Cashback: ...तर क्रेडिट कार्ड यूजर्संना मिळू शकतो कॅशबॅक

काम-धंदा
Updated Oct 30, 2020 | 14:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

जर आपण लॉकडाऊनमध्ये मोरेटोरियमदरम्यान आपले ईएमआयचे हफ्ते न चुकता भरले आहेत तर आपण बँकेकडून कॅशबॅकसाठी पात्र ठरू शकता. सरकारने दोन कोटीपर्यंतच्या कर्जांवरील व्याजावर व्याज सवलत देण्याची घोषणा केली.

Interest on interest
Cashback: मोरेटोरियमदरम्यान क्रेडिट कार्डची बाकी जमा केली असेल तर मिळू शकतो कॅशबॅक  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • दोन कोटी रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर मिळत आहे सूट
 • सर्व बँकांना ५ नोव्हेंबरपर्यंत कर्ज घेणाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा आदेश
 • आठ श्रेणीत कर्ज घेणाऱ्यांना मिळणार या योजनेचा फायदा

नवी दिल्ली: जर आपण लॉकडाऊनमध्ये (Lockdown) मोरेटोरियमदरम्यान (moratorium) आपले ईएमआयचे हफ्ते (EMI) न चुकता भरले आहेत तर आपण बँकेकडून कॅशबॅकसाठी (eligible for cashback from banks) पात्र ठरू शकता. सरकारने दोन कोटीपर्यंतच्या कर्जांवरील व्याजावर व्याज सवलत (discount on interest on interest) देण्याची घोषणा केली, भले आपण मोरेटोरियमचा फायदा उचललेला असो किंवा नसो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) म्हटले आहे की भारत सरकारने पात्र कर्ज खात्यांसाठी चक्रवाढ व्याज (compound interest) आणि साधारण व्याज (simple interest) यांच्यातील फरकाच्या भुगतानाच्या अनुदानाची योजना २३ ऑक्टोबर रोजी घोषित केली होती. या योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजावर लागणारे व्याज हे १ मार्च २०२०पासून पुढील सहा महिन्यांपर्यंत म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीसाठी माफ करण्यात येईल. सरकारने सर्व बँकांना ५ नोव्हेंबरपर्यंत चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याज यातील फरक कर्जदारांच्या खात्यात जमा करण्यास सांगितले आहे. आठ श्रेणीत घेण्यात आलेल्या २ कोटींपेक्षा कमी कर्ज घेणाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

या योजनेअंतर्गत लाभासाठी कोण कोण आहेत पात्र?

 1. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) कर्ज (Micro, small and medium enterprises (MSME) loans)
 2. शैक्षणिक कर्ज (Education loan)
 3. गृहकर्ज (Home loans)
 4. उपभोक्ता टिकाऊ कर्ज (Consumer durable loans)
 5. क्रेडिट कार्ड बाकी (Credit card dues)
 6. ऑटो कर्ज (Auto loans)
 7. वैयक्तिक किंवा व्यवसायिक कर्ज (Personal and professional loans)
 8. उपभोग कर्ज (Consumption loans)

जाणून घ्या कशी काम करते ही योजना

मंत्रालयाने म्हटले आहे की क्रेडिट कार्ड बाकीबद्दल व्याजदर हा १ मार्च ते ३१ ऑगस्टदरम्यान आपल्या ग्राहकांकडून ईएमआयच्या आधारावर आर्थिक देवाणघेवाणीसाठी कार्ड जारी करणाऱ्यांनी वसूल केलेल्या सरासरी उधार दरावर असेल. दंड व्याज आणि उशिरा फेडींसाठी भरपाई कॉन्ट्रॅक्ट रेट किंवा WALRच्या रुपात वसूल केला जाणार नाही. कर्ज देणाऱ्या संस्था, किंवा बँकिंग कंपनी किंवा सरकारी बँक, सहकारी बँक किंवा क्षेत्रीय ग्रामीण बँक किंवा अखिल भारतीय वित्त संस्थान, एक गैरबँक वित्त संस्था, हाऊसिंग फायनान्स कंपनी किंवा एक मायक्रोफायनान्स संस्था असावी लागेल. कर्जदाते हे ५ नोव्हेंबरपर्यंत पात्र कर्ज घेणाऱ्यांच्या खात्यात चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याजातील फरकाची रक्कम जमा करतील.  

व्याजावरील व्याजाबद्दल होती साशंकता

बँका, सहकारी बँका, हाऊसिंग फायनान्स कंपन्या आणि मायक्रोफायनान्स संस्थांसह विनियमित कर्जदाता या योजनेसाठी पात्र असतील. आरबीआयने मार्चमध्ये कोरोना विषाणूच्या संकटानंतर तीन महिन्यांसाठी ईएमआय आणि क्रेडिट कार्डच्या बाकी रकमेसाठी मोरेटोरियम दिला होता. नंतर केंद्रीय बँकेने हा तीन महिन्यांचा अवधी ३१ ऑगस्ट २०२०पर्यंत वाढवला. मात्र या गोष्टीबाबत साशंकता होती की या मोरेटोरियम अवधीदरम्यान व्याजावर व्याज घेतले जाईल की नाही. तर यावेळी सर्वोच्च न्यायालयात याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती. आग्र्याच्या या याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती की हे व्याज घेतले जाऊ नये.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी