PhonePe Gold Offer | अक्षय्य तृतियेला स्वस्तात सोने खरेदी कराचंय? फक्त 4 दिवसांसाठी इथे मिळतेय बंपर ऑफर...

Gold : तुम्हीही अक्षय्य तृतियेला(Akshay Tritiya) स्वस्त सोने खरेदी (Gold)करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. डिजिटल पेमेंट कंपनी असलेल्या फोन पे ने ( PhonePe) अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अॅपद्वारे सोने आणि चांदीच्या खरेदीवर ऑफर जाहीर (PhonePe Gold Offer) केली आहे. ग्राहक अॅपद्वारे 999 शुद्धतेचे सोने खरेदी करू शकतात आणि ते बँक ग्रेड विमा असलेल्या लॉकरमध्ये जमा करू शकतात.

PhonePe Gold Offer
फोनपे गोल्ड ऑफर 
थोडं पण कामाचं
  • अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सोने खरेदीची परंपरा
  • फोनपे कडून गोल्ड ऑफर, स्वस्तात सोने खरेदीची संधी
  • ँक ग्रेड विमा असलेल्या लॉकरमध्ये सोने जमा करता येणार, कॅशबॅकदेखील मिळणार

PhonePe Gold Offer : नवी दिल्ली : तुम्हीही अक्षय्य तृतियेला(Akshay Tritiya) स्वस्त सोने खरेदी (Gold)करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. डिजिटल पेमेंट कंपनी असलेल्या फोन पे ने ( PhonePe) अक्षय्य तृतियेच्या मुहूर्तावर अॅपद्वारे सोने आणि चांदीच्या खरेदीवर ऑफर जाहीर (PhonePe Gold Offer) केली आहे. ग्राहक अॅपद्वारे 999 शुद्धतेचे सोने खरेदी करू शकतात आणि ते बँक ग्रेड विमा असलेल्या लॉकरमध्ये जमा करू शकतात. अक्षय तृतिया हा एक महत्त्वाचा मुहुर्त समजला जातो. तसेच अक्षय तृतियेला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यातच लग्न सराई देखील असल्यामुळे सोने खरेदी करण्यासकडे ग्राहकांचा कल असतो. (If you want to buy cheap Gold on Akshay Tritiya, then Check the details of PhonePe offer)

अधिक वाचा : Gold price today | सोने-चांदीच्या भावात आज झाली वाढ मात्र अजूनही उच्चांकीच्या बरेच खाली...आहे खरेदीची संधी, पाहा ताजा भाव

कोणतेही स्टोरेज किंवा मेकिंग शुल्क नाही

यावर कोणतेही स्टोरेज किंवा मेकिंग चार्ज नाही. याशिवाय, डिझाईन पर्यायांच्या विस्तृत श्रेणीतून सोन्याची नाणी किंवा बारच्या स्वरूपात डिलिव्हरी देखील मिळू शकते. कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे की, "फोनपेवर 24 कॅरेट सोने आणि चांदी सर्वोत्तम मूल्य आणि 99.99 टक्के शुद्धतेसह उपलब्ध आहे.

2,500 रुपयांपर्यंत कॅशबॅक

ऑफर कालावधी दरम्यान ग्राहक त्यांच्या सोने खरेदीवर 2,500 रुपयांपर्यंत कॅशबॅक घेऊ शकतात. चांदीची नाणी किंवा बार खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांना 250 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. ही ऑफर मर्यादित कालावधी असून ती 3 मे पर्यंत उपलब्ध असणार आहे.

अधिक वाचा : PUC Rate hike | महाराष्ट्रातील पीयूसी चाचणी दर झाले महाग...जाणून घ्या नवीन दर

शुद्धतेबरोबरच विम्याचाही आधार

कंपनीने म्हटले आहे की ती MMTC PAMP आणि SafeGold या दोन्ही डिजिटल गोल्ड स्पेसमधील आघाडीच्या कंपन्यांकडून सर्वोच्च शुद्धतेचे सोने ऑफर करते आहे. सर्वोच्च शुद्धता असलेली चांदीची नाणी आणि बार ऑफर करण्यासाठी त्यांनी सेफगोल्डशी विशेष करार केला आहे. अक्षय तृतीयेच्या आसपास डिझाइन केलेली उच्च दर्जाची सोन्याची आणि चांदीची नाणी आणि बारसाठी विमा असलेली डिलिव्हरी घरपोच मिळवण्याची सुविधादेखील ग्राहक निवडू शकतात.

अधिक वाचा : CNG Price Hike | पुण्यात सीएनजी 2.20 रुपयांनी महाग, आजपासून मोजावी लागेल एवढी किंमत...

सोन्याचा ताजा भाव

सोन्याचे भाव दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरल्यानंतर जागतिक दरात घट झाल्यामुळे आज भारतीय बाजारात सोने आणि चांदीचे भाव वाढले आहेत. एमसीएक्सवर ( MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.58% वाढून 51,560 रुपये प्रति 10 ग्रॅम होते पण तरीही 18 एप्रिलच्या उच्चांकावरून सुमारे 2,000 रुपये खाली आहेत. चांदीचे भाव आज 0.5% वाढून 64,915 रुपये प्रति किलोवर पोचले आहेत. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अजूनही संधी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी दिसत नसली तरी भारतात लग्नसराई आणि अक्षय तृतीया या दोन घटकांमुळे सोने आणि चांदीच्या भावात वाढ होण्याची चिन्हे आहेत. गुरुवारी, आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदी चढउतार नोंदवत स्थिरावली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी