Indian Railway Rules:नवी दिल्ली : रेल्वे हे सर्वसामान्यांच्या पसंतीचे वाहतूक साधन आहे. रेल्वेदेखील(Indian Railway) आपल्या प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देत असते. मात्र रेल्वेने प्रवास करताना रेल्वेच्या नियमांची माहिती असणे महत्त्वाचे ठरू शकते. काहीवेळा प्रवासी रेल्वेचे तिकिट तर विकत घेतात मात्र ते घरीच राहते किंवा कुठेतरी गहाळ होते. अशावेळी त्या प्रवाशासमोर मोठीच समस्या निर्माण होते. जर तुम्ही रेल्वेच्या तिकीट काउंटरवरून तिकीट खरेदी केले. पण चुकून तुमचे तिकीट घरीचे राहिले. मात्र, तुमच्या मोबाईलवर रेल्वे तिकिटाचा (Railway Ticket) फोटो आणि रेल्वेचा मेसेज आहे, त्यामध्ये तुमच्या तिकिटाची संपूर्ण माहिती आहे. मग आता प्रश्न येतो की त्या तिकिटाच्या फोटो आणि मेसेजच्या आधारावर रेल्वे तुम्हाला प्रवास करू देणार की नाही? यासंदर्भातील रेल्वेचा हा नियम जाणून घ्या. संपूर्ण नियम माहित करून घेऊया. (If you misplaced the Railway ticket & have photo or SMS of railway then can you travel)
अधिक वाचा : Fatty Liver: तुम्हालाही फॅटी लिव्हरची समस्या आहे का? पाहा काय खावे आणि काय टाळावे
जर तुमच्याकडे मोबाईलवर सीट आणि बर्थ नंबरचा मेसेज आलेला असेल आणि ते तिकिट कन्फर्म असेल तर रेल्वे हा मेसेज वैध मानते. पण यासोबत काही अटही आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ज्या प्रवाशांनी आयआरसीटीसीद्वारे तिकीट बुक केले आहे त्यांच्यासाठीच एसएमएस वैध आहे. काउंटरवरून तिकीट खरेदी करणाऱ्यांना त्या तिकिटावरील संदेश वैध नाही.
अधिक वाचा : Crime News : लग्नाला नकार दिला म्हणून सहा मुलांच्या आईने केला बॉयफ्रेंडचा खून, पोलिसांकडून महिलेला अटक
तुम्ही काउंटर तिकीट घेतले असेल आणि तिकीट तुमच्याकडे नसेल, तर त्या प्रवाशाला काही अटींची पूर्तता करून प्रवास करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. सर्वप्रथम, त्या व्यक्तीला टीटीईसमोर हे सिद्ध करावे लागेल की तो तोच प्रवासी आहे ज्याच्या नावाने तिकीट विकत घेतले गेले आहे. मात्र, त्यानंतरही प्रवाशांना अधिक खर्च करावा लागणार आहे. त्याला तिकिटाची किंमत आणि दंडही भरावा लागणार आहे. तुम्हाला हे देखील माहित असले पाहिजे की जर तिकीट वातानुकूलित श्रेणीचे असेल तर GST स्वतंत्रपणे भरावा लागेल.
काउंटरवरून खरेदी केलेले तिकीट घेऊन जाणे आवश्यक आहे कारण रेल्वे फोटो किंवा एसएमएस वैध मानत नाही. यामागचे कारण असे की, ज्याच्याकडे काउंटरचे तिकीट आहे तो रेल्वेच्या कोणत्याही खिडकीवर जाऊन ते रद्द करू शकतो, रद्द केल्यानंतर तो रेल्वेकडून परतावाही घेऊ शकतो किंवा त्याच तिकिटाने प्रवासही करू शकतो. या प्रकारे फोटोद्वारे प्रवास करण्यास रेल्वेने परवानगी दिल्यास रेल्वेचे मोठे नुकसान होऊ शकते.
अधिक वाचा : Firing over FB : फेसबुकवर चॅटिंग बंद केल्याचा राग, तरुणाने मित्रासोबत केला तरुणीवर गोळीबार
तुमच्याकडे ई-तिकीट असल्यास, तुम्ही फक्त TTE ला मेसेज दाखवा किंवा तिकिटाचा स्क्रीनशॉट दाखवा. काही वर्षांपूर्वी, रेल्वे ई-तिकिटांसाठी प्रिंट आउटची मागणी करत असे. म्हणजेच ज्या प्रवाशाकडे प्रिंट आऊट नव्हती, त्या प्रवाशाला विनातिकीट समजले जात होते. तिकिटावर जशी चालान कारवाई केली जाते, तशीच कारवाईही त्यावर करण्यात येत होती. पण नंतर या नियमात बदल करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेण्यात आली. 2012 मध्येच ई-तिकीट घेणाऱ्यांना तिकिटाची प्रिंट काढण्याची सक्ती काढून टाकण्यात आली होती.