जर तुमच्याकडे १ ते १०० रूपयांपर्यंत नोट आणि जुनी नाणी आहेत तर मिळतील १.५ लाख

काम-धंदा
Updated Jul 19, 2021 | 21:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

जर तुमच्याकडे जुनी नाणी आणि करन्सी नोट आहेत आणि त्यांना ऑनलाईन विकत असल्याचा निर्णय घेत असाल तर तुम्ही श्रीमंत बनू शकता. १ आणि २ रूपयांचे कॉईन आणि १ रूपये, ५ रूपयांच्या जुन्या नोटांची किंमत लाखांमध्ये आहे. 

old coins
तुमच्याकडे १ ते १०० रूपयांच्या नोट, नाणी तर मिळतील १.५ लाख 

थोडं पण कामाचं

  • जर तुमच्याकडे ज्यावर वैष्णो देवीचा शिक्का आहे अशी ५ किंवा १० रुपयांची नाणी आहेत तर अशा नाण्यांना तिजोरीत ठेवणे शुभ मानले जाते.
  • तुमच्याकडे १०० रूपयांची नोट आहे तर तुम्ही १९९९ रूपये मिळवू शकता.
  • जर तुमच्याकडे १८६२चे क्वीन व्हिक्टोरियाची नाणी आहेत. तर क्विकरचे खरेदीदार १.५ लाख रूपये देण्यास तयार आहेत.

मुंबई: जर तुमच्याकडे जुनी नाणी आणि करन्सी नोट आहेत आणि त्यांना ऑनलाईन विकण्याचा विचार करत आहात तर तुम्ही एका रात्रीत श्रीमंत बनू शकता. खरंतर, १ आणि २ रूपयांचे जुने दुर्लभ नाणी आणि १ रूपये, २ रूपये आणि ५ रूपयांच्या जुन्या नोटांना(5 rupees coin or 10 rupees coin)  मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. ही नाणी विकून तुम्ही लाखो रूपये कमवू शकता. Numismatists म्हणजेच मुद्राशास्त्री आणि नोटाफिलिस्ट दुर्मिळ नाणी आणि नोटांच्या शोधात असतात. जर तुमच्याकडे अशा नोटा आणि नाण्यांचे कलेक्शन आहे तर तुम्ही ते विकून हवी तितकी रक्कम मिळवू शकता. 

या नाणी शिक्क्यांची होतेय विक्री

  1. जर तुमच्याकडे ज्यावर वैष्णो देवीचा शिक्का आहे अशी ५ किंवा १० रुपयांची नाणी आहेत तर अशा नाण्यांना तिजोरीत ठेवणे शुभ मानले जाते. या नाण्यांना बाजारात खूप मागणी आहे. अशी नाणी लोक खरेदी करण्यासाठी तयार आहेत. 
  2. जर तुमच्याकडे एक रूपयांची जुनी नोट आहे तर तुम्ही ४५ हजार रूपये कमावू शकता. एक रूपयांच्या नोटांचे बंडल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ४५ हजार रूपयांना विकले जात आहे. या नोटावर १९५७ चे गर्व्हनर एचएम पटेल यांची स्वाक्षरी आहे. सोबतच या नोटांवरील सीरियल संख्या १२३४५६ अशी आहे. इतकंच नव्हे ओएनजीसीचे पाच रूपये आणि १० रूपयांच्या स्मारक नाण्यांसाठी २०० रूपये मिळत आहे. 
  3. तुमच्याकडे १०० रूपयांची नोट आहे तर तुम्ही १९९९ रूपये मिळवू शकता. ही नोट ०००७८६ या संख्येची असेल आणि या नोटेवर आरबीआयचे माजी गर्व्हनर डी सुब्बाराव यांची स्वाक्षरी आहे.
  4. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर सीडी देशमुख यांची स्वाक्षरी असलेले जारी झालेले दहा रूपयांच्या नोटेला कॉईनला बाजारात खूप मागणी आहे. नोटावर एकीकडे अशोक स्तंभ आणि दुसरीकडे नाव छापलेले आहे. 
  5. जर तुमच्याकडे १८६२चे क्वीन व्हिक्टोरियाची नाणी आहेत. तर क्विकरचे खरेदीदार १.५ लाख रूपये देण्यास तयार आहेत. १८६२ची एक रूपयांची चांदीची नाणी दुर्मिळ नाण्यांची श्रेणीमध्ये येतात. 

जाणून घ्या कुठे आणि कधी विक्री

या जुन्यानोटा आणि नाणी CoinBazar, Indiamart आणि Quikr सारख्या वेबसाईटवर विकल्या जाऊ शकतात. तसेच CoinBazzar.com वर विकण्यासाठी तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर तुम्हाला अपेक्षित किंमतीची माहिती द्यावी लागेल. यानंतर इच्छुक खरेदीदार सरळ तुम्हाला संपर्क करतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी