LIC Policy | तुमच्याकडे एलआयसीची पॉलिसी असेल तर माहित हवा हा नियम...नाहीतर होईल नुकसान

LIC Rule | अनेकवेळा आर्थिक संकटामुळे किंवा इतर कारणांमुळे एलआयसीची (LIC)घेतलेली पॉलिसी बंद करण्याची वेळ पॉलिसीधारकांवर येते. प्रीमियम (Premium)भरण्यात अडचण येत असेल किंवा पॉलिसी पुरेशी वाटत नसेल तर ती विमा पॉलिसी बंद करण्याचा विचार केला जातो. अशावेळी पॉलिसी बंद केल्यावर तुम्हाला काही पैसे परत मिळतात याला सरेंडर व्हॅल्यू (surrender value)म्हणतात. पॉलिसी सरेंडर करण्यासाठीची एक प्रक्रिया असे आणि नियमावली असते.

LIC Rule
एलआयसी पॉलिसीसाठीचे नियम 
थोडं पण कामाचं
  • एलआयसीची पॉलिसी घेतली असल्यास संबंधित नियमदेखील माहित करून घ्या
  • पॉलिसी सरेंडर आणि टॅक्ससंदर्भातील नियम महत्त्वाचे
  • एलआयसीच्या पॉलिसीवर करवजावट

LIC Rule | नवी दिल्ली : एलआयसीची पॉलिसी (LIC Policy)घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशभरात एलआयसीचे जाळे पसरलेले आहे. मात्र अनेकवेळा आर्थिक संकटामुळे किंवा इतर कारणांमुळे एलआयसीची (LIC)घेतलेली पॉलिसी बंद करण्याची वेळ पॉलिसीधारकांवर येते. प्रीमियम (Premium)भरण्यात अडचण येत असेल किंवा पॉलिसी पुरेशी वाटत नसेल तर ती विमा पॉलिसी बंद करण्याचा विचार केला जातो. अशावेळी पॉलिसी बंद केल्यावर तुम्हाला काही पैसे परत मिळतात याला सरेंडर व्हॅल्यू (surrender value)म्हणतात. पॉलिसी सरेंडर करण्यासाठीची एक प्रक्रिया असे आणि नियमावली असते. मात्र पॉलिसी सरेंडर करताना तुम्हाला हे माहित असायला हवे की पॉलिसी सरेंडर व्हॅल्यू ही करपात्र असते की नाही, प्राप्तिकर विवरणपत्र भरताना सरेंडर व्हॅल्यूचा उल्लेख केला पाहिजे की नाही, सरेंडर व्हॅल्यूवर प्राप्तिकर भरावा लागतो की नाही. (If you have LIC policy, you must know this rule)

बहुतांश लोक एनॉमेंट प्लॅन घेतात. या प्लॅनमध्ये लाइफ कव्हरसोबत शेवटी मॅच्युरिटी अमाउंट मिळते. यामध्ये दोन प्रकारचे प्लॅन असतात. विथ प्रॉफिट आणि विदाउट प्रॉफिट. म्हणजे एलआयसीचा फायदा झाला की ते ग्राहकांना बोनसरुपात प्रॉफिट देतात. यामध्ये ग्राहकांना वेळोवेळी पैसा दिला जातो. विदाउट प्रॉफिट प्लॅनमध्ये शेवटी मॅच्युरिटी अमाउंट दिली जाते. या दोन्ही प्लॅनअंतर्गत ग्राहकांसाठी मनी बॅक प्लॅन, गारंटीड प्लॅन आणि पेन्शन प्लॅन सारख्या पॉलिसी चालवल्या जातात.

पॉलिसी केव्हा विकत घेतली आहे

जेव्हा तुम्ही पॉलिसी सरेंडर करण्याचे ठरवता तेव्हा त्यासंदर्भातील टॅक्सबद्दलचा नियम जाणून घेतला पाहिजे. सर्वसाधारपणे असा नियम असतो की जर सुरूवातीचे दोन वर्षे प्रीमियम भरण्यात आला असेल तर सरेंडर व्हॅल्यूवर कोणताही टॅक्स लागत नाही. पॉलिसी केव्हा घेण्यात आली आहे यावरदेखील टॅक्सचा नियम अवलंबून असतो. जर पॉलिसी ३१ मार्च २००३च्या आधी घेतली असेल तर ती पॉलिसी पूर्णपणे टॅक्सफ्री आहे. मात्र जर पॉलिसी १ एप्रिल २००३ पासून ३१ मार्च २०१२ दरम्यानची असेल तर सरेंडर व्हॅल्यूवर टॅक्स तेव्हाच माफ असेल जेव्हा सम अश्युअर्डची रक्कम प्लॅनच्या वार्षिक प्रीमियमपेक्षा ५ पट असेल.

टॅक्स केव्हा द्यावा लागेल

जर पॉलिसी १ एप्रिल २०१२ नंतर घेतली असेल तर सरेंडर व्हॅल्यूवर टॅक्स तेव्हाच माफ होईल जेव्हा सम अश्युअर्डची एकूण रक्कम वार्षिक प्रीमियमपेक्षा १० पट जास्त असेल. पॉलिसी जर १ एप्रिल २००३ पासून ३१ मार्च २०१२ दरम्यानची असेल आणि कोणत्याही एका वर्षात भरलेल्या प्रीमियमची एकूण रक्कम सम अश्युअर्डच्या २० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर सरेंडर व्हॅल्यूवर टॅक्स द्यावा लागेल. समजा ५ लाखांचा विमा आहे आणि एका वर्षात त्याचा प्रीमियम २० टक्के म्हणजे १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर सरेंडर व्हॅल्यूवर टॅक्स भरावा लागेल. अर्थात जर पॉलिसी बंद केली आणि सरेंडर व्हॅल्यू घेतली तरच हा कर लागू होतो अन्यथा नाही.

टॅक्सचा लाभ

टॅक्स कापला जाण्याची शक्यता असेल तर करवजावटीचादेखील लाभ घेतला जाऊ शकतो. आयुर्विमा पॉलिसीवर इन्कम टॅक्सच्या कलम ८० सी अंतर्गत कर वजावट मिळते. जर तुम्ही १ एप्रिल २०१२ नंतर स्वत:, मुले, पती, पत्नी यांच्या नावे पॉलिसी विकत घेतली आहे तर प्रीमियमची रक्कम सम अश्युअर्डचा १० टक्के टॅक्स लाभासाठी पात्र असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी