Indian Railways Rule | रेल्वे प्रवासात सामान चोरी झाल्यास मिळेल मोबदला, पाहा नियम आणि प्रक्रिया

Indian Railways Rule for stolen luggage | रेल्वेने प्रवास करणाऱ्या ८० टक्के प्रवाशांना (Railway passengers)या नियमांची माहिती नाही. रेल्वे प्रवास करताना जर तुमच्या सामानाची चोरी झाली तर त्याचा मोबदला (Compensation for stolen goods) मिळू शकतो. तुम्ही तुमच्या सामानाच्या मोबदल्यासाठी क्लेम करू शकता. इतकेच नाही जर ६ महिन्यांच्या आत तुमचे सामान मिळाले नाही तर तुम्ही ग्राहक मंचाकडेदेखील (Consumer forum)तक्रार करू शकता. असे अनेक नियम आहेत ज्याबद्दल माहित असणे फार महत्त्वाचे आहे.

Compensation for stolen goods
ट्रेनमध्ये चोरीला गेलेल्या सामानाचा मिळतो मोबदला 
थोडं पण कामाचं
  • ट्रेनने प्रवास करताना तुमचे सामान चोरी गेल्यास मिळू शकतो मोबदला
  • प्रवाशांना चोरीला गेलेल्या सामानासंदर्भात क्लेम करता येतो
  • ६ महिन्यांच्या आत जर सामान मिळाले नाही तर ग्राहक मंचाकडेही तक्रार करता येते

Indian Railways | नवी दिल्ली : जर तुम्ही रेल्वेने (Railway) प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वेचे खास नियम (Indian Railway rule) आहेत ज्याबद्दल तुम्हाला माहित असणे फारच महत्त्वाचे आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या ८० टक्के प्रवाशांना (Railway passengers)या नियमांची माहिती नाही. रेल्वे प्रवास करताना जर तुमच्या सामानाची चोरी झाली तर त्याचा मोबदला (Compensation for stolen goods) मिळू शकतो. तुम्ही तुमच्या सामानाच्या मोबदल्यासाठी क्लेम करू शकता. इतकेच नाही जर ६ महिन्यांच्या आत तुमचे सामान मिळाले नाही तर तुम्ही ग्राहक मंचाकडेदेखील (Consumer forum)तक्रार करू शकता. असे अनेक नियम आहेत ज्याबद्दल माहित असणे फार महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या नियमांबद्दल जाणून घेतले तर तुम्हाला प्रवासादरम्यान अडचण येणार नाही. (If you luggage gets stolen in train, you can claim for it, check the details)

सामान चोरी झाल्यावर मोबदल्यासाठीचे नियम

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार जर ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान तुमचे सामान चोरी झाले तर तुम्ही आरपीएफ ठाण्यावर म्हणजे रेल्वे पोलिस ठाण्यावर जाऊन याची तक्रार नोंदवू शकता. शिवाय त्याचवेळी तुम्ही एक फॉर्मदेखील भरा. यामध्ये लिहिलेले असते की जर तुमचे सामान ६ महिन्यांपर्यत मिळाले नाही तर तुम्ही ग्राहक मंचाकडेदेखील तक्रार करा. एवढेच नाही तर सामानाच्या किंमतीचे आकलन करून रेल्वे याचा मोबदला देते. यामुळे तुमच्या चोरीला गेलेल्या सामानाची नुकसान भरपाई होईल. 

वेटिंग तिकिटावर करता येत नाही प्रवास

जर तुमच्याकडे वेटिंग तिकिट असेल तर ट्रेनच्या रिझर्वेशनच्या डब्यात तुम्ही प्रवास करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत वेटिंग तिकिटावर जर तुम्ही प्रवास करताना पकडले गेलात तर तुमच्याकडून किमान २५० रुपयांचा दंड वसूल केला जाईल. शिवाय पुढील स्टेशनवरून जनरल डब्यात प्रवास करावा लागेल. मात्र प्रवास करणाऱ्या एकूण चारपैकी दोन प्रवाशांचे तिकिट कन्फर्म असेल तर टीटीईकडून परवानगी घेऊन उर्वरित दोन प्रवासी कन्फर्म असलेल्या सीटवर प्रवास करू शकतात.

या परिस्थितीत भरावा लागेल दंड

प्रवासादरम्यान जर तुमच्याकडे तिकिट नसेल तर रेल्वे अॅक्टच्या कलम १३८ अंतर्गत तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते. या कलमाअंतर्गत तुमच्याकडून ठरलेल्या प्रवासासाठीचे रेल्वेने निश्चित केलेले भाडे वसूल केले जाईल. ज्या स्टेशनवरून ट्रेन सुटली तिथपासून पुढील भाडे आणि २५० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. जर तुमच्याकडे खालच्या श्रेणीचे तिकिट असेल तर तुम्ही प्रवास करत असलेल्या श्रेणीमधील आणि तिकिटावरील श्रेणीमधील फरकदेखील वसूल केला जाईल.

होईल केस दाखल

याशिवाय जर एखादा प्रवासी तिकिटात फेरफार करून प्रवास करताना पकडला गेल्यास रेल्वेच्या कलम १३७ अंतर्गत त्याच्यावर केस दाखल होईल. यामध्ये ६ महिन्यांच्या शिक्षा किंवा १ हजार रुपयांचा दंड किंवा दोन्हीदेखील होऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी