ITR refund status : नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे ही अतिशय महत्त्वाची आर्थिक बाब आहे. 2022-23 या मूल्यांकन वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र (ITR)भरण्याची देय तारीख निघून गेली आहे. ज्यांनी 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचे त्यांचे प्राप्तिकर विवरणपत्र भरले आहे त्यांना एकतर त्यांचा प्राप्तिकर परतावा (ITR Refund) मिळाला आहे किंवा ते त्याची वाट पाहत आहेत. मात्र ज्या करदात्यांना प्राप्तिकर विवरणपत्राचे ऑडिट करणे आवश्यक आहे त्यांची देय तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे. त्यामुळे, ज्यांच्या प्राप्तिकर विवरणपत्राला कोणत्याही ऑडिटची आवश्यकता नाही (आणि त्यांनी 2022-23 या मूल्यांकन वर्षासाठी त्यांचा ITR दाखल केला आहे) ते आयटीआर परताव्यासाठी पात्र आहेत. अशा करदात्यांनी 2021-22 या आर्थिक वर्षात भरलेली अतिरिक्त कराची रक्कम अद्याप प्राप्त झाली नसल्यास ते त्यांची प्राप्तिकराच्या परताव्याची स्थिती ऑनलाइन तपासू शकतात. (If you have not got your ITR refund yet check status online)
अधिक वाचा : Viral Video : हत्तीच्या कळपासोबत घेत होता सेल्फी, हत्तींना दाखवला हिसका
भारतातील प्राप्तिकर विभाग करदात्यांना आयटीआर दाखल केल्यानंतर 10 दिवसांनी त्यांची आयटीआर परतावा स्थिती तपासण्याची ऑफर देतो. तर, ज्या करदात्यांनी 10 दिवसांपूर्वी त्यांचा ITR दाखल केला आहे आणि ते अजूनही त्यांच्या ITR परताव्याची वाट पाहत आहेत ते प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करून आयटीआर परतावा स्थिती ऑनलाइन तपासू शकतात. आयकर ई-फायलिंग पोर्टलवर पावती क्रमांकासह ऑनलाइन आयटीआर परतावा स्थिती कशी तपासायची याबद्दल स्टेप बाय स्टेप जाणून घ्या.
अधिक वाचा : Pune Crime News: पुणे हादरलं, भरदिवसा अपहरण करून 7 वर्षांच्या मुलीवर लैंगिक शोषणाचा प्रयत्न
प्राप्तिकर विवरणपत्र भरलेले करदात्याचे पॅन कार्ड वापरून आयटीआर रिफंडची स्थिती ऑनलाइन तपासता येते. यासाठी, करदात्याने NSDL वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे — https://tin.tin.nsdl.com/oltas/servlet/RefundStatusTrack. पॅन कार्डद्वारे आयटीआर परतावा स्थिती ऑनलाइन कशी तपासायची याबद्दल स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.