शेअर पोचला 9 रुपयांवर...एका वर्षात 1 लाखाचे झाले 40 लाख

हजाराच्या गुंतवणुकीचे झाले करोडो

जर एखाद्या गुंतवणुकदाराने 42 वर्षांपूर्वी म्हणजे 1980 मध्ये विप्रोच्या शेअर्समध्ये फक्त 10000 रुपये गुंतवले असतील आणि आजपर्यंत त्याने या शेअरमध्ये गुंतवणूक ठेवली असेल तर तो आजच्या तारखेला अब्जाधीश झाला असता. विप्रोच्या शेअरची किंमत 1980 मध्ये सुमारे 100 रुपये होती. सध्या ती 468 रुपयांच्या पातळीवर आहे. कंपनी शेअर्सचे विभाजन करत राहिली आणि त्याचबरोबर बोनसही देत ​​राहिली. यामुळे गुंतवणुकदारांची संपत्ती वाढत राहिली. याचा परिणाम असा झाला की ज्याने 1980 मध्ये 100 शेअर्स घेतले होते त्याने एक पैसाही न गुंतवता त्याच्याकडील एकूण शेअर्सची संख्या तब्बल 25,536,000 इतकी होईल. अर्थात क्वचितच असा कोणी गुंतवणुकदार असेल ज्याने एकाच शेअरमध्ये इतकी वर्षे संयमाने गुंतवणूक केली असेल.

अधिक वाचा : Multibagger Stock : या 25 पैशांच्या शेअरने केले गुंतवणुकदारांच्या एक लाखाचे 2 कोटी, अजूनही आहे तेजीत...

करोडपती बनवणारे शेअर्स

आर्थिक सल्लागार शैलेश मणी त्रिपाठी म्हणतात की शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी बहुतांश गुंतवणुकदारांमध्ये संयमाचा अभाव असतो. जर पैसे दीडपट वाढले तर आपण नफा वसूल करतो आणि तो कमी झाला तर तो विकून आपण स्टॉकमधून बाहेर पडतो. केवळ विप्रोच नाही तर तुम्ही आयशर, सिम्फनी, नॅटको फार्मा किंवा अजंता फार्मा किंवा इतर कोणत्याही चांगल्या शेअरमध्ये इतका काळ गुंतवणूक ठेवली असती तर तुम्ही करोडपती झाला असता.

अधिक वाचा : Multibagger Stock : या छोट्याशा शेअरने अवघ्या 6 महिन्यांत 1 लाखाच्या गुंतवणुकीचे केले 62 लाख

10000 रुपयांचे 899 कोटी कसे झाले ते जाणून घेऊ

1980 मध्ये विप्रोच्या शेअर्समध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला विप्रो कंपनीचे 100 शेअर्स मिळाले. बोनस शेअर आणि स्प्लिट नंतर 100 शेअर्स वाढून 25536000 शेअर झाले. आता विप्रोच्या शेअरची किंमत 468 रुपये आहे. म्हणजेच आता त्या 10000 रुपयांची किंमत 468×25536000 = 8,99,19,36,000 (जवळपास 899 कोटी रुपये) झाली आहे.

वर्ष                      इक्विटी                                                एकूण शेअर्सची संख्या
1980                  गुंतवणूक केली                                      100
1981                 1:1 बोनस                                              200
1985                  1:1 बोनस                                            400
1986                  शेअर्सचे दर्शनी मूल्य रु. 10 ला विभाजन    4,000 
1987                 1:1 बोनस                                              8,000
1989                  1:1 बोनस                                             16,000
1992                   1:1 बोनस                                             32,000
1995                   1:1 बोनस                                             64,000
1997                    2:1 बोनस                                           1,92,000
1999                    शेअर्सचे दर्शनी मूल्य रु.2 ला विभाजन        9,60,000
2004                      2:1 बोनस                                         28,80,000
2005                     1:1 बोनस                                           57,60,000
2010                      2:3 बोनस                                          96,00,000
2017                       1:1 बोनस                                        1,92,00,000
2019                        1:3 बोनस                                       2,55,36,000

(स्रोत: Economictimes, NSE, BSE, elearnmarkets.com, investinginsights.in)

विप्रो ही एक मोठी आयटी कंपनी आहे. तथापि, विप्रो देखील साबण आणि वनस्पती तेल व्यवसायात आहे. विप्रोची सुरुवात 1945 मध्ये महाराष्ट्रातील अमळनेर नावाच्या गावात झाली. या गावातील अनेकजण आज करोडपती आहे. अनेक कुटुंबाकडे विप्रो कंपनीचे शेअर्स आहेत. इथे अनेक घरांमध्ये लोकांनी काही वर्षांपूर्वी विप्रो कंपनीचे शेअर्स विकत घेतले होते. ज्यामुळे पुढील पिढी करोडपती झाली आहे. या गावाला 'सिटी ऑफ मिलियनेयर्स' म्हणूनही ओळखले जाते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी