ITR Filing Last Date : नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र (ITR Filing)दाखल करण्यासाठीची अंतिम मुदत 31 जुलै 2022 ही होती. मात्र जर शेवटची मुदत ओलांडल्यावरदेखील तुम्ही जर तुमचे तुम्ही प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केले नसेल तरी निराश होऊ नका. तुम्ही 31 डिसेंबर 2022 पर्यंत तुमचे प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकता. मात्र यासाठी तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागेल. जर करदात्याचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला शेवटच्या तारखेपर्यंत 31 डिसेंबर 2022 पर्यंत 5000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. करदात्याचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असल्यास विलंब शुल्क 1,000 रुपये असेल. (If You have missed deadline you can file ITR till 31 Dec 2022 with penalty)
प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, 10.54 कोटी वैयक्तिक नोंदणीकृत करदाते आहेत. 2022-23 या मूल्यांकन वर्षासाठी आतापर्यंत 5 कोटी 82 लाख 88 हजार 962 लोकांनी प्राप्तिकर विवरणपत्र (ITR)भरले आहेत. यापैकी 3.01 कोटी आयटीआर पडताळण्याच्या प्रक्रियेत आहेत.
प्राप्तिकर तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या उत्पन्न गटातील व्यक्ती 31 जुलै 2022 च्या अंतिम मुदतीपर्यत प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यात अयशस्वी झाली, तरीही तो त्याचे प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकतो. वैयक्तिक करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्याला 31 डिसेंबर 2022 पर्यंत 5,000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. 5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्याला 1,000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल.
अधिक वाचा : Sanjay Raut Arrest:संजय राऊतांना ईडीकडून अटक, अटकेनंतरचा सामनाचा पहिला अग्रलेख; राज्यपालांवर निशाणा
प्राप्तिकर तज्ज्ञ म्हणतात की सध्याच्या प्राप्तिकर नियमांमध्ये कमीत कमी 6 महिने आणि कमाल7 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. प्राप्तिकर विवरणपत्र न भरण्याच्या प्रत्येक प्रकरणात प्राप्तिकर विभाग तुमच्यावर खटला चालवू शकतो असे नाही. कराची रक्कम 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तरच प्राप्तिकर विभागाकडून कारवाई होऊ शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 31 डिसेंबर 2022 च्या मुदतीपर्यत 2022-23 या मूल्यांकन वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल न करणाऱ्या उत्पन्न गटातील व्यक्तीवर खटला चालवण्याचा भारत सरकारला अधिकार आहे.
याआधी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे विलंब शुल्क टाळण्यासाठी 31 जुलैपर्यंत आयटीआर दाखल करण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे. दुसरीकडे महसूल सचिव तरुण बजाज यांनी म्हटले आहे की, आयटीआर दाखल करण्याची तारीख 31 जुलैच्या पुढे वाढवण्याचा कोणताही विचार नाही. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून परिस्थिती सामान्य नसल्यामुळे आणि कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे शेवटची तारीख वारंवार वाढवण्यात आली होती. गेल्या आर्थिक वर्षात (2020-21), वाढीव तारखेसह 31 डिसेंबर 2021 पर्यंत एकूण 5.89 कोटी ITR दाखल करण्यात आले होते. यापूर्वी 2019-20 या आर्थिक वर्षातही 5.95 कोटी लोकांनी आयटीआर भरले होते.