Real Estate : नवी दिल्ली : घर (Home)ही प्रत्येक माणसाची, प्रत्येक कुटुंबाची मूलभूत गरज असते. स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र दरमहा मिळणारे उत्पन्न, जागांच्या किंमती, घरांच्या किंमती, बांधकाम खर्च, महागाई इत्यादी विविध कारणांमुळे काहींना घर बांधता येत नाही तर काहींना फ्लॅट विकत घेता येत नाही. घर खरेदी (Home Buyers) करणे दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होत चालले आहे. त्यातच सध्या भारतातच नव्हे तर जगभरच महागाईचा (Inflation)आगडोंब उसळलेला आहे. कोरोना महामारीच्या (Corona Pandemic)तडाख्यानंतर जगभरातील आर्थिक गणिते बदलली आहेत. महागाईबरोबरच घरांच्या किंमतीही (House price)जगभरात वाढत आहेत. रिअल इस्टेट (Real Estate)एकीकडे अनेक अडचणींना सामोरे जात असताना घरांच्या किंमतीत मात्र वाढ होताना दिसते आहे. जर तुम्हीही नवीन शहरात राहण्याचा विचार करत असाल तर आधी जाणून घ्या जगातील कोणती शहरे सर्वात स्वस्त आहेत आणि कोणती घर खरेदी करण्यासाठी सर्वात महाग आहेत. (If you want to buy house, check which places as affordable & which are costlier in the world)
अधिक वाचा : Unemployment Allowance | 'हे' सरकार बेरोजगार तरुणांना दर महिन्याला देते 7,500 रुपये, असा करा अर्ज
पिट्सबर्ग हे घरांसाठी जगातील सर्वात परवडणारे शहर मानले जाते. त्याच वेळी, हाँगकाँग हे घरांसाठी जगातील सर्वात महाग शहर आहे. डेमोग्राफिया इंटरनॅशनल हाऊसिंग अभ्यासात (Demographia International Housing study) मूल्यांकन केलेल्या 92 गृहनिर्माण बाजारांमध्ये हाँगकाँग (Hong Kong) सर्वात तळाशी आहे. या यादीत न्यूयॉर्क 73व्या तर लंडन (London)79 व्या स्थानावर आहे.
या अभ्यासात ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, आयर्लंड, न्यूझीलंड, सिंगापूर आणि यूकेमधील बाजारपेठांचे परीक्षण करण्यात आले. यामध्ये अमेरिका सर्वात आर्थिकदृष्ट्या सक्षम देश असल्याचे दिसून आले. बहुतेक प्रमुख अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये कोरोना महामारी सर्व देशभर (किंवा खंडभर) पसरला असताना घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
क्रमांक शहर
1 पिट्सबर्ग, PA, अमेरिका
2 ओक्लाहोमा सिटी, ओके, अमेरिका
3 रोचेस्टर, NY, अमेरिका
4 एडमंटन, एबी, कॅनडा
5 एडमंटन, एबी, कॅनडा
सर्वात परवडणाऱ्या ठिकाणांच्या यादीत ओक्लाहोमा सिटी आणि रोचेस्टर, न्यूयॉर्क हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सिडनी आणि व्हँकुव्हर हे सर्वात कमी परवडणारे आहेत.
अधिक वाचा : PM Kisan update | पीएम किसान योजनेत तुम्ही ही चूक तर केली नाही ना? नोटीस पाठवून केली जातेय वसुली!
क्रमांक शहर
1 हाँगकाँग, चीन
2 सिडनी, ऑस्ट्रेलिया
3 व्हँकुव्हर, कॅनडा
4 सॅन जोस, CA, US
5 मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
अनेक बाजारपेठांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडा बहुतेक परदेशी लोकांना दोन वर्षांसाठी घरे खरेदी करण्यास बंदी घालत आहे. महागणाऱ्या रिअल इस्टेट मार्केटला आवाक्यात आणण्यासाठी, बांधकामांना चालना देण्यासाठी ते अब्जावधी डॉलर्सची मदतदेखील कॅनडा करते आहे.
(इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2022: दिग्गज विचार आणि कल्पनाशक्तीला जमिनीवर ठेवण्याची कथा सांगतील. भेट द्या: IEC 2022)